Weekly Horoscope: मेष, वृषभ राशींनी दिवाळीत सज्ज व्हा! मोठा धनलाभ होण्याचे संकेत, नोकरीत पगारवाढ, साप्ताहिक राशीभविष्य वाचा
Weekly Horoscope 20 To 26 October 2025: तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष आणि वृषभ राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 20 To 26 October 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, ऑक्टोबर (October 2025) महिन्याचा चौथा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा अनेक अर्थाने खास असणार आहे. कारण या दरम्यान बुध ग्रहाचं नक्षत्र परिवर्तन होणार असल्याने शुभ संयोग जुळून येणार आहे. तसेच, आठवड्यात दिवाळीचा (Diwali 2025) देखील सण आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष आणि वृषभ राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मेष राशीची लव्ह लाईफ (Aries Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - तुमचे प्रेमाचे तारे सध्या चमकत आहेत आणि हा आठवडा अद्भुत क्षण घेऊन येईल. प्रेम किंवा लग्नाच्या बाबतीत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या कुटुंबाचा सल्ला घ्या, कारण प्रियजनांकडून अनपेक्षित नापसंती होण्याची शक्यता असते.
करिअर (Career) - तुमची सध्याची नोकरी समाधानकारक नाही, त्यामुळे तुम्हाला नोकरी बदलायची इच्छा होते. ज्योतिषशास्त्र असे सुचवते की बदलाची वेळ अजून आलेली नाही. तुम्ही शांत राहावे. येणारी वेळ तुमचीच आहे. पगारवाढ अन् कौतुकही..
आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक दृष्ट्या आठवडा उत्तम आहे. अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर, अचानक खर्च होऊ शकतो. बजेटचे नियोजन योग्य करा
आरोग्य (Health) - आरोग्य उत्तम असेल. फक्त दिवाळीच्या काळात तेलकट तसेच चरबीयुक्त पदार्थ खाताना थोडा संयम बाळगा
वृषभ राशीची लव्ह लाईफ (Taurus Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - या आठवड्यात प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात. तुमच्या प्रेम जीवनात तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप होण्याचा धोका आहे. तुमच्या जोडीदारासोबत वैचारिक मतभेदांमुळे वैवाहिक जीवन प्रभावित होऊ शकते.
करिअर (Career) - करिअरमध्ये मोठी प्रगती दिसून येईल. नोकरी करणाऱ्यांना आठवड्याच्या उत्तरार्धात पहिल्या सहामाहीपेक्षा चांगले परिणाम दिसतील. म्हणून, या काळात तुमच्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करा आणि ती वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.
आर्थिक स्थिती (Wealth) - या आठवड्यात आर्थिक व्यवहारात अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. शहाणपणाने गुंतवणूक करावी लागेल.
आरोग्य (Wealth) - नवीन आठवड्यात तुमच्या आरोग्यात सुधारणा दिसून येईल. मात्र, पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. हेल्दी खा.
हेही वाचा :
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी ऑक्टोबरचा चौथा आठवडा कसा असणार? दिवाळीत कोणत्या राशी होतील मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)















