(Source: ECI | ABP NEWS)
Weekly Horoscope : धनु आणि मकर राशींसाठी नवीन आठवडा ठरणार गेमचेंजर; पैसा हातात येणार की जाणार? साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 17 To 23 November 2025 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 17 To 23 November 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, नोव्हेंबर (November) महिन्याचा तिसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या आठवड्या दरम्यान अनेक छोटे-मोठे ग्रहदेखील नक्षत्र परिवर्तन तसेच, राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? धनु आणि मकर राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
धनु रास साप्ताहिक राशीभविष्य (Sagittarius Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - धनु राशीच्या प्रेम जीवनाबद्दल बोलायचं झाल्यास, या आठवड्यात तुमच्या नात्यात मधुरता जाणवेल. पार्टनरबरोबर तुम्ही नवीन गोष्टी एक्सप्लोर करु शकता. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. तसेच, तुम्हाला ठरवलेली कामे पूर्ण करता येतील.
करिअर (Career) - करिअरच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, या कालावधीत अनेक क्लाएंट्स बरोबर तुमच्या भेटीगाठी होतील. यातून सकारात्मक गोष्टी निष्पन्न होतील. तसेच, जे लोक आयटी, आरोग्य विभाग, मीडियाशी संबंधित क्षेत्रात काम करतायत. त्यांच्या करिअरला वेग येईल.
आर्थिक स्थिती (Wealth) - तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. जे लोक फ्रिलान्सिंग करतायत. त्यांच्या उत्पन्नात वाढ झालेली दिसेल.
शेअर मार्केट आणि ट्रेंडिंगशी संबंधित क्षेत्रात तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो.
आरोग्य (Health) - या आठवड्यात तुम्ही बाहेरचे तेलकट, तिखट पदार्थ खाण्यापासून जरा दूरच राहा. सांधेदुखीच्या त्रासाशी संबंधित तुम्हाला वेळीच औषधोपचार करणं गरजेचं आहे. मानसिक शांतीसाठी योग, व्यायाम करा.
मकर रास साप्ताहिक राशीभविष्य (Capricorn Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - नवीन आठवड्यात तुमच्या नात्यात काहीसा चढ-उतार जाणवेल. गैरसमज निर्माण होऊ शकतात. यासाठी नात्यात तिसऱ्या व्यक्तीला येऊ देऊ नका. एकमेकांशी संवाद साधून वाद मिटवण्याचा प्रयत्न करा.
करिअर (Career) - या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कामाच्या बाबतीत अनेकांचे प्रश्न उपस्थित होऊ शकतात. जे लोक आयटी, अॅनिमेशन तसेच कॉपी रायटिंगशी संबंधित क्षेत्रातील लोकांना आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.
आर्थिक स्थिती (Wealth) - या आठवड्यात तुम्हाला पैशांशी संबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला अपेक्षित लाभ मिळणार नाही. तसेच, नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी हा काळ तुमच्यासाठी अनुकूल नाही.
आरोग्य (Health) - नवीन आठवड्यात तुम्हाला आरोग्याशी संबंधित काळजी घेणं गरजेचं आहे. वातावरणातील बदलांचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आठवड्याच्या शेवटी लाईफस्टाईलमध्ये बदल करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















