एक्स्प्लोर

Weekly Horoscope 17 June To 23 June 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

Weekly Horoscope 17 June To 23 June 2024 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या या 6 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 17 June To 23 June 2024 : जून महिन्याचा तिसरा आठवडा काही राशींसाठी खास असणार आहे, तर काही राशींसाठी खडतर असणार आहे. मेष आणि कर्कसह इतर राशीच्या लोकांना या काळात पैसा, करिअरबाबत विशेष लाभ मिळेल. जून महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या या 6 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा खास असणार आहे. या काळात तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडताना दिसतील. तसेच, तुम्ही तुमच्या मनाला प्राधान्य द्याल. तसेच, तुम्ही या आठवड्यात कुटुंबीय किंवा मित्रांबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा बेतदेखील आखू शकता. तुम्ही तुमच्या ध्येयाला फॉलो कराल. एकूणच, या कालावधीत तुम्ही तुमच्या ध्येयाला घेऊन संतुष्ट असला. या दरम्यान तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

या राशीच्या लोकांवर गुरु बृहस्पतीची विशेष कृपा असणार आहे. तसेच, कुटुंबियांबरोबर तुमचा काळ चांगला जाईल. तुमच्या आयुष्यात आनंद असेल. त्याचबरोबर वाहन खरेदी करण्याचा चांगला योग आहे. नोकरदार वर्गाला नशीबाची चांगली साथ मिळेल. उच्च अधिकारी तुमच्या कामाची प्रशंसा करतील. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीत त्रिग्रही योगासह अनेक राजयोग जुळून येणार आहेत. त्यामुळे या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळणार आहे. तुमच्या आयुष्यात विविध मार्गांनी तुम्हाला आनंद मिळेल. पण, कोणाच्या जाळ्यात अडकू नका. आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. तुमच्या जोडीदाराबरोबरचा काळ चांगला जाईल. तसेच, तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी हा आठवडा संमिश्र जाणार आहे. या आठवड्यात तुमची नियोजित कामे पूर्ण होतील. जर तुम्ही व्यवसायात गुंतलेले असाल तर या आठवड्यात तुम्हाला व्यवसायाशी संबंधित निर्णय विचारपूर्वक घ्यावे लागतील, अन्यथा कोणत्याही योजनेत गुंतवलेले पैसे अडकू शकतात. चुकूनही घाईघाईने निर्णय घेणे टाळा. आठवड्याच्या मध्याचा काळ तुमच्या आरोग्याच्या आणि नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातून अनुकूल नसेल. या काळात एखाद्या प्रिय व्यक्तीसोबत एखाद्या विषयावर वाद होऊ शकतो.

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांनी या आठवड्यात रागावणे आणि गर्विष्ठ होणे टाळावे, अन्यथा तुमचे केलेले काम बिघडू शकते. आठवड्याच्या सुरुवातीला कामानिमित्त लांब किंवा कमी अंतराचा प्रवास होण्याची शक्यता आहे.आठवड्याच्या मध्यात नोकरीत वरिष्ठ आणि कनिष्ठांकडून अपेक्षेपेक्षा कमी सहकार्य मिळेल. यामुळे तुमचे मन थोडे उदास राहील. या काळात तुमचे विरोधकही सक्रिय राहू शकतात. अशा स्थितीत तुमचे काम अतिशय काळजीपूर्वक करा आणि लोकांच्या छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. 

कन्या रास (Virgo Horoscope)

या आठवड्यात कन्या राशीसाठी काहीसा नुकसानकारक असेल. कोणत्याही समस्येवर उपाय शोधताना राग आणि अभिमान टाळा, मग ते काम असो किंवा वैयक्तिक आयुष्य. आठवड्याच्या सुरुवातीला लहान भावासोबत किंवा बहिणीशी काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतो. या काळात, कोणतीही समस्या सोडवताना संवाद साधा.कामाच्या ठिकाणी तुमचे विरोधक तुम्हाला तुमच्या ध्येयापासून वळवण्यासाठी काही विचित्र गोष्टींमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करू शकतात. आठवड्याच्या उत्तरार्धात तुमची बदली एखाद्या नको असलेल्या ठिकाणी होऊ शकते.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

हेही वाचा :

Trigrahi Yog : तब्बल 100 वर्षांनंतर शुक्र, बुध आणि सूर्याची युती; 'या' 3 राशींनी आधीच सावध व्हा, पाण्यासारखा पैसा जाणार वाया

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget