(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Weekly Horoscope 9-15 oct 2023: 'या' राशींसाठी हा आठवडा भाग्याचा! चांगली बातमी मिळेल, उत्पन्नात वाढ होईल
Weekly Horoscope 9-15 oct 2023: ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात अनेक राशींना यश मिळणार आहे. जाणून घ्या या भाग्यशाली राशींबद्दल.
Weekly Horoscope 9-15 oct 2023 : 9 ऑक्टोबरपासून सुरू होणारा नवीन आठवडा अनेक राशींसाठी सकारात्मक परिणाम घेऊन आला आहे. या आठवड्यात अनेक राशींना यश मिळणार आहे. जाणून घ्या या भाग्यशाली राशींबद्दल.
काही राशींसाठी हा आठवडा खूप फलदायी
आज म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा दुसरा आठवडा 9 ऑक्टोबरपासून सुरू होईल. काही राशींसाठी हा आठवडा खूप फलदायी असणार आहे. काही राशींना या आठवड्यात चांगली बातमी मिळेल. साप्ताहिक राशिभविष्यातून या आठवड्यातील भाग्यशाली राशींबद्दल जाणून घ्या.
मेष
या राशीसाठी येणारा आठवडा खूप चांगला जाणार आहे. या आठवड्यात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. आर्थिक क्षेत्रात तुम्हाला काही चांगली बातमी मिळेल. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या पगारातही वाढ होण्याची चिन्हे आहेत.
अचानक लाभ होण्याची शक्यता
मेष राशीच्या लोकांसाठी जे कोणत्याही व्यवसायात आहेत, त्यांना या आठवड्यात अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला बढती मिळण्याचीही शक्यता आहे. काही लोक या आठवड्यात स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात. प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. या आठवड्यात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील असे संकेत आहेत.
सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप चांगला जाणार आहे. तुम्ही तुमचे काम पूर्ण समर्पणाने कराल, ज्याचा तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल. या आठवड्यात तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा असेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. नशीब तुमच्या बाजूने असेल.
नशीब तुमच्या बाजूने असेल
सिंह राशीच्या लोकांना या आठवड्यात सर्व बाबतीत यश मिळेल. कामानिमित्त सहलीला जावे लागेल. परदेश प्रवासाचीही शक्यता आहे. नोकरीत चांगली कामगिरी कराल. या आठवड्यात तुम्हाला जुन्या आजारातून बरे होण्याची संधी मिळेल. तुमची सर्व अपूर्ण कामे पूर्ण होतील. व्यवसायाच्या दृष्टीने हा आठवडा शुभ राहील.
कन्या
कन्या राशीच्या लोकांना या आठवड्यात उत्पन्नाच्या नवीन संधी मिळतील. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामधील परस्पर समंजसपणा वाढेल. नात्यातील मतभेद या आठवड्यात दूर होतील. या आठवड्यात तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात चांगली बातमी ऐकायला मिळेल.
पैसे कमावण्याच्या नवीन संधी मिळतील
कन्या राशीचे लोक या आठवड्यात आपले ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करतील. पैसे कमावण्याच्या नवीन संधी मिळतील. या आठवड्यात तुम्हाला आर्थिक स्तरावर यश मिळेल. ऑफिसमधील वरिष्ठ व्यक्तीची मदत मिळू शकते. हा आठवडा तुमच्यासाठी उर्जेने परिपूर्ण असेल.
धनु
या आठवड्यात धनु राशीचे लोक बचतीवर पूर्ण भर देतील, त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती लक्षणीयरीत्या सुधारेल. तुमच्या मेहनतीला फळ मिळेल. या आठवड्यात तुमचे संपूर्ण लक्ष आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यावर असेल. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये नवीन सुरुवात करू शकता. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळू शकते.
ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न कराल
या आठवड्यात धनु राशीच्या लोकांमध्ये एक नवीन ऊर्जा संचारेल. तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न कराल. या आठवड्यात तुम्ही तुमचे करिअर किंवा व्यवसाय नवीन उंचीवर नेण्याचा प्रयत्न कराल. तुमचे आरोग्यही सुधारेल. आनंददायी आणि लाभदायक प्रवास कराल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :