एक्स्प्लोर

गोष्ट छोटी उंदराएवढी..!

महाराष्ट्राच्या मंत्रालयातच उंदीर घोटाळा झाल्याचा आरोप नाथाभाऊंनी केला आहे. दिवसाला 46 हजार उंदीर मारणाऱ्या सामान्य प्रशासन विभागाचे कपडे या उंदरांनी कुरतडून त्यांना पार नागडं करून टाकलं आहे. विशेष म्हणजे, हा विभाग नाथाभाऊंचे स्नेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारित येतो.. त्यामुळे थेट मुख्यमंत्र्यांना मूषकबाधेनं ग्रासलंय.

  गोष्ट तशी छोटी उंदराएवढी... मात्र आहे डोंगराएवढी... भाजप सत्तेच्या या डोंगराला पोखरण्यासाठी नाथाभाऊंनी खास ‘उंदीरा’स्त्र डागलं… महाराष्ट्राच्या मंत्रालयातच उंदीर घोटाळा झाल्याचा आरोप नाथाभाऊंनी केला आहे. दिवसाला 46 हजार उंदीर मारणाऱ्या सामान्य प्रशासन विभागाचे कपडे या उंदरांनी कुरतडून त्यांना पार नागडं करून टाकलं आहे. विशेष म्हणजे, हा विभाग नाथाभाऊंचे स्नेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारित येतो.. त्यामुळे थेट मुख्यमंत्र्यांना मूषकबाधेनं ग्रासलंय.. नाथाभाऊंच्या उंदीर बॉम्बनं सरकारच्या पारदर्शक कारभाराला किती बिळं पाडली आहेत, याची प्रचिती आपल्याला येईल... तसं नाथाभाऊ आजपर्यंत जे बोलत आले, ते सरकारनं फार सीरियसली घेतलं नाही. स्वकीयांवर बरसणाऱ्यांना नाथाभाऊंना विरोधकांना खांदा देण्याचा प्रयत्न करून आपल्या पक्षात ओढण्याचा प्रयत्न केला... पण नाथाभाऊंनी आजपर्यंत त्यांना झुलवत ठेवलंय... पण परवा मंत्रालयात त्यांनी उंदीर सोडून स्वतःच्याच पक्षाचे वाभाडे काढले. सर्वसामान्य जनता या अशा घोटाळ्यांना चांगलीच जाणते. किंबहुना हा अनुभव प्रत्येकजण घेतच असतो. पण हा भ्रष्टाचार किती खोलवर रुजला आहे, हे खडसेंच्या आरोपांमधून सिद्ध होतं आहे. खडसे आज मंत्री असते, तर त्यांनी कदाचित हा आरोप त्यांनी केलाच नसता. हा घोटाळा उघड़ झालाही नसता. याचा अर्थ असा की, सत्ता उपभोगताना होणाऱ्या गैरप्रकारांना सत्ताधाऱ्यांची मूक संमती असते. नव्हे, त्यांचा अप्रत्यक्ष त्यात सहभागही असतो, असं म्हणायला हरकत नाही. उंदरांनी सरकारी कारभाराच्या केलेल्या या चिंध्या भ्रष्टाचाराचं प्रतिक आहेत. भ्रष्टाचाऱ्यांचे हात एवढे सरावलेत की, ते आता अकल्पित, विश्वास न बसणारी आकडेवारी दाखवून करोडोंचा मलिदा घशात घालत आहेत. कारण त्यांना कुठलंही भय नाही. जिथून राज्याचा कारभार चालतो, जिथे मुख्यमंत्री, मंत्री, आमदार यांची उठबैस असते. अशा मंत्रालयातच भ्रष्टाचाराचे एवढे पेव फुटले असतील, तर गावागावात असलेल्या तलाठ्यापासून झेडपीतल्या बाबूपर्यंत कोणालाच भय असण्याचं कारण नाही. हे या व्यवस्थेला असेच उंदरासारखे अखंड पोखरत राहणार आहेत. सरकार दरबारी खेटे मारून पॅरागॉनचे दहा-बारा जोड झिजवत आयुष्याची हयात घालवणारे, हजारो लोक आजही न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. यातलेच एक धर्मा पाटील मंत्रालयात आले. नेहमीसारखी त्यांची निराशा झाली. आणि त्यांनाही जीव गमवावा लागला. एरवी किड्यामुंग्यांप्रमाणे मरणारा शेतकरी पहिल्यांदाच उंदरासारखा मेला. ज्य़ाचं या व्यवस्थेला काही सोयरसुतक नाही. ''पिपात ओल्या मेले उंदीर, माना टाकून मुरगळलेल्या'' या मर्ढेकरांच्या कवितेच्या ओळीला दुसऱ्या हत्याकांडात मारल्या गेलेल्या ज्युंचा संदर्भ आहे. आज आमचे धर्मा पाटील गेले. उद्या आणखी कोणी जाईल. जात राहतील... 'उडदामाजी काळे गोरे' म्हणण्याची आपली सवय आहे. मात्र, मंत्रालयातल्या घोटाळ्यानंतर 'उंदरामाजी काळे गोरे' म्हणायची वेळ आली आहे. गेल्यावेळी मंत्रालयात आग लागून सगळी कागदपत्रं जळाली. आता उंदरांना लालफितशाही कुरतडण्यासाठी सरकारनं उंदीर पाळले तर नवल नको. यात बिचाऱ्या मूषकराजाची बदनामी होते. तसं पाहिलं तर इंग्लंडच्या मंत्रालयातही उंदरांना आळा घालण्यासाठी मांजरी पाळल्या जातात. आपल्य़ाकडेही खडसेंनी उपहासानं जरी म्हटलं तरी, खरोखरच दोन चार मांजरी, बोके सोडले असते तरी देखील उंदरांचा उच्छाद रोखता आला होता. किंबहुना तशी प्रथा आपल्या मंत्रालयात याआधीपासून आहे. मंत्रालयातले कागदपत्रं कुरतडणाऱ्या उंदरांना रोखण्यासाठी मांजर, बोका पाळले जातात. मग हे उंदीर मारण्याचं कंत्राट हा प्रकार कशासाठी? पण कंत्राट हा आमच्या नेत्यांचा अधिकाऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय, त्याबद्दल न बोललेलं बरं. यावरूनच आमची व्यवस्था किती लयास गेली आहे, हे दिसून येते. आता गणरायांनीच हे कागदी उंदीर सोडले, असं उपहासानं म्हणावं लागेल. हे उंदीर खुर्चीखालची जागा भुसभुशीत केल्याशिवाय राहणार नाहीत. शेवटी सतीश देवपूरकरांच्या चार ओळी आठवतात, बिळातले उंदीर निघाले, शिकारींस ढाण्या वाघांच्या, फडताळांची झुरळे सुद्धा पडली मागे मागे त्यांच्या! एक काफिला तो भ्याडांचा खुराड्यामधे चिवचिव करतो! कुणी खास तोतया त्यांस मग, अनाहूत सल्लेही देतो!!
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Ichalkaranji Election Result : इचलकरंजी महापालिकेत भाजपची मुसंडी, शिव शाहू आघाडीला चित करत निर्णायक विजय, पाहा विजयी उमेदवारांची पूर्ण यादी
इचलकरंजी महापालिकेत भाजपची मुसंडी, शिव शाहू आघाडीला चित करत निर्णायक विजय, पाहा विजयी उमेदवारांची पूर्ण यादी
Ravindra Waikar : खासदार रवींद्र वायकर यांची जोगेश्वरीत पाटी कोरी, अनंत (बाळा) नर यांनी मैदान मारलं, मनसेच्या एका उमेदवारासह 8 उमेदवार निवडून आणले
रवींद्र वायकर यांना धक्का, अनंत (बाळा) नर यांनी मैदान मारलं, मनसेच्या एका उमेदवारासह 8 उमेदवार निवडून आणले
देवेंद्र फडणवीसांनी शिवाजी पार्कवरील सभेत नाव घेतलेल्या शीतल गंभीर 125 मतांनी जिंकल्या; रिकाऊंटींगची मागणी
देवेंद्र फडणवीसांनी शिवाजी पार्कवरील सभेत नाव घेतलेल्या शीतल गंभीर 125 मतांनी जिंकल्या; रिकाऊंटींगची मागणी
ABP Premium

व्हिडीओ

Sambhajinagar MIM Result  : संभाजीनगरात एमआयएमची मुसंडी, 16 जागांवर आघाडी
Dhananjay Mahadik Kolhapur Celebration : कॉलर उडवली, दंड थोपटले;  धनंजय महाडिक यांचा तुफान जल्लोष
Latur Congress Win : विलासरावांच्या आठवणी मिटवू हे रविंद्र चव्हाणांचे वक्तव्य भोवलं?
BMC Election Dipti Waikar Loses : रवींद्र वायकर यांना मोठा राजकीय धक्का,दीप्ती वायकर यांचा पराभव
Thane Corporation Win : ठाण्यात एमआयएमची मुसंडी, मुंब्रातून 4 नगरसेवक विजयी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Ichalkaranji Election Result : इचलकरंजी महापालिकेत भाजपची मुसंडी, शिव शाहू आघाडीला चित करत निर्णायक विजय, पाहा विजयी उमेदवारांची पूर्ण यादी
इचलकरंजी महापालिकेत भाजपची मुसंडी, शिव शाहू आघाडीला चित करत निर्णायक विजय, पाहा विजयी उमेदवारांची पूर्ण यादी
Ravindra Waikar : खासदार रवींद्र वायकर यांची जोगेश्वरीत पाटी कोरी, अनंत (बाळा) नर यांनी मैदान मारलं, मनसेच्या एका उमेदवारासह 8 उमेदवार निवडून आणले
रवींद्र वायकर यांना धक्का, अनंत (बाळा) नर यांनी मैदान मारलं, मनसेच्या एका उमेदवारासह 8 उमेदवार निवडून आणले
देवेंद्र फडणवीसांनी शिवाजी पार्कवरील सभेत नाव घेतलेल्या शीतल गंभीर 125 मतांनी जिंकल्या; रिकाऊंटींगची मागणी
देवेंद्र फडणवीसांनी शिवाजी पार्कवरील सभेत नाव घेतलेल्या शीतल गंभीर 125 मतांनी जिंकल्या; रिकाऊंटींगची मागणी
Pune Elections Results 2026: मोठी बातमी :  दादांच्या 'स्ट्रॅटेजी'चा विजय, पुणेकरांनी जेलमधील आंदेकर गँगच्या लक्ष्मी आणि सोनालीला जिंकवलं!
दादांच्या 'स्ट्रॅटेजी'चा विजय, पुणेकरांनी जेलमधील आंदेकर गँगच्या लक्ष्मी आणि सोनालीला जिंकवलं!
वडील महापालिकेत शिपाई, पोरानं उधळला गुलाल; शिपायाचा लेक रेशीमबागेतून शिवसेनेचा नगरसेवक
वडील महापालिकेत शिपाई, पोरानं उधळला गुलाल; शिपायाचा लेक रेशीमबागेतून शिवसेनेचा नगरसेवक
Jalgaon Election Result 2026 Winners: कारागृहात असून ललित कोल्हेंचा विजय, शिंदेंच्या शिलेदाराने दाखवली ताकद, जळगावात 'कोल्हे' पॅटर्न चर्चेत!
कारागृहात असून ललित कोल्हेंचा विजय, शिंदेंच्या शिलेदाराने दाखवली ताकद, जळगावात 'कोल्हे' पॅटर्न चर्चेत!
Navi Mumbai Election Result : गणेश नाईकांकडून एकनाथ शिंदेंचा 'टांगा पलटी, घोडे फरार', नवी मुंबईत भाजपचे एकतर्फी वर्चस्व
गणेश नाईकांकडून एकनाथ शिंदेंचा 'टांगा पलटी, घोडे फरार', नवी मुंबईत भाजपचे एकतर्फी वर्चस्व
Embed widget