Weekly Horoscope 10 June To 16 June 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Weekly Horoscope 10 June To 16 June 2024 : व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 6 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
Weekly Horoscope 10 June To 16 June 2024 : जून महिन्याचा पहिला आठवडा काही राशींसाठी खास असणार आहे, तर काही राशींसाठी खडतर असणार आहे. धनु आणि कुंभसह इतर राशीच्या लोकांना या काळात पैसा, करिअरबाबत विशेष लाभ मिळेल. जून महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 6 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
या आठवड्यात तुम्हाला काही संकटांचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळेच कोणतंही पाऊल उचलताना सावधानता बाळगा. कोणत्याही प्रकारच्या संकटांचा सामना करण्यासाठी स्वत:च्या मनाची तयारी करून घ्या. या आठवड्यात तुमच्या कामात अडथळा येण्याची शक्यता आहे. तुमच्या सहनशक्तीची वेळोवेळी परीक्षा घेतली जाईल. त्यामुळे डोकं शांत ठेवून येणाऱ्या संकटांचा सामना करा.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
या आठवड्यात तुम्ही धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. तसेच, भविष्याच्या संदर्भात तुम्ही नवीन योजना आखू शकता. तुम्ही सतत जर इतरांच्या भावनांचा विचार करत असाल तर यावेळी स्वत:च्या भावनांना प्राधान्य द्यायला शिका. याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. तसेच, तुमच्या स्वभावाचा इतरांना फायदा घेऊ देऊ नका.
धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)
या आठवड्यात तुम्हाला अनेक संकटांचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे आयुष्यात येणाऱ्या संकटांना सामोरं जाण्याची आत्तापासूनच तयारी ठेवा. तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि आपुलकी असेल. कुटुंबियांच्या सहकार्यानेच तुम्ही अनेक आव्हानांना सामोरं जाण्याची तयारी दाखवू शकता. तसेच, या आठवड्यात तुमच्या आयुष्यात तुम्ही कधीच अपेक्षा न केलेल्या अशा घटना घडतील.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
जे तुमच्याबोवती नकारात्मक वातावरण निर्माण करतात अशा लोकांपासून आत्तापासूनच टार हात लांब राहा. कारण अशी माणसं तुम्हाला भविष्यात धोका देऊ शकतात. या आठवड्यात तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. तसेच, पैशांची गुंतवणूक करायची असेल, नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल तर हा आठवडा तुमच्यासाठी चांगला असणार आहे.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी येणारा नवीन आठवडा काहीसा आव्हानात्मक असू शकतो. पैशांच्या बाबतीत कुंभ राशीच्या लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. या काळात तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. तुम्हाला तुमच्या भविष्या संदर्भात एखादा निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी संवाद साधा. मगच निर्णय घ्या.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
नवीन आठवडा मीन राशीच्या लोकांसाठी चांगला राहील. जर तुम्ही आधीच कोणत्याही योजनेत पैसे गुंतवले असतील तर तुम्हाला त्यातून नफा मिळेल. दीर्घकाळ प्रलंबित असलेले व्यवहार पूर्ण होतील. तुम्हाला परदेशात करिअर करायचं असेल तर तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल. नोकरदार महिलांसाठी हा काळ चांगला राहील, उत्पन्नाचे अधिक स्रोत निर्माण होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :