एक्स्प्लोर

Nandi Bull In The Temple : भगवान शंकराचं वाहन नंदी; पण मंदिरात नंदी असण्यामागचं शास्त्रीय कारण तुम्हाला माहीत आहे का?

Nandi Bull In The Temple : आपल्या हिंदू संस्कृतीत प्रत्येक देवाचं एक वाहन आहे. जसं गणपतीचं उंदीर तसंच भगवान शंकराचं वाहन हे नंदी बैल आहे.

Nandi Bull In The Temple : आपण जेव्हा मंदिरात (Temple) जातो तेव्हा तिथे वेगवेगळ्या प्रतिकांची मांडणी केलेली असते. या माध्यमातून आपल्याला एक विशिष्ट सांस्कृतिक संदेश देण्याचा प्रयत्न प्राचीन ऋषिमुनींनी केला आहे. असंच एक प्रतीक म्हणजे भगवान शंकराच्या  मंदिरात ठेवलेला नंदी बैल आहे. हा नंदी बैल पाहून मंदिरात नेमका नंदी बैल का असतो? असा प्रश्न तुम्हालाही पडतो का? याच विषयी अधिक माहिती जाणून घेऊयात. 

खरंतर, आपल्या हिंदू संस्कृतीत प्रत्येक देवाचं एक वाहन आहे. जसं गणपतीचं उंदीर तसंच भगवान शंकराचं वाहन हे नंदी बैल आहे. बैलाला नंदी म्हटलं जातं. नंदी म्हणजे आनंदस्वरूप. देवाला आनंदस्वरूप असणारं वाहन आवडते. देवाजवळ जाण्यास आणि त्याचे वाहन झाल्यामुळे जीवन आनंदस्वरूप होऊ शकते असा नंदिचा संदेश आहे. 

भगवान शंकराचं वाहन नंदी 

नंदी म्हणजे वृषभ- बैल. भगवान शंकराने बैलाला वाहन म्हणून स्विकारलं आहे. आपल्या या शेतीप्रधान देशामध्ये बैलाचेच महत्त्वाचे स्थान आहे. सामान्यतः शांत राहणाऱ्या बैलाचे चरित्र उत्तम आणि समर्पण भाव असणारे सांगण्यात आलं आहे. याच्या व्यतिरिक्त तो बल आणि शक्ती यांचं प्रतिक आहे. बैलाला मोह माया आणि भौतिक सुखांपासून अलिप्त राहणारा प्राणी देखील मानले जाते. हा साधा सज्जन प्राणी जेव्हा भडकतो तेव्हा तो सिंहाला देखील भिडतो. हीच सर्व करणे आहेत ज्यामुळे बैलाला भगवान शंकराने आपले वाहन म्हणून निवडले आहे. शंकराचे चरित्र देखील बैलाप्रमाणेच मानलं गेलं आहे.

'ही' आहेत शास्त्रीय कारणं...

  • मानवाच्या सृष्टीमध्ये अस्तित्वात असलेल्या प्राण्यांकडे अभिमानाने पाहण्याचा आणि जीवन उत्क्रांतीचा दृष्टिकोन विकसित करण्याचाही संस्कृती निर्मात्यांचा प्रयत्न आहे. हंस, मोर, गरूड, उंदीर इत्यादी देवांचे वाहन म्हणून दाखविण्यात आले. जीवनाच्या समृद्धीसाठी सृष्टीबद्दल आत्मीयता आणि आदराची भावना गरजेची आहे. 
  • नांगराला जोडल्यामुळे धान्य उगवण्यास माणसाला मदत होते. मांसाहाराकडून त्याला शाकाहाराकडे वळविण्याच्या ऋषिमुनींच्या प्रयत्नामध्ये बैलाचा लहानसा हिस्सा आहे. हा लहानसा पण महत्त्वाचा हिस्सा घेतल्याने त्याला देवाजवळ स्थान मिळालं आहे. 
  • नंदी म्हणजे बैल, भागवतकार महर्षि वेदव्यास यांनी भागवतमध्ये बैलाला रूपक देऊन धर्माचे महत्त्व सांगितलं आहे. बैलाला धर्माचे प्रतिक मानले आहे. म्हणजेच देवाचे स्वत:चे वाहन म्हणून धर्माला ठेवले आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Aries April Horoscope 2024 : मेष राशीचा एप्रिल महिना खर्चिक; नोकरी-व्यवसाय कसा राहणार? मासिक राशीभविष्य जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Budh Vakri 2026 : 24 ऑक्टोबरला बुध ग्रहाची वक्री चाल; 'या' 3 राशींची होणार छप्परफाड कमाई, बुधाच्या संक्रमणाने धनसंपत्तीत होणार भरभराट
24 ऑक्टोबरला बुध ग्रहाची वक्री चाल; 'या' 3 राशींची होणार छप्परफाड कमाई, बुधाच्या संक्रमणाने धनसंपत्तीत होणार भरभराट
Dussehra 2026 : 20 की 21 ऑक्टोबर? दसरा नेमका कधी साजरा करायचा? वाचा धार्मिक महत्त्व आणि रावण दहनाचा शुभ मुहूर्त
20 की 21 ऑक्टोबर? दसरा नेमका कधी साजरा करायचा? वाचा धार्मिक महत्त्व आणि रावण दहनाचा शुभ मुहूर्त
Vastu Tips : घरात 'या' 7 ठिकाणी तुळशीचं रोप अजिबात ठेवू नका, घरात येईल कंगाली, वास्तूशास्त्रानुसार 'ही' दिशा योग्य
घरात 'या' 7 ठिकाणी तुळशीचं रोप अजिबात ठेवू नका, घरात येईल कंगाली, वास्तूशास्त्रानुसार 'ही' दिशा योग्य
Trigrahi Yog 2026 : अवघ्या काही तासांतच होणार सूर्य-बुध-शुक्राची युती; 3 राशींकडे पैसा आकर्षित होणार, नशीब बदलायला अवघे काही तास शिल्लक
अवघ्या काही तासांतच होणार सूर्य-बुध-शुक्राची युती; 3 राशींकडे पैसा आकर्षित होणार, नशीब बदलायला अवघे काही तास शिल्लक

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
UP News : एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
Ind Vs WI 5th T20 : सलग 4 मॅच बेंचवर बसवलं, वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटच्या समान्याआधी वैभव सूर्यवंशीची फक्त 2 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
सलग 4 मॅच बेंचवर बसवलं, वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटच्या समान्याआधी वैभव सूर्यवंशीची फक्त 2 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
Mhada Pune Lottery : म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4462 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ पण महाआयटीच्या सेवा बंद असल्यानं अर्जदार हवालदिल, पुन्हा मुदतवाढ मिळणार?
म्हाडाच्या पुणे मंडळाकडून लॉटरीसाठी मुदतवाढ, महा आयटी सेवा डाऊन असल्यानं डोमिसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्यांची मंजुरी रखडली, अर्जदार चिंतेत
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
IND vs WI 5th T20 Rain : विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?
विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?
Thane News: ठाण्यात उन्नत मार्गासाठी उभारलेला लोखंडी सांगाडा कोसळला, PHOTO
Thane News: ठाण्यात उन्नत मार्गासाठी उभारलेला लोखंडी सांगाडा कोसळला, PHOTO
Embed widget