(Source: ECI | ABP NEWS)
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक राशींचं नवीन आठवड्यात सारं All Is Well असेल, धनलाभाचे मोठे योग; साप्ताहिक राशीभविष्य वाचा
Weekly Horoscope 13 To 19 October 2025: तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ आणि वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 6 To 12 October 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ऑक्टोबर (October 2025) महिन्याचा तिसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या महिन्यात दिवाळी देखील असणार आहे. तसेच, या आठवड्या दरम्यान अनेक छोटे-मोठे ग्रहदेखील नक्षत्र परिवर्तन तसेच, राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ आणि वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
तूळ रास साप्ताहिक राशीभविष्य (Libra Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - जर तुम्ही अविवाहित असाल, तर तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार जोडीदार मिळण्याचे संकेत. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. तुमचे वैवाहिक जीवन आनंदी असेल.
करिअर (Career) - करिअरच्या बाबतीत प्रमोशन किंवा नवीन नोकरीची आशा असलेल्यांना आठवड्याच्या अखेरीस चांगली बातमी मिळू शकते. व्यावसायिकांनी या आठवड्यात करार आणि कागदपत्रांकडे विशेष लक्ष द्यावे.
आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक स्थितीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. कोणालाही पैसे उधार देण्यापूर्वी कुटुंबाचा किंवा वरिष्ठांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे.
आरोग्य (Health) - नवीन आठवड्यात आठवड्यात मानसिक ताण टाळा. ध्यान आणि हलका व्यायाम तुमचे आरोग्य राखण्यास मदत करेल. संतुलित आहाराकडे विशेष लक्ष द्या.
वृश्चिक रास साप्ताहिक राशीभविष्य (Scorpio Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - या राशीच्या लोकांना आता फक्त हृदयानेच नव्हे तर समजून घेऊन नातेसंबंधांकडे जाण्याची वेळ आली आहे. अविवाहित मंडळी नवीन नातेसंबंधांसाठी तयार असतील, जोडीदार जीवनाला गांभीर्याने घेत असेल.
करिअर (Career) - हा आठवडा करिअर वाढवणारा आणि नवीन दिशा देणारा ठरू शकतो. परदेशात काम करण्याची किंवा शिक्षण घेण्याची योजना आखणाऱ्यांसाठी आता दारे उघडतील
आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास, या आठवड्यात जुन्या गुंतवणुकीचा आढावा घेण्याचा आणि भविष्यातील नियोजनावर लक्ष केंद्रित करण्याचा काळ आहे. तुमच्या बचतीच्या सवयी पुन्हा पाहणे महत्त्वाचे असेल.
आरोग्य (Health) - या आठवड्यात कामाचा ताण आणि शारीरिक थकवा जाणवू शकतो. योगा, प्राणायाम किंवा ध्यान यासारख्या क्रियाकलाप सुरू केल्याने आराम मिळेल.
हेही वाचा :
2026 Year Lucky Zodiac Signs: नववर्ष.. मोठ्ठे सरप्राईझ.. खुशखबर अन् पैसाच पैसा! 2026 वर्ष 'या' 5 राशींसाठी धडाकेबाज! ग्रहांचा मोठा खेळ नशीब पालटणार
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















