Weekly Horoscope : मेष आणि वृषभ राशींना पहिल्याच आठवड्यात मिळणार मोठी संधी, गणरायाच्या कृपेने सर्व विघ्न होतील दूर; साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 1 To 7 September 2025 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष आणि वृषभ राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 1 To 7 September 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या आठवड्यात अनेक सण समारंभांसह मोठ मोठ्या ग्रहांची देखील स्थिती बदलणार आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष आणि वृषभ राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मेष राशीची लव्ह लाईफ (Aries Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा प्रेमाच्या बाबतीत चांगला असेल. जे लोक सिंगल आहेत ते मिंगल होण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या पार्टनरमधील कमेक्शन मजबूत करण्याचा प्रयत्न करा.
करिअर (Career) - कामाच्या बाबतीत तुमची चांगली प्रगती दिसून येईल. बॉसला बोलण्याची संधी देणार नाही. तसेच, या आठवड्यात तुमच्यातील लीडरशिप क्वालिटी देखील दिसून येईल. सकारात्मक दृष्टीकोन राहील.
आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक बाबतीत तुमचा नवीन आठवडा स्थिर असणार आहे. तुमचा ना फायदा ना तोटा होणार आहे. त्यामुळे भविष्यासाठी आत्ताच सेविंग करुन ठेवा. गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध ठेवा.
आरोग्य (Health) - आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुमची लाईफस्टाईल चांगली असेल. मानसिक शांततेसाठी गाणी ऐका, योग करा तसेच, एखाद्या कामात तुमचं मन रमवा. रोज भरपूर पाणी प्या.
वृषभ राशीची लव्ह लाईफ (Taurus Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - नवीन आठवड्यात तुमची लव्ह लाईफ चांगली राहील. तुमच्या व्यक्तिमत्त्वाने तुम्ही इतरांना आकर्षित कराल. तसेच, तुमचे तुमच्या पार्टनरबरोबर काही वाद झाले असतील तर ते मिटवण्यासाठी हा आठवडा चांगला आहे.
करिअर (Career) - तुमचा तुमच्या कामाप्रती फोकस दिसून येईल. तसेच, आपल्या ध्येयाला घेऊन तुम्ही प्रामाणिक असाल. या आटवड्यात तुम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळतील. अनावश्यक वादविवादांपासून दूर राहा.
आर्थिक स्थिती (Wealth) - जेव्हा तुम्ही विनाकारण पैसे खर्च करणं बंद कराल तेव्हा तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा झालेली दिसेल. तसेच, तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लाभ मिळेल. या आठवड्यात तुमचा बजेट फिक्स करा.
आरोग्य (Wealth) - सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुमच्या आरोग्यात चांगली सुधारणा झालेली दिसेल. आरोग्याच्या बाबतीत छोट्या मोठ्या समस्यांकडे दुर्लक्ष करु नका. पालेभाज्यांचा आहारात समावेश करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















