Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्याचे; नशीब सोन्यासारखं उजळणार, होणार अपार धनलाभ
Weekly Lucky Zodiacs 30 September To 06 October : ऑक्टोबरचा पहिला आठवडा 5 राशींसाठी खूप भाग्याचा ठरणार आहे. या 5 राशींचं आयुष्य सुखसोयींनी भरलेलं असेल आणि त्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल, या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घ्या.
Weekly Horoscope 30 September To 06 October Lucky Zodiacs : ऑक्टोबरचा पहिला आठवडा काही राशींसाठी भाग्याचा असणार आहे. खरं तर, 30 सप्टेंबरपासून महिन्याचा नवीन आठवडा सुरू झाला आहे. या आठवड्यात बुधादित्य राजयोगासह (Budhaditya Rajyog) अनेक शुभ योग तयार होत आहेत, हा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. मुख्यत: 5 राशींसाठी नवीन आठवडा (Weekly Horoscope) लाभदायी असेल, या 5 राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
ऑक्टोबरचा पहिला आठवडा कर्क राशीच्या लोकांसाठी एकंदर सुख, समृद्धी आणि यश घेऊन येणार आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या करिअर आणि व्यवसायात प्रगती करण्याच्या अनेक चांगल्या संधी मिळतील. जे अनेक दिवसांपासून नोकरीच्या शोधात होते त्यांना या आठवड्याच्या अखेरीस अपेक्षित संधी मिळू शकतात. जर तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत असाल तर तुमची योजना फलदायी ठरेल. मित्र किंवा एखाद्या व्यक्तीच्या मदतीने तुम्ही सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकाल. मार्केटिंग आणि कमिशनशी संबंधित काम करणाऱ्यांसाठी हा आठवडा खूप शुभ असणार आहे. पण या आठवड्यात बदलत्या हवामानाचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
सिंह राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला नोकरीत वरिष्ठांकडून कौतुक ऐकायला मिळेल. राजकारणाशी संबंधित लोकांना इच्छित पद किंवा महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. तुमच्यातील नेतृत्वगुण विकसित होतील. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अनुकूल परिणाम मिळाल्याने तुमचा उत्साह वाढू शकतो. अडकलेले पैसे पुन्हा मिळाल्याने तुम्ही सुटकेचा नि:श्वास सोडाल. व्यवसायाचा विस्तार करण्याची संधी तुम्हाला मिळेल. जर तुम्ही खूप दिवसांपासून जमीन किंवा इमारत खरेदी-विक्रीची योजना आखत असाल तर तुमची इच्छा आज पूर्ण होऊ शकते. जर तुम्ही एखाद्याला प्रपोज करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला होकारार्थी उत्तर मिळेल. जे आधीपासून प्रेमसंबंधात आहेत त्यांना लग्नासाठी कुटुंबाकडून मान्यता मिळू शकते.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीच्या लोकांचा हा आठवडा चांगला जाणार आहे. या आठवड्यात तुमची सर्व प्रलंबित कामं वेळेवर पूर्ण होतील. जे लोक आपल्या इच्छित पदोन्नती किंवा बदलीसाठी बऱ्याच काळापासून वाट पाहत आहेत, त्यांची इच्छा या आठवड्यात पूर्ण होऊ शकते. नोकरदार लोकांसाठी दिवस चांगला जाणार आहे. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचंही पूर्ण सहकार्य मिळेल. काही प्रभावशाली व्यक्तींच्या मदतीने तुम्ही जमीन आणि घराशी संबंधित वाद सोडवण्यात यशस्वी व्हाल. परीक्षा स्पर्धांची तयारी करणाऱ्या लोकांना चांगलं यश मिळू शकतं. मुलांच्या यशामुळे घरात आनंदाचं वातावरण राहील. लव्ह लाईफबद्दल बोलायचं झालं तर, जे लोक आपल्या प्रेमाच्या नात्याचे रूपांतर लग्नात करण्याचा विचार करत आहेत, त्यांची इच्छा या आठवड्यात पूर्ण होईल.
धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)
धनु राशीच्या लोकांवर या आठवड्याच्या सुरुवातीला कामाचा ताण खूप जास्त असणार आहे. नोकरीच्या ठिकाणीही तुम्हाला अनेक जबाबदाऱ्या मिळतील. पण, हे सर्व तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं. सुरुवातीच्या दिवसांपेक्षा या आठवड्याच्या शेवटी तुमची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील. या काळात तुमचं मन धार्मिक आणि सामाजिक कार्यात सर्वाधिक केंद्रित असेल. कोणताही मोठा निर्णय घेताना तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या लव्ह लाईफबद्दल बोलताना, तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. या आठवड्यात तुम्हा दोघांमधील परस्पर समंजसपणा आणखी वाढेल. तुम्ही एकमेकांच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी काम कराल.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
मीन राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला काही चांगली बातमी मिळेल. कुटुंबातही आनंदाचं वातावरण राहील. या काळात तुमची सर्व प्रलंबित कामं पूर्ण झालेली दिसतील. नोकरदारांसाठी आठवडा खूप अनुकूल आहे. या आठवड्यात तुम्हाला इच्छित बदली मिळू शकते. नोकरीत अपेक्षित यश आणि सन्मान मिळाल्याने तुम्ही उत्साही राहाल. तुम्ही तुमचं काम वेळेवर पूर्ण करू शकाल. या आठवड्यात व्यावसायिकांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत उघडतील. या आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :