Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी डिसेंबरचा तिसरा आठवडा भाग्याचा कि टेन्शनचा? कोणत्या राशी होतील मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 15 To 21 December 2025: मेष ते कन्या राशींसाठी तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 15 To 21 December 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, आजपासून डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. हा आठवडा अनेकांचे भाग्य बदलणार आहे. कारण या आठवड्यात अनेक शुभ ग्रह राशी परिवर्तन आणि संक्रमण करणार आहेत. त्यामुळे हा नवा आठवडा अनेक राशींसाठी भाग्यशाली असणार आहे. काही राशींना त्यांच्या कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे, तर काहींना आनंदी आठवडा जाईल. मेष ते कन्या राशींसाठी तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? यासाठी मेष ते कन्या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मेष रास (Aries Weekly Horoscope)
मेष राशीसाठी नवीन आठवड्यात तुमचे आरोग्य काही चिंतेचे कारण असेल. हवामानामुळे, तुमचे किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्याचे आरोग्य बिघडू शकते. व्यवसायात एखाद्यावर जास्त विश्वास ठेवल्याने तुमचे नुकसान होऊ शकते, म्हणून सावधगिरी बाळगा. नोकरीच्या ठिकाणी सकारात्मक परिणाम मिळतील
वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)
वृषभ राशीसाठी नवीन आठवडा सामान्य राहील. तुम्हाला कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. तुमच्या आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगा. कामावर काही समस्या उद्भवू शकतात, परंतु एखाद्या खास व्यक्तीच्या सहकार्यामुळे तुम्हाला फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला राहील, सोबत आर्थिक स्थितीही उत्तम असेल.
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)
मिथुन राशीसाठी डिसेंबरचा तिसरा आठवडा चांगला राहील. या आठवड्यात प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात, तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. घरात शुभ घटना घडू शकतात. व्यवसाय आणि कामातही यश मिळेल. जुनी कामे पुन्हा सुरू होतील, ज्यामुळे फायदा होईल. सामाजिक-राजकीय क्षेत्रात तुम्हाला सन्मान मिळेल. कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा आनंदाने भरलेला असेल. कुटुंबात शुभ घटना घडू शकतात आणि कुटुंबात नवीन सदस्याची भर पडू शकते. कामाच्या ठिकाणी प्रगतीच्या चांगल्या संधी आहेत. रखडलेले काम पुन्हा सुरू होऊ शकते आणि जुने पैसे परत मिळाल्याने तुमच्या कामाला फायदा होईल. कोणतेही नवीन व्यवहार यशस्वी होतील.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
सिंह राशीसाठी नवीन आठवडा थोडा आव्हानात्मक असू शकतो. या आठवड्यात तुमचे निर्णय चुकीचे असू शकतात, ज्यामुळे नुकसान होऊ शकते. गुंतवणूक करण्यापूर्वी शहाणपणाने निर्णय घ्या आणि संपूर्ण माहिती घ्या. कुटुंबात आरोग्याशी संबंधित समस्या देखील उद्भवू शकतात. कर्ज आणि इतर व्यवसायिक समस्या उद्भवू शकतात. कामाच्या ठिकाणी परिस्थिती सामान्य राहील
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. कर्जामुळे व्यवसायात समस्या निर्माण होऊ शकतात आणि आर्थिक मदतीची आवश्यकता असू शकते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी समस्या संभवतात. या आठवड्यात नवीन प्रकल्प सुरू करणे योग्य नाही, कारण त्यामुळे नुकसान होऊ शकते. नोकरीत सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा
Shukraditya Rajyog 2025: सज्ज व्हा..2025 जाता जाता 3 राशींचा संपत्तीचा मार्ग करणार मोकळा! पॉवरफुल शुक्रादित्य राजयोगानं पैसा, नोकरी, प्रेमात मोठं यश
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















