Weekly Horoscope 27 January To 02 February 2025 : पुढचे 7 दिवस सर्व 12 राशींसाठी ठरणार खास; कसा असणार नवीन आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 27 January To 02 February 2025 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घेऊया.
Weekly Horoscope 27 January To 02 February 2025 : आजपासून नवीन आठवडा सुरु झाला आहे. जानेवारीचा शेवटचा आठवडा अनेक राशींसाठी महत्त्वाचा असणार आहे. या आठड्यात काही राशींना लाभ मिळणार आहे. तर, काही राशींना तोटा होणार आहे. एकूणच हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घेऊया.
मेष रास (Aries Weekly Horoscope)
आजपासून सुरू होणारा नवीन आठवडा मेष राशीच्या लोकांसाठी शुभ फळ घेऊन येणार आहे. करिअर आणि व्यवसायासाठी हा आठवडा उत्तम राहील. या आठवड्यात लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील. व्यवसाय विस्ताराचे नियोजन या आठवड्यात यशस्वी होईल. तुमची लव्ह लाईफ चांगली असेल.
वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा खूप शुभ राहील. तुमची नियोजित कामं वेळेवर पूर्ण होतील. तुम्हाला अपेक्षित नफा मिळू शकेल. जर तुम्ही एखाद्याला पैसे दिले असतील तर ते तुम्हाला परत मिळू शकतात. प्रेम जीवनात अनुकूलता राहील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील.
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा संमिश्र राहील. कामाचा ताण जास्त असेल, त्यामुळे तुम्ही चिंतेत राहू शकता. तुम्हाला व्यवसायात मंदीचा सामना करावा लागू शकतो. अनावश्यक खर्चापासून लांब राहा. प्रेमसंबंधात अनावश्यक शो ऑफ टाळा.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा संमिश्र असू शकतो. या आठवड्यात तुम्ही फिरायला जाऊ शकता. कोणतंही काम करताना घाई करू नका. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. नातेसंबंध सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवा. आरोग्याची काळजी घ्या.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
सिंह राशीच्या लोकांना या आठवड्यात भाग्याची साथ मिळेल. करिअर आणि बिझनेसमध्ये कोणत्याही कामात घाई करू नका. व्यवसायात तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराच्या भावनांशी खेळू नका. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, अन्यथा तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जावं लागू शकतं.
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात कठीण जाऊ शकते. तुमच्या वस्तूंची काळजी घ्या, चोरी होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल निराश होऊ शकता. काही महत्त्वाच्या कामासाठी तुम्ही मोठी रक्कम खर्च करू शकता.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
या आठवड्यात तूळ राशीचे लोक त्यांच्या बुद्धिमत्तेच्या आणि मेहनतीच्या बळावर त्यांची स्वप्नं पूर्ण करू शकतात. एखाद्या व्यावसायिकाचे मार्केटमध्ये अडकलेले पैसे परत मिळू शकतात. वैवाहिक जीवनात आनंद होईल, ज्या समस्या तुम्हाला त्रास देत होत्या त्या सहज सोडवता येतील.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांनी नवीन आठवड्यात धीर धरावा, घाईने कोणतंही पाऊल उचलू नका. कामाच्या ठिकाणी विरोधकांपासून सावध राहा. कोणताही वाद संवादाने सोडवा. कोणत्याही मोठ्या कामात मोठ्यांचा सल्ला घ्या, तरच तुमची हानी टळेल.
धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)
धनु राशीच्या लोकांना या आठवड्यात सावधगिरीने निर्णय घ्यावे लागतील, अन्यथा तुम्हाला नंतर पश्चात्ताप करावा लागू शकतो. कोणत्याही कामात शॉर्टकट वापरू नका. प्रेमसंबंधात विचारपूर्वक पाऊल टाका. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला जास्त वेळ थांबावं लागेल.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी नवा आठवडा शुभ फळ घेऊन आला आहे, कारण दीर्घकाळ चाललेल्या समस्येवर तोडगा निघेल. या दरम्यान तुम्ही काही शुभ कार्यक्रमातही सहभागी होऊ शकता. प्रेमसंबंधात गोडवा राहील.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांना या आठवड्यात लाभ होईल. तुमच्या कामाचं सर्वत्र कौतुक होईल. तुमच्या मेहनतीला फळ मिळेल. काही कामासाठी तुमचा सन्मान होऊ शकतो. वैवाहिक जीवनात कधी कडू, कधी गोड भांडणं होतील. कुटुंबातील वाद मिटतील.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी आठवडा संमिश्र जाईल. कोणत्याही गोष्टीला जास्त महत्त्व देऊ नका, अन्यथा परिस्थिती बिघडू शकते. सहकाऱ्यांवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. तुमच्या प्रिय जोडीदाराशी तुमचं नातं उत्तम राहील. उत्पन्नाशी संबंधित समस्या दूर होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :