Numerology : सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतात 'या' जन्मतारखेचे लोक; कुंडलीत जन्मत:च असतो राजयोग; प्रत्येक क्षेत्रात असतात अव्वल
Numerology Of Mulank 9 : वैदिक शास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 9 असतो. मूलांक 9 चा स्वामी ग्रह मंगळ आहे.

Numerology Of Mulank 9 : शास्त्रानुसार, ज्याप्रमाणे राशींनुसार, माणसाचा स्वभाव ठरवला जातो. त्याचप्रमाणे, अंकशास्त्रानुसार (Ank Shastra), देखील व्यक्तीच्या स्वभावाबद्दल अंदाज व्यक्त करता येतो. त्यानुसार, व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार त्याचा मूलांक ठरवला जातो. आज आपण अशा मूलांकाबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्या कुंडलीत जन्मत:च राजयोग असतो.
वैदिक शास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 9 असतो. मूलांक 9 चा स्वामी ग्रह मंगळ आहे. तसेच, या जन्मतारखेचे लोक प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाचे असतात.
कसा असतो स्वभाव?
या जन्मतारखेचे लोक साहसी, जबाबदार आणि नेतृत्वाचे प्रतीक असणारे मानले जातात. यांचा स्वभाव फार आत्मविश्वासू असतो. तसेच, परिस्थिती कितीही कठीण आली तरी हे लोक हाम मानत नाहीत. प्रत्येक कठीण परिस्थितीला सामोरं जाण्याची यांच्यात ताकद असते.
या जन्मतारखेच्या लोकांचं व्यक्तिमत्व इतकं खास असतं की आपली वेगळी ओळख हे निर्माण करतात. तसेच, हे लोक आपल्या मूलभूत स्वभावानेच लीडर असतात. हे लोक कधीच कोणावर अवलंबून राहत नाहीत. त्यामुळे हे लोक कोणत्याही टीममध्ये असले तरी हे नेतृत्व आपल्या हाती घेतात.
प्रचंड शिस्तप्रिय असतात
मूलांक 9 चे लोक प्रचंड शिस्तप्रिय असतात. आपल्या प्रमाणेच हे लोक इतरांनाही तितकंच महत्त्व देतात. तसेच, कोणत्याही गोष्टीला टाळणं यांना सहजा सहजी आवडत नाही. निष्काळजीपणा तर यांच्या रक्तातच नसतो.
या जन्मतारखेचे लोक इतरांना मदत करतात पण त्यासाठी ते आपली पद्धत वापरतात. यांचं राहणीमान आत्मनिर्भर असते. तसेच, आपल्या मूल्यांशी हे फार तटस्थ असतात. मूलांक 4 असणाऱ्या लोकांबरोबर यांचं जास्त पटत नाही. यामुळेच या जन्मतारखेचे लोक फार वेगळ्या विचारसरणीचे असतात. तसेच, त्यांच्या व्यवहारात एक प्रकारची अदब पाहायला मिळते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















