Weekly Horoscope 24 June To 30 June 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Weekly Horoscope 24 June To 30 June 2024 : साप्ताहिक राशीभविष्याच्या दृष्टीने तूळ ते मीन राशीसाठी नवीन आठवडा खास असणार आहे. नवीन आठवडा काही राशींसाठी चांगला ठरेल, तर काही राशींना या काळात नुकसान सहन करावं लागेल. तूळ ते मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.
Weekly Horoscope 24 June To 30 June 2024 : जून महिन्याचा शेवटचा आठवडा काही राशींसाठी खास असणार आहे, तर काही राशींसाठी खडतर असणार आहे. मकर आणि मीनसह इतर राशीच्या लोकांना या काळात पैसा, करिअरबाबत विशेष लाभ मिळेल. जून महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 6 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
नवीन आठवडयात तुमची तब्येत सुधारेल. या काळात आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला व्यवसायातही यश मिळेल. व्यवसायातील प्रगतीमुळे तुम्हाला आनंद देईल. नोकरी करणाऱ्यांना अपेक्षित यश मिळू शकतं. तुम्ही तुमच्या बॉसच्या जवळ असाल आणि तो तुम्हाला सर्व कामात पाठिंबा देईल, तुम्हाला सहकार्य करेल. विद्यार्थ्यांना शिक्षणात काही अडचणी येऊ शकतात. नवीन आठवड्यात तुमचे विरोधक शांत असतील. या काळात लांबचा प्रवास होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात तुम्ही व्यस्त असाल. यावेळी तुमचा अनपेक्षित खर्चही होऊ शकतो. वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
येत्या दिवसांत तुमची तब्येत खालावू शकते, म्हणून तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला कुटुंबाकडून पुरेपूर सहकार्य मिळेल. नोकरीमध्ये तुम्ही खूप चांगलं काम कराल आणि काही लोक तुम्हाला घाबरतील. तुम्ही नवीन यश मिळवण्याचा प्रयत्न कराल. व्यवसायात देखील तुमची चांगली प्रगती होईल. नवीन गुंतवणूक पर्याय तुम्ही शोधाल. नोकरी करणाऱ्यांना अपेक्षित परिणाम न मिळाल्याने ते निराश होऊ शकतात.
धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)
वैवाहिक जीवनात आनंद आणि रोमान्स असेल. लव्ह लाईफसाठी मात्र नवीन आठवड्याचा काळ थोडा तणावपूर्ण असेल. या काळात तुमचं उत्पन्न खूप चांगलं असेल, ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल. या काळात तुमच्या नोकरीत काही अडचणी येऊ शकतात. काम करताना कामात तुमच्याकडून काही चुका होऊ शकतात, त्यामुळे विरोधकांचं पारडं जड असेल. व्यवसायासाठी हा काळ चांगला आहे. या काळात तुमचं आरोग्यही उत्तम राहील. उच्च शिक्षणासाठी हा काळ चांगला आहे.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीसाठी नवीन आठवडा अनुकूल असेल. करिअरसाठी हा काळ चांगला आहे. नोकरीत तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. नोकरीत तुम्ही प्रगतीच्या मार्गावर असाल. व्यवसाय करणाऱ्यांचा नवीन लोकांशी संपर्क वाढेल, जे तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी फायदेशीर ठरेल. या काळात तुम्ही धार्मिक प्रवास कराल, जो तुमच्या मनाला आनंद देईल. या काळात तुम्हाला आर्थिक लाभ होईल, पण खर्च देखील जास्त होईल.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
येत्या आठवड्यात तुमची तब्येत ठीक राहील, पण पोटाची काळजी घ्या. तुम्ही आत्मविश्वासाने भरलेले असाल. नवीन आठवड्यात तुम्ही व्यवसायात जोखीम घेण्यास मागेपुढे पाहणार नाही. मित्रांच्या सहकार्याने काही नवीन काम करू शकाल. जोडीदाराकडूनही सहकार्य मिळेल. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. लव्ह लाईफमध्ये थोडे खटके उडतील, पण बाकी खूप रोमान्स आणि प्रेम देखील असेल. उत्पन्नवाढीसाठी हा चांगला काळ आहे. येत्या दिवसांत तुम्ही नोकरी बदलू शकता.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
नवीन आठवड्यात तुमचे खर्च वाढतील, यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. कौटुंबिक जीवनात तणाव वाढेल. समजूतदारपणाचा अभाव संबंध बिघडवू शकतो. लव्ह लाईफसाठी हा चांगला काळ आहे. कुटुंबातील सदस्यांचं सहकार्य मिळेल. एखादा छोटा धार्मिक प्रवास करू शकता. या काळात तुम्हाला आर्थिक लाभही होईल. फक्त तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: