एक्स्प्लोर

Weekly Horoscope 28 October To 03 November 2024 : पुढचे 7 दिवस सर्व 12 राशींसाठी ठरणार खास; कसा असणार नवीन आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope 28 October To 03 November 2024 : ऑक्टोबर महिन्याचे शेवटचे दिवस काही राशींसाठी खास असणार आहे, तर काही राशींना या काळात नुकसान सहन करावं लागेल. सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 28 October To 03 November 2024 : नवीन आठवडा काही राशींसाठी भाग्याचा ठरणार आहे. आजपासून नवीन आठवडा सुरू झाला आहे. हा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. काही राशींसाठी नवीन आठवडा (Weekly Horoscope) लाभदायी असेल. ऑक्टोबर महिन्याचा तिसरा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

मेष रास (Aries Weekly Horoscope)

मेष राशीच्या लोकांना नवीन आठवड्यात नशिबाची चांगली साथ मिळेल. अनेक दिवसांपासून जर तुम्ही दीर्घ आजाराने त्रस्त असाल तर तुमची ही समस्या दूर होईल. तसेच, तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला पार्टनरचा चांगला सपोर्ट मिळेल. तसेच, प्रेमाच्या बाबतीत जास्त भावनिक राहू नका. अन्यथा तुम्हाला त्रास होऊ शकतो. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी हा काळ चांगला आहे. 

वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. जर तुम्हाला एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करायची असेल तर ही वेळ तुमच्यासाठी योग्य आहे. प्रेम संबंधांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास तुम्ही नात्यात संवाद वाढवण्याची जास्त गरज आहे. महिलांना या काळात कामात प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. 

मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा काहीसा आव्हानात्मक असणार आहे. या आठवड्यात करिअरच्या बाबतीत तुमच्या आरोग्यात अनेक चढ-उतार पाहायला मिळतील. तसेच, तुम्ही मानसिक तणावात असाल. तणावापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही नियमित योगासन, ध्यान करु शकता. तसेच, आहाराची विशेष काळजी घ्या. 

कर्क रास (Cancer Weekly Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या शब्दांवर जास्त भर देणं गरजेचं आहे. भावनेच्या भरात कोणालाही अपशब्द बोलू नका. तसेच, तुमचं वैवाहिक जीवन चांगलं असेल. फक्त एकमेकांना वेळ द्या. तुमच्या पार्टनरला फिरायला घेऊन जा. घाई गडबडीत कोणत्याही गुंतवणुकीचा विचार करु नका. 

सिंह रास (Leo Weekly Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा काहीसा आव्हानात्मक असणार आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून तुम्हाला काहीसा त्रास जाणवेल. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करा. तसेच, तुमचं बॅंक बॅलेन्स पाहून तुम्हाला फार चांगलं वाटेल त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा ताण घेऊ नका. तसेच, व्यवहाराच्या बाबतीत सावध राहा. 

कन्या रास (Virgo Weekly Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या आठवड्यात तुमच्या घरात वादविवाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. तसेच, आरोग्याच्या बाबतीत थोडेसे सतर्क राहा. सकाळी उठून ध्यान, योगा करणं तुमच्यासाठी फार महत्त्वाचं असणार आहे. 

तूळ रास (Libra Weekly Horoscope)

ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी शुभ राहील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठांचं चांगलं सहकार्य मिळेल. घर किंवा वाहन खरेदी-विक्रीचा विचार करत असाल तर या आठवड्यात तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. या आठवड्यात तुम्ही काही चैनीच्या वस्तूंवर खूप पैसा खर्च करू शकता. तरुणाई बराचसा काळ मौजमजा करण्यात घालवेल. आठवड्याच्या शेवटी व्यवसायात चढ-उतार होऊ शकते. लव्ह लाईफमध्ये जोडादारांच्या अपेक्षांकडे दुर्लक्ष करणं टाळा.

वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांना ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात आपल्या रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल, अन्यथा चालू असलेली कामं बिघडू शकतात. तुमची कामाची जागा असो की कुटुंब, लोकांच्या छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा, नाहीतर वाद होऊ शकतात. तुम्हाला न्यायालयाशी संबंधित प्रकरणांमध्ये अनावश्यक फेऱ्या माराव्या लागतील. या काळात तुम्हाला कामात यश मिळवण्यासाठी कठोर मेहनत करावी लागेल.

धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)

ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा धनु राशीच्या लोकांसाठी आनंदाचा आणि सौभाग्याचा असणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला हितचिंतकांच्या मदतीने नियोजित कामं वेळेवर पूर्ण होतील. धार्मिक आणि शुभ कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. समाजात मान-सन्मान वाढेल. नोकरीच्या ठिकाणी सर्वजण तुमच्याशी चांगले वागतील. चैनीशी संबंधित गोष्टींवर पैसे खर्च होऊ शकतात. या आठवड्यात पिकनिक, पार्टी किंवा लांबचा प्रवास शक्य आहे. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ अतिशय शुभ आणि लाभदायक असेल.

मकर रास (Capricorn Weekly Horoscope)

मकर राशीच्या लोकांना ऑक्टोबरच्या या आठवड्यात करिअर आणि व्यवसायात नशिबाची साथ मिळणार नाही. तुमच्या कामात व्यत्यय येतील. विद्यार्थ्यांचं अभ्यासातून लक्ष कमी होऊ शकतं. व्यवसायात, जवळच्या नफ्यात दूरचं नुकसान टाळा. विशेषत: सट्टेबाजी, लॉटरी इत्यादींमध्ये पैसे गुंतवणं टाळा. रोजगाराच्या शोधात भटकणाऱ्या लोकांना अजून थोडी वाट पहावी लागेल. कुटुंबाला एकत्र बांधण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होतील.

कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांना ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात केलेल्या मेहनतीचं फळ मिळण्यास थोडा वेळ लागेल, परंतु अखेर शुभ परिणाम मिळतील. आठवड्याच्या सुरुवातीला आरोग्य आणि नातेसंबंधांची विशेष काळजी घ्या. जमीन आणि घराचे वाद न्यायालयाबाहेर सोडवणं योग्य राहील. परीक्षा स्पर्धांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. व्यवसायात अनपेक्षित नफा मिळेल.

मीन रास (Pisces Weekly Horoscope)

ऑक्टोबरचा हा आठवडा मीन राशीच्या लोकांसाठी लाभाचा असेल. तुमची नियोजित कामं वेळेवर पूर्ण करून तुम्ही आनंदी राहाल. कुटुंबाशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घेताना तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल. लोक तुमच्या निर्णयाचं कौतुक करतील. नोकरदार लोकांना त्यांच्या इच्छित ठिकाणी बदली किंवा बढती मिळू शकते. जे अनेक दिवसांपासून नोकरीच्या शोधात होते त्यांना अपेक्षित संधी मिळेल. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येतील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Weekly Horoscope : लक्ष्मी नारायण राजयोगाने होणार आठवड्याची सुरुवात; 5 राशी जगणार राजासारखं जीवन, ऐन दिवाळीत लाभणार लक्ष्मीची कृपा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महादेव जानकर महायुतीतून बाहेर, तरीही भाजपनं रासपसह मित्रपक्षांना चार जागा सोडल्या, आठवले, राणा अन् कोरेंसाठी गुड न्यूज
महायुतीच्या जागावाटपात भाजपची मित्रपक्षांसह दीडशे जागांवर घौडदौड, आठवले, राणा अन् कोरेंना जागा सोडल्या
Shrinivas Vanga Crying : एकनाथ शिंदेंनी तिकीट कापलं, आमदार ढसाढसा रडला; म्हणाला, उद्धव ठाकरे देव, त्यांची माफी मागायचीय
एकनाथ शिंदेंनी तिकीट कापलं, आमदार ढसाढसा रडला; म्हणाला, उद्धव ठाकरे देव, त्यांची माफी मागायचीय
संभाजीनगरमध्ये नवा ट्विस्ट, जाहीर उमेदवाराकडून गद्दारी; ठाकरेंनी केली कारवाई, नवा उमेदवार
संभाजीनगरमध्ये नवा ट्विस्ट, जाहीर उमेदवाराकडून गद्दारी; ठाकरेंनी केली कारवाई, नवा उमेदवार
2019 ला मंत्री, संपत्ती 11 कोटी; 2024 ला मुख्यमंत्री; एकनाथ शिंदेंची संपत्ती किती, किती पटीने वाढली?
2019 ला मंत्री, संपत्ती 11 कोटी; 2024 ला मुख्यमंत्री; एकनाथ शिंदेंची संपत्ती किती, किती पटीने वाढली?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Group 4th List : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर, 7 उमेदवारांचा समावेशMuddyach Bola Wadigodri Vidhan Sabha:राजेश टोपेंच्या बालेकिल्ल्याच यंदा कुणाची हवा? कोण मारणार बाजी?Shrinivas Vanga Cried : उद्धव ठाकरे देव माणूस!मी चुकलो! शिंदेंनी तिकीट कापताच वनगा रडले1 Min 1 Constituency | Vidhan Sabha | 1 मिनिट 1 मतदारसंघ | कोणाची बाजी? | 28 OCT 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महादेव जानकर महायुतीतून बाहेर, तरीही भाजपनं रासपसह मित्रपक्षांना चार जागा सोडल्या, आठवले, राणा अन् कोरेंसाठी गुड न्यूज
महायुतीच्या जागावाटपात भाजपची मित्रपक्षांसह दीडशे जागांवर घौडदौड, आठवले, राणा अन् कोरेंना जागा सोडल्या
Shrinivas Vanga Crying : एकनाथ शिंदेंनी तिकीट कापलं, आमदार ढसाढसा रडला; म्हणाला, उद्धव ठाकरे देव, त्यांची माफी मागायचीय
एकनाथ शिंदेंनी तिकीट कापलं, आमदार ढसाढसा रडला; म्हणाला, उद्धव ठाकरे देव, त्यांची माफी मागायचीय
संभाजीनगरमध्ये नवा ट्विस्ट, जाहीर उमेदवाराकडून गद्दारी; ठाकरेंनी केली कारवाई, नवा उमेदवार
संभाजीनगरमध्ये नवा ट्विस्ट, जाहीर उमेदवाराकडून गद्दारी; ठाकरेंनी केली कारवाई, नवा उमेदवार
2019 ला मंत्री, संपत्ती 11 कोटी; 2024 ला मुख्यमंत्री; एकनाथ शिंदेंची संपत्ती किती, किती पटीने वाढली?
2019 ला मंत्री, संपत्ती 11 कोटी; 2024 ला मुख्यमंत्री; एकनाथ शिंदेंची संपत्ती किती, किती पटीने वाढली?
Sameer Bhujbal vs Suhas Kande : समीर भुजबळांच्या सभेत भाषण, कार्यकर्त्यास सुहास कांदेंकडून शिवीगाळ? भरसभेत कॉल रेकॉर्डिंग ऐकवल्यानं खळबळ
समीर भुजबळांच्या सभेत भाषण, कार्यकर्त्यास सुहास कांदेंकडून शिवीगाळ? भरसभेत कॉल रेकॉर्डिंग ऐकवल्यानं खळबळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 ऑक्टोबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 ऑक्टोबर 2024 | सोमवार
Maharashtra Assembly Elections 2024 : मोठी बातमी : उद्धव ठाकरेंना जबर धक्का, जाहीर केलेला उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार!
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंना जबर धक्का, जाहीर केलेला उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार!
Maharashtra Assembly Consituency 2024 : विधानसभेची खडाजंगी : येवला मतदारसंघाचा गड छगन भुजबळ राखणार की परिवर्तन होणार?
विधानसभेची खडाजंगी : येवला मतदारसंघाचा गड छगन भुजबळ राखणार की परिवर्तन होणार?
Embed widget