Continues below advertisement
आफताब शेख, एबीपी माझा

आफताब शेख हे एबीपी माझा वृत्त वाहिनीत सिनिअर करस्पॉन्डट म्हणून कार्यरत आहेत. मागील 9 वर्षांपासून एबीपी माझाच्या माध्यमातून कार्यरत असून आपल्या संवेदनशील आणि निष्पक्ष पत्रकारितेने त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. 3 जुलै 2017 रोजी मुंबई येथील एबीपी माझाच्या मुख्य कार्यालयातून त्यांनी पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. फेब्रुवारी 2019 पासून ते सोलापूर येथे सिनिअर करस्पॉन्डन्ट म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत.

सोलापूरच्या राजकीय घडामोडींपासून सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय, औद्योगिक, मनोरंजन, क्रीडा आणि व्यावसायिक क्षेत्रांतील महत्त्वाच्या विषयांना त्यांनी एबीपी माझाच्या माध्यमातून राज्यस्तरीय व्यासपीठ मिळवून दिले आहे. ‘कामगारांचे शहर‘ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूरमधील कामगारांचे प्रश्न, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या आणि उपेक्षित घटकांचा आवाज शासनदरबारी पोहोचवण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहिला आहे. बहुभाषिक आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेल्या सोलापूरचा इतिहास, परंपरा आणि वर्तमानही त्यांनी आपल्या वार्तांकनातून प्रभावीपणे मांडले आहे. कोरोना काळात कोविड वॉर्डमध्ये प्रत्यक्ष जाऊन रुग्णांच्या व्यथा आणि आरोग्य व्यवस्थेतील वास्तव समोर आणला तर महापूर-दुष्काळातील रिपोर्ट्समधून त्यांनी आपल्या संवेदनशील पत्रकारितेचा प्रत्यय दिला. सोलापूरसह मुंबई, पुणे, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतही त्यांनी वार्तांकन केले आहे.

त्यांनी सोलापूरच्या दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयातून कला शाखेची पदवी, तर मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. पत्रकारितेसोबतच सामाजिक कार्याचीही त्यांना विशेष आवड आहे. महाविद्यालयीन जीवनातील सामाजिक योगदानासाठी 2016 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय सेवा योजना पुरस्काराने (Indira Gandhi NSS Award-2016) सन्मानित करण्यात आले. याशिवाय, पत्रकारितेतील योगदानासाठी त्यांना विविध संस्था आणि संघटनांकडून अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
 

टॉप स्टोरीज फ्रॉम आफताब शेख, एबीपी माझा

सोलापुरात 100 वर्ष जुना पूल पाडणार, इंद्रायणी, उद्यान, कन्याकुमारी, कोणार्कसह बहुसंख्य रेल्वेंचे मार्ग बदलले, काही गाड्या रद्द!
तृतीयपंथीयाला प्रेमप्रकरणात फसवलं, 12 वर्षांच्या संबंधांचा जीवघेणा 'द एन्ड'; गुरू अन् नातेवाईकांचे गंभीर आरोप
दुःखद बातमी! ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे निधन; वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
सोलापूर जिल्ह्यात दोस्तीत कुस्ती! दहा पैकी सात ठिकाणी भाजप अन् शिवसेना आमने-सामने; दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
अनगरची निवडणूक स्थगित, निवडणूक आयोगाचे निर्देश; राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंची पहिली प्रतिक्रिया
निवडणूक स्थगित, उज्वला थिटेंना नगराध्यक्षपदी अर्ज भरता येणार का? तहसीलदारांनी स्पष्टच सांगितलं
मोठी बातमी! अनगरच्या निवडणुकीला स्थगिती पण राजन पाटलांना धक्का नाहीच; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाने काय बदललं?
राज्यभर चर्चा झालेल्या अनगर नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाची निवडणूक स्थगित; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा आदेश
धक्कादायक! तुळजापूरला निघालेल्या नवदाम्पत्याच्या कारचा भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू 
धमक्या कोणी देऊ नये, कार्यकर्त्यांचे संरक्षण करण्याची ताकद भाजपमध्ये, जयकुमार गोरेंचा नाव न घेता अजित पवारांना टोला
राजन पाटील विस्थापित नेते, त्यांच्या मुलाने कुणालातरी आव्हान दिलं याचं बरं वाटलं; सदाभाऊ खोतांचा अजितदादांना टोला
सोलापूरच्या एसटी स्टॅन्डची दुरावस्था पाहून परिवहन मंत्र्यांचा संताप, प्रताप सरनाईकांनी आगार प्रमुखाला केलं जागेवर निलंबित
काँग्रेसमध्ये काहीही शिल्लक राहिलेलं नाही, वडेट्टीवारांनी धनुष्यबाण घेऊन सत्तेत यावं, मंत्री सामंतांची खुली ऑफर 
सुरुवातीला भडकले अन् नंतर मुश्किल टोलेबाजी; उपमुख्यमंत्री अजित दादांनी कुर्डूवाडीची सभा गाजवली
मस्ती असलेल्या लोकांना खड्यासारखं बाजूला काढलं जातं, प्रत्येकाचा फुगा फुटत असतो; अजित पवारांचा राजन पाटलांवर हल्लाबोल
खेळताना ट्रॅक्टरवर चढला, चुकून गिअर पडला अन् क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; बार्शीत 4 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू
माझं संतोष देशमुखांसारखं झालं तर माझा मुलगा पाटील कुटुंबाशी लढेल; कोर्टाच्या निकालानंतर उज्ज्वला थिटे आक्रमक
अनगर नगरपरिषदेतील वाद, कोर्टाने अर्ज फेटाळल्यानंतर उज्वला थिटे अन् वकिलांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
धक्कादायक! वरिष्ठांचा जाच, ग्रामसेवकाने संपवलं जीवन; कुटुंबीयांचा पोलिसांपुढे आक्रोश, मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे टोकाचे पाऊल; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप; सोलापुरातील घटना
उपसरपंचाला नादाला लावून आयुष्यातून उठवणाऱ्या नर्तिका पूजा गायकवाडला जामीन मंजूर
मोठी बातमी : दोन मित्रांनी गळ्याला दोरी लावली, आधी गोरख गेला, मग दु:ख सहन न झाल्याने सुरेशनेही जीवन संपवलं, सोलापूर हादरलं
पंडित देशमुख हत्या प्रकरण! बाळराजे पाटीलला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, उमेश पाटलांचा हल्लाबोल
Sponsored Links by Taboola