Continues below advertisement
आफताब शेख, एबीपी माझा

आफताब शेख हे एबीपी माझा वृत्त वाहिनीत सिनिअर करस्पॉन्डट म्हणून कार्यरत आहेत. मागील 9 वर्षांपासून एबीपी माझाच्या माध्यमातून कार्यरत असून आपल्या संवेदनशील आणि निष्पक्ष पत्रकारितेने त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. 3 जुलै 2017 रोजी मुंबई येथील एबीपी माझाच्या मुख्य कार्यालयातून त्यांनी पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. फेब्रुवारी 2019 पासून ते सोलापूर येथे सिनिअर करस्पॉन्डन्ट म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत.

सोलापूरच्या राजकीय घडामोडींपासून सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय, औद्योगिक, मनोरंजन, क्रीडा आणि व्यावसायिक क्षेत्रांतील महत्त्वाच्या विषयांना त्यांनी एबीपी माझाच्या माध्यमातून राज्यस्तरीय व्यासपीठ मिळवून दिले आहे. ‘कामगारांचे शहर‘ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूरमधील कामगारांचे प्रश्न, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या आणि उपेक्षित घटकांचा आवाज शासनदरबारी पोहोचवण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहिला आहे. बहुभाषिक आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेल्या सोलापूरचा इतिहास, परंपरा आणि वर्तमानही त्यांनी आपल्या वार्तांकनातून प्रभावीपणे मांडले आहे. कोरोना काळात कोविड वॉर्डमध्ये प्रत्यक्ष जाऊन रुग्णांच्या व्यथा आणि आरोग्य व्यवस्थेतील वास्तव समोर आणला तर महापूर-दुष्काळातील रिपोर्ट्समधून त्यांनी आपल्या संवेदनशील पत्रकारितेचा प्रत्यय दिला. सोलापूरसह मुंबई, पुणे, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतही त्यांनी वार्तांकन केले आहे.

त्यांनी सोलापूरच्या दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयातून कला शाखेची पदवी, तर मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. पत्रकारितेसोबतच सामाजिक कार्याचीही त्यांना विशेष आवड आहे. महाविद्यालयीन जीवनातील सामाजिक योगदानासाठी 2016 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय सेवा योजना पुरस्काराने (Indira Gandhi NSS Award-2016) सन्मानित करण्यात आले. याशिवाय, पत्रकारितेतील योगदानासाठी त्यांना विविध संस्था आणि संघटनांकडून अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
 

टॉप स्टोरीज फ्रॉम आफताब शेख, एबीपी माझा

सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांसह पाच नव्या चेहऱ्यांना संधी
सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
मोठी बातमी! सोलापुरात भाजपने कमी जागा दिल्या, शिंदेंच्या शिवसेनेची राष्ट्रवादीसोबत युती; भाजपविरुद्ध फॉर्म्युलाही ठरला
धक्कादायक! महापालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या पारलिंगी व्यक्तीची सोलापुरात हत्या, संशयित आरोपी CCTV मध्ये कैद
मोठी बातमी! सोलापूर महापालिकेसाठी मविआचा फॉर्म्युला निश्चित; काँग्रेसला 45 जागा, शिवसेनेत वादाची ठिणगी
मोठी बातमी: काँग्रेसची घोडदौड सुरु, कोल्हापुरात 48, सोलापूरमध्ये 20 उमेदवार जाहीर!
भाजपच्या निष्ठावंतांना तिकीट न मिळाल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार, भाजप आमदाराचं मोठं वक्तव्य  
टेम्पोची अन् दुचाकीची धडक; दोन जिवलग मैत्रिणीचा अपघातात मृत्यू; एकीचा जागीच तर दुसरीचा उपचारादरम्यान...
काँग्रेस 50, ठाकरे गट 27, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला किती जागा? सोलापुरातील महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा संभाव्य फॉर्म्युला समोर
रूममध्ये झाडू मारायला दिला नकार, 11 वीच्या विद्यार्थ्याला तब्बल तीन तास स्टम्पने बेदम मारहाण; सोलापुरात रॅगिंगचा भयानक प्रकार
कपड्याला शी लागल्याने संतापला, अकबरने प्रेयसीच्या चिमुकल्या मुलाला गळा दाबून संपवलं, सोलापूर हादरलं
CA कार्यालयात 7 हजार पगाराने काम, 22 व्या वर्षी उमेदवारी, भाजपाच्या तगड्या उमेदवाराला हरवलं, सर्वात तरुण नगराध्यक्ष सिद्धी वस्त्रेची कहाणी
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
सोलापुरातील निकालाची वैशिष्ट्ये; भाजपला अति-आत्मविश्वास नडला; शहाजी बापूंनी दाखवली कमाल
सोलापूर, बीड, धाराशिवमध्ये कोणाची बाजी, भाजपचे कुठे नगराध्यक्ष? शिंदेंनाही घवघवीत यश
बॉईज हॉस्टेलमध्येच इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल, वडिलांचा फोन येताच भयंकर घटनेचा उलगडा, सोलापूरमध्ये खळबळ
बोरामणीत सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह, मातीत दडलेला दोन हजार वर्षांपूर्वीचा प्राचीन ठसा उजेडात, रोमन कनेक्शन समोर
दिलीप मानेंचा भाजपमध्ये प्रवेश, सुभाष देशमुख म्हणाले त्यांच्या प्रवेशाला मी होकार दिला नाही
बीडमधील कुंटणखान्याच्या मालकाशी सुषमा अंधारेंचं कनेक्शन, कला केंद्रात अंधारे आडनावाच्या मुली, ज्योती वाघमारेंचा गंभीर आरोप
1922 साली बांधण्यात आलेला सोलापुरातील रेल्वे पूल अखेर इतिहासजमा,  35  कोटी खर्चून नवीन पूल होणार 
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
सोलापुरात दोन ठिकाणी भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू, आजोबा-नातवासह दोन मित्रांवर काळाचा घाला
सासरच्या मंडळींकडून चारित्र्यावर संशय, सततच्या त्रासाला कंटाळून पत्नीचं टोकाचं पाऊल, सोलापूरच्या मोहोळमध्ये खळबळ
अनैतिक संबंधांना विरोध करणाऱ्या पत्नीचा पतीने काढला काटा, कडाक्याचं भांडण झालं अन्...; सोलापूरमध्ये खळबळ
Sponsored Links by Taboola