एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Weekly Horoscope 08 July To 14 July 2024 : सर्व 12 राशींसाठी सुरू झालेला नवीन आठवडा कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

Weekly Horoscope 08 July To 14 July 2024 : साप्ताहिक राशीभविष्याच्या दृष्टीने काही राशीसाठी नवीन आठवडा खास असणार आहे. तर काही राशींना या काळात नुकसान सहन करावं लागेल. सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 08 July To 14 July 2024 : नवीन आठवडा काही राशींसाठी भाग्याचा असणार आहे. आजपासून नवीन आठवडा सुरू झाला आहे. हा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. काही राशींसाठी नवीन आठवडा (Weekly Horoscope) लाभदायी असेल.  जुलै महिन्याचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

मेष रास (Aries Weekly Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला राहील, या काळात तुम्हाला नफा आणि यश मिळेल. तुमच्या आयुष्यात काही समस्या उद्भवू शकतात, ज्या तुमच्यासाठी वेदनादायक असतील. धन आणि मान हानी होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात आनंद राहील. प्रेमसंबंधात प्रत्येक पाऊल सावधपणे उचला.

वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी नवा आठवडा शुभ राहील. हा काळ आनंदाचा असेल आणि तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. मालमत्तेच्या कामात दीर्घकाळ चाललेल्या अडचणी दूर होतील. या आठवड्यात तुम्ही काही शुभ कार्यात सहभागी होऊ शकता. आरोग्य सामान्य राहील.

मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभ राहील. तुम्हाला नोकरी शोधायची असेल तर या आठवड्यात तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. एखाद्या गुंतवणुकीत तुम्हाला फायदा होऊ शकतो. कोर्टाशी संबंधित प्रकरणांमध्ये निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. वैवाहिक जीवनात आनंद राहील.

कर्क रास (Cancer Weekly Horoscope)

कर्क राशीच्या लोकांनी नवीन आठवड्यात कोणत्याही कामात निष्काळजीपणा टाळा. या आठवड्यात नोकरदार लोकांना त्यांचं लक्ष्य साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. तुमचा आळस आणि तुमचा गर्व तुम्हाला त्रास देऊ शकतो. लव्ह लाईफमधील एखाद्या गोष्टीबद्दल तुमच्या जोडीदारासोबत गैरसमज होऊ शकतात.

सिंह रास (Leo Weekly Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा कठीण जाईल. या आठवड्यात तुमच्याकडे खूप काम असेल. तुम्हाला फार तणाव जाणवेल. व्यवसायात तुम्हाला तुमच्या विरोधकांना मागे टाकायचं असेल तर तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. भागीदारी व्यवसायात तुमच्या जोडीदारासोबत कोणत्याही प्रकारचे वाद टाळा. वैवाहिक जीवनात आनंद राहील.

कन्या रास (Virgo Weekly Horoscope)

नवीन आठवडा कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. या आठवड्यात तुम्हाला काही कामात यश मिळेल. जर तुम्हाला परदेशात करिअर करायचं असेल, तर या दिशेने तुमच्यासमोरचे मोठे अडथळे दूर होतील. तुमच्या प्रियकराशी तुमचं नातं मधुर राहील. या आठवड्यात तुम्ही एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी मोठी रक्कम खर्च करू शकता.

तूळ रास (Libra Weekly Horoscope)

या आठवड्यात तुम्हाला काही संकटांचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळेच कोणतंही पाऊल उचलताना सावधानता बाळगा. कोणत्याही प्रकारच्या संकटांचा सामना करण्यासाठी स्वत:च्या मनाची तयारी करून घ्या. या आठवड्यात तुमच्या कामात अडथळा येण्याची शक्यता आहे. तुमच्या सहनशक्तीची वेळोवेळी परीक्षा घेतली जाईल. त्यामुळे डोकं शांत ठेवून येणाऱ्या संकटांचा सामना करा.

वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)

या आठवड्यात तुम्ही धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. तसेच, भविष्याच्या संदर्भात तुम्ही नवीन योजना आखू शकता. तुम्ही सतत जर इतरांच्या भावनांचा विचार करत असाल तर यावेळी स्वत:च्या भावनांना प्राधान्य द्यायला शिका. याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. तसेच, तुमच्या स्वभावाचा इतरांना फायदा घेऊ देऊ नका. 

धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)

या आठवड्यात तुम्हाला अनेक संकटांचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे आयुष्यात येणाऱ्या संकटांना सामोरं जाण्याची आत्तापासूनच तयारी ठेवा. तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि आपुलकी असेल. कुटुंबियांच्या सहकार्यानेच तुम्ही अनेक आव्हानांना सामोरं जाण्याची तयारी दाखवू शकता. तसेच, या आठवड्यात तुमच्या आयुष्यात तुम्ही कधीच अपेक्षा न केलेल्या अशा घटना घडतील. 

मकर रास (Capricorn Weekly Horoscope)

जे तुमच्याबोवती नकारात्मक वातावरण निर्माण करतात अशा लोकांपासून आत्तापासूनच टार हात लांब राहा. कारण अशी माणसं तुम्हाला भविष्यात धोका देऊ शकतात. या आठवड्यात तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. तसेच, पैशांची गुंतवणूक करायची असेल, नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल तर हा आठवडा तुमच्यासाठी चांगला असणार आहे. 

कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी येणारा नवीन आठवडा काहीसा आव्हानात्मक असू शकतो. पैशांच्या बाबतीत कुंभ राशीच्या लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. या काळात तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. तुम्हाला तुमच्या भविष्या संदर्भात एखादा निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी संवाद साधा. मगच निर्णय घ्या. 

मीन रास (Pisces Weekly Horoscope)

नवीन आठवडा मीन राशीच्या लोकांसाठी चांगला राहील. जर तुम्ही आधीच कोणत्याही योजनेत पैसे गुंतवले असतील तर तुम्हाला त्यातून नफा मिळेल. दीर्घकाळ प्रलंबित असलेले व्यवहार पूर्ण होतील. तुम्हाला परदेशात करिअर करायचं असेल तर तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल. नोकरदार महिलांसाठी हा काळ चांगला राहील, उत्पन्नाचे अधिक स्रोत निर्माण होतील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Weekly Horoscope 08 July To 14 July 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी पुढचा आठवडा कसा असणार? जाणून घ्या लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 24 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMaitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी : 24 NOV 2024Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Embed widget