Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींसाठी डिसेंबरचा दुसरा आठवडा नशीब पालटणारा! कोणत्या राशी होतील मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 8 To 14 December 2025 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी डिसेंबरचा पहिला आठवडा कसा असणार? व्यवसाय, करिअर, आरोग्य, लव्ह लाईफ कशी असेल? तूळ ते मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 8 To 14 December 2025 : ज्योतिषशास्त्रानुसार, 2025 वर्षाचा शेवटचा महिना डिसेंबर (December 2025) सध्या सुरु आहे. लवकरच डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्याला सुरुवात होणार आहे. हा आठवडा अनेकांचे भाग्य बदलणार आहे. कारण या आठवड्यात अनेक शुभ ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे हा नवा आठवडा अनेक राशींसाठी भाग्यशाली असणार आहे. डिसेंबरचा पहिला आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? यासाठी तूळ ते मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीच्या लोकांनी आठवड्याच्या सुरुवातीला सावधानता बाळगण्याची गरज आहे. या काळात वाहन चालवताना काळजी घ्या. तसेच, नियमांचं पालन करा. हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करा. या आठवड्यात तुम्हाला मानसिक ताण जाणवणार आहे. यासाठी योग किंवा ध्यान करणं तुमच्यासाठी सोयीचं राहील. नवीन कार्य हाती घेताना तुम्हाला अनेक आव्हानं समोर येतील. तसेच, नात्यात तणाव दिसून येईल. पैशांचा व्यवहार जपून करा.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
नवीन आठवड्यात वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अनेक संधी चालून येतील. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा तुमच्यासाठी शुभकारक असणार आहे. कुटुंबियांबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवाल. तसेच, ऑफिसमध्येही सकारात्मक वातावरण पाहायला मिळेल. तुमच्या घरात आनंदाचं वातावरण पाहायला मिळेल. कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागू शकतो. पण, हा प्रवास सुखाचा राहील.
धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)
धनु राशीसाठी डिसेंबरचा दुसरा आठवडा चढ-उतारांचा असणार आहे. या काळात तुम्हाला आर्थिक बाबतीत सावधानता बाळगण्याची गरज आहे. तसेच, प्रोफेशनल लाईफमध्ये तुम्हाला बॅलेन्स साधावा लागेल. जीवनातील प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला यश मिळेल. फक्त सावधानता बाळगणं गरजेचं आहे. वाहन खरेदी करताना काळजी घ्या. तसेच, कोणाच्या अध्यात मध्यात कारण नसताना पडू नका.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या काळात तुमचे नातेवाईकांशी, मित्रांशी असलेले संबंध सामान्य असतील. पैशांच्या बाबतीत व्यवहार करताना सावधानता बाळगा. तसेच, उत्पन्नाचे अनेक नवे स्त्रोत खुले होतील. प्रवास करताना काळजी घ्यावी लागेल. प्रोफेशनल लाईफमध्ये तुम्हाला बॅलेन्स साधण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या वाढतील.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीसाठी डिसेंबरचा दुसरा आठवडा काहीसा सामान्य असणार आहे. या काळात प्रॉपर्टीच्या संबंधी तुमचे वाद लवकरच मिटतील. घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. तसेच, भावा-बहिणीतील संबंध अधिक दृढ होतील. करिअरमध्ये तुम्हाला चांगलं यश मिळेल. लवकरच परदेशात जाण्याची संधी चालून येईल. वैवाहिक जीवनात गोडवा टिकून राहील.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
मीन राशीसाठी नवीन आठवडा सावधानतेचा असणार आहे. या काळात तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तसेच, विनाकारण पैसे खर्च करु नका. करिअरच्या बाबतीत कोणताही निर्णय घेताना सावधानता बाळगा. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला अस्वस्थ वाटेल. अशा वेळी ध्यान आणि योगासन करणं गरजेचं आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :




















