(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Weekly Lucky Zodiacs : नवीन आठवड्यात ग्रहांच्या मोठ्या हालचाली; 'या' 5 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार, पैशांची आवक वाढणार
Weekly Lucky Zodiacs 24 June to 30 June : जून महिन्याचा शेवटचा आठवडा 5 राशींसाठी खूप भाग्याचा ठरणार आहे. या 5 राशींना अनेक सुखसोयी मिळतील आणि त्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल, या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घ्या
Weekly Horoscope 24 June to 30 June Lucky Zodiacs : जून महिन्याचा शेवटचा आठवडा काही राशींसाठी भाग्याचा असणार आहे. 24 जूनपासून नवीन आठवडा सुरू होत आहे. हा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. मुख्यत: 5 राशींसाठी नवीन आठवडा (Weekly Horoscope) लाभदायी असेल, या 5 राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मेष रास (Aries Weekly Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभ राहील. या आठवड्यात तुमच्या करिअरला वेग येईल, तुमचं करिअर प्रगतीपथावर असेल, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. कुटुंबातील लोक तुम्हाला साथ देतील आणि तुमचं उत्पन्नही वाढेल. खर्च थोडा जास्त असू शकतो, परंतु महिन्याचा शेवट चांगला होईल. शेवटच्या दिवसांत तुम्ही मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
कर्क राशीच्या लोकांना नवीन आठवड्यात व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. तुमचं अपूर्ण काम पूर्ण होईल. तुमचा राग बाजूला ठेवा आणि कोणतंही काम करा, या आठवड्यात तुम्ही एखादा प्रवास करू शकता. आठवड्याच्या शेवटी तुम्ही मुलं आणि कुटुंबासह बाहेर जाण्याचा बेत आखू शकता.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा अनुकूल असेल. या आठवड्यात तुम्ही चांगलं काम केल्यास तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. कोणतीही समस्या वाढवण्याऐवजी, तुम्ही नीट काम करुन त्या कमी करण्याचा प्रयत्न करा. व्यवसाय करणाऱ्या लोकांना प्रवासाचा फायदा होईल. व्यवसायात काही नवीन संपर्क जोडले जातील, ज्याचा तुम्हाला फायदा होईल.
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
या आठवड्यात कन्या राशीचे लोक त्यांच्या लव्ह लाईफचा आनंद लुटतील. तुम्ही प्रियकरासोबत चांगला वेळ घालवाल आणि सुखद क्षणांचा अनुभव घ्याल. आठवड्याच्या शेवटी कुटुंबात सुरू असलेल्या समस्या संपुष्टात येतील. या आठवड्यात कन्या राशीला प्रवासाचे योग आहेत आणि आठवड्याच्या शेवटी तुम्हाला काही शुभवार्ता मिळतील.
मकर रास (Virgo Weekly Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला जाईल. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या जोडीदाराचं सहकार्य मिळेल. व्यवसायात तुमची प्रगती होईल. या आठवड्यात काही अडचणी भेडसावतील, पण समजुतीने तुम्ही त्या सोडवाल. नोकरीत चांगले संबंध निर्माण कराल, जे तुमच्या भविष्यासाठी चांगले राहतील. व्यवसायासाठी हा चांगला काळ आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :