Weekly Lucky Zodiacs : नवीन आठवडा 'या' 5 राशींसाठी ठरणार भाग्याचा; बँक बॅलन्स वाढणार, उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार
Weekly Lucky Zodiacs 6 May to 12 May : मे महिन्याचा दुसरा आठवडा 5 राशींसाठी खूप भाग्याचा ठरणार आहे. या 5 राशींना अनेक सुखसोयी मिळतील आणि त्यांच्या उत्पन्नातही वाढ होईस, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घ्या
Weekly Horoscope 6 May to 12 May Lucky Zodiacs : नवीन आठवडा काही राशींसाठी भाग्याचा असणार आहे. 6 मेपासून नवीन आठवडा सुरू होत आहे. हा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. मुख्यत: 5 राशींसाठी नवीन आठवडा (Weekly Horoscope) लाभदायी असेल, या 5 राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा खूप भाग्याचा असणार आहे. या आठवड्यात तुम्ही एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट देऊ शकता. या आठवड्यात तुम्ही मालमत्ता किंवा वाहन यासारखी मोठी वस्तू देखील खरेदी करू शकता. लोक तुमच्यासाठी पुढे येतील. ऑफिसमध्ये लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील. तुम्हाला तुमच्या प्रियकरासोबत जास्त जवळीक पाहायला मिळेल.
मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. या आठवड्यात तुमच्या अनेक समस्या दूर होतील. घरातील आणि बाहेरचेही लोक तुम्हाला साथ देतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला राहील, तुमची प्रलंबित कामं पूर्ण होतील आणि तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्याची योजना देखील करू शकता.
सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला जाईल. या आठवडयात तुमचा फिरायला जायचा प्लॅन किंवा वैयक्तिक काम नीट पार पडेल. या आठवड्यात तुम्ही भविष्याची योजना आखून त्यासाठी काम करू शकता. तुमचे आयुष्य सुरळीत येईल. हा काळ तुमच्यासाठी शुभ आहे.
वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला जाईल. हा आठवडा तुमच्यासाठी खूप आनंदाचे क्षण घेऊन येईल. या आठवड्यात तुम्हाला यशाच्या अनेक संधी मिळतील. तुम्हाला प्रमोशन मिळू शकतं. तुमच्या प्रियकराकडून एखादं सरप्राईज गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. जर कोर्टात केस चालू असेल तर निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो.
मीन रास (Pisces)
मीन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभ राहील, या आठवड्यात तुम्हाला प्रेमात आणि कामात दोन्हीकडे नशिबाची साथ मिळेल. तुमचा बराच काळ अडकलेला पैसा या आठवड्यात तुम्हाला परत मिळू शकतो, तुम्हाला तुमच्या मेहनतीचं योग्य फळ मिळेल. या आठवड्यात तुम्ही प्रवास करू शकता, जो तुमच्यासाठी फलदायी ठरेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :