Weekly Horoscope : तूळ आणि वृश्चिक राशींना सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात लागणार लॉटरी, चालून येणार सुवर्णसंधी; साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 22 To 28 September 2025 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ आणि वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 22 To 28 September 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, सप्टेंबर (September) महिन्याचा शेवटचा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा फार महत्त्वाचा असणार आहे. कारण, या दरम्यान नवरात्री (Navratri 2025) उत्सवाची सुरुवात होणार आहे. तसेच, सूर्यग्रहणाचा (Surya Grahan) काळ असल्यामुळे या आठवड्याला महत्त्व आहे. तसेच, या आठवड्या दरम्यान अनेक छोटे-मोठे ग्रहदेखील नक्षत्र परिवर्तन तसेच, राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे सप्टेंबर महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ आणि वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
तूळ रास साप्ताहिक राशीभविष्य (Libra Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - या काळात प्रेमाच्या बाबतीत तुम्ही गंभीर असणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर सुट्ट्यांचा प्लॅनदेखील आखू शकता. तसेच, नात्याला वेळ देऊ शकता.
करिअर (Career) - करिअरच्या बाबतीत शिस्तप्रिय राहाल. तुमची ठरवलेली कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. तसेच, ज्या लोकांपासून तुम्हाला त्रास होतो अशा लोकांपासून आत्तापासूनच दूर राहा. नोकरीत बदल घडतील.
आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक स्थितीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, पैशांचा जपून वापर करणं गरजेचं आहे. त्यामुळे खर्च कमी करा. गरज असल्यास वस्तू खरेदी करा. नवीन ठिकाणी नोकरी मिळण्याची शक्यता आहे.
आरोग्य (Health) - नवीन आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्यावर भर देणं गरजेचं आहे. या काळात तुम्ही संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. यासाठी वर्कआऊटवर लक्ष द्या. आणि भरपूर पाणी प्या. तुमच्या लाईफस्टाईलमध्ये बदल करा.
वृश्चिक रास साप्ताहिक राशीभविष्य (Scorpio Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - या राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीलाच पार्टनरकडून छान सरप्राईज भेट मिळेल. त्यामुळे तुमचा संपूर्ण आठवडा चांगला जाणार आहे. या काळात पार्टनरबरोबर तुम्ही नवीन बिझनेस सुरु करण्याचा किंवा महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करु शकता.
करिअर (Career) - या आठवड्यात तुमच्यामध्ये लीडरशिप क्वालिटी दिसून येईल. तुमच्या नेतृत्वात तुम्ही चांगलं काम करु शकाल. त्याचप्रमाणे, ध्येयावर देखील लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं आहे. सहकाऱ्यांशी प्रेमाने वागा.
आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास, या आठवड्यात तुमचा कल जास्तीत जास्त गुंतवणुकीकडे असणार आहे. त्यामुळे लवकरच त्यातून तुम्हाला चांगला नफा मिळेल. तसेच, लवकरच तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.
आरोग्य (Health) - ज्या लोकांना दम्याचा त्रास आहे त्यांनी या आठवड्यात आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. पावसात भिजू नये. तसेच, घरातील जेवणाचा आस्वाद घ्या. अन्यथा तुम्हाला साथीचे आजार उद्भवू शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















