भाजपच्या निष्ठावंतांना तिकीट न मिळाल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार, भाजप आमदाराचं मोठं वक्तव्य
भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भाजपच्या निष्ठावंतांना तिकीट न मिळाल्यास ते ज्या पक्षात जातील त्यांचा प्रचार आम्ही करणार असल्याची भूमिका जगताप यांनी घेतली आहे.
Subhash Deshmukh : राज्यातील मुदत संपलेल्या 27 महापालिकाची आणि नव्यानं तयार झालेल्या 2 महापालिका अशा एकूण 29 महापालिकांसाठी या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 या दिवशी मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक नेत्यांचे पदाधिकाऱ्यांचे भाजपमध्ये प्रवेश होताना दिसत आहेत. सोलापुरात देखील मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये प्रवेश झाले आहेत. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या संदर्भात सोलापुरातील भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भाजपच्या निष्ठावंतांना तिकीट न मिळाल्यास ते ज्या पक्षात जातील त्यांचा प्रचार आम्ही करणार असल्याची भूमिका जगताप यांनी घेतली आहे.
आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांचा 'निष्ठावंत पॅटर्न' सुरु
महापालिका निवडणुकीसाठी भाजप आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांचा 'निष्ठावंत पॅटर्न' सुरु झाला आहे. भाजपच्या निष्ठावंतांना तिकीट न मिळाल्यास ते ज्या पक्षात जातील त्यांचा प्रचार आम्ही करणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. भाजप आमदार सुभाष देशमुख यांचे मोठे विधान केल्यामुळं त्यांच्या या वक्तव्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. जर भाजपमधून आमच्या निष्ठावान कार्यकर्त्याला तिकीट मिळाले नाही तर ते महायुतीतील इतर पक्षात जातील आणि आम्ही त्याचा प्रचार करु असे देशणुख म्हणाले.
पंधरा दिवसांपूर्वी पक्षात आलेले लोक आमच्या उमेदवारांच्या मुलाखती घेतायेत
पंधरा दिवसांपूर्वी पक्षात आलेले लोक आमच्या उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत असे सुभाष देशमुख म्हणाले. या निवडणुकीत उमेदवार किती खर्च करणार किंवा त्याची किती क्षमता आहे याबाबत मुलाखतीतून विचारणा होते याचं आश्चर्य वाटतं असल्याचे मत सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले. भाजपमध्ये अशा पद्धतीने किती खर्च करणार हे विचारण्याची पद्धत नव्हती आणि नाही असे देशमुख म्हणाले.
जागांच्या वाटघाटी हे केवळ पालकमंत्री जयकुमार गोरे करतायेत
निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्यास ते कुठल्याही पक्षातून उभे राहू दे आम्ही कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहणार असल्याची भूमिका आमदार विजयुकाम देशमुख यांनी घेतली आहे. आमदार सुभाष देशमुख यांनी देखील हीच भूमिका घेतली आहे. निवडणूक समितीत कोण-कोण आहेत मला माहिती नाही. त्यामुळे जागांच्या वाटघाटी हे केवळ पालकमंत्री जयकुमार गोरे करत आहेत. कोणाशी चर्चा करायच्या हे माहिती नसल्याने मी कुठेही चर्चेला गेलो नसल्याचे मत विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या:























