Weekly Horoscope : तूळ आणि वृश्चिक राशींना नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात धनलाभाचे मिळतील शुभ संकेत, घरात येईल पैसा; साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 3 To 9 November 2025 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ आणि वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 3 To 9 November 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजपासून नोव्हेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. नोव्हेंबर महिन्याचा हा पहिला आठवडा फार खास असणार आहे. कारण या आठवड्यात अनेक शुभ राजयोग निर्माण होणार आहेत. तसेच, या आठवड्यात तुळशी विवाहाबरोबरच कार्तिक पौर्णिमा, देव दिवाळीदेखील साजरी केली जाणार आहे. त्यामुळे नोव्हेंबरचा पहिला आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ आणि वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
तूळ रास साप्ताहिक राशीभविष्य (Libra Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - नवीन आठवड्यात तुमच्या नात्यात तुम्हाला काही छोटे-मोठे बदल जाणवू शकतात. या बदलांचा स्वीकार करा. तसेच, तुमच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीला स्थान देऊ नका. गैरसमज वाढतील.
करिअर (Career) - कामाच्या ठिकाणी तुम्हाला एका महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल. या संधीचा योग्य तो लाभ घ्या. तसेच, जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना मनासारखी नोकरी मिळेल.
आर्थिक स्थिती (Wealth) - जुन्या गुंतवणुकीतून तुमच्याकडे पैशांचे मार्ग उपलब्ध होतील. तसेच, घर, प्रॉपर्टीमध्ये पैशांची गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
आरोग्य (Health) - तुम्हाला आरोग्याच्या बाबतीत सावधानता बाळगणं गरजेचं आहे. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. चढ-उतार जाणवू शकतो. यासाठी हेल्दी खाण्याचा प्रयत्न करा.
वृश्चिक रास साप्ताहिक राशीभविष्य (Scorpio Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - या आठवड्यात पार्टनरबरोबर तुम्ही चांगला संवाद साधाल. नात्याच एकमेकांबरोबर संवाद साधणं, वेळ घालवणं गरजेचं आहे. सकारात्मक विचार करा.अन्यथा नातं टॉक्सिक होऊ शकतं.
करिअर (Career) - करिअरच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, छोट्या-मोठ्या समस्या उद्भवू शकतात. तसेच, तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. जबाबदारीने काम करा. परदेशात जाण्याची संधी निर्माण होऊ शकते.
आर्थिक स्थिती (Wealth) - पैसे कमावण्याच्या अनेक संधी निर्माण होतील. तसेच, स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही पैशांची गुंतवणूक करु नका. तसेच, मित्रांबरोबर पैशांच्या बाबतीत गैरसमज दूर होतील.
आरोग्य (Health) - या आठवड्यात तुम्हाला आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. तुम्हाला डोळे, कान तसेच गळ्याशी संबंधित समस्या जाणवू शकतात. तसेच, कोणत्याही गोष्टीचा मानसिक ताण घेऊ नका.
हेही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















