Weekly Horoscope 06 To 12 January 2025 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 06 To 12 January 2025 : नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.
Weekly Horoscope 06 To 12 January 2025 : नवीन आठवडा सुरु व्हायला अवघे काही दिवसच शिल्लक आहे. जानेवारीचा दुसरा आठवडा लवकरच सुरू होत आहे, त्यामुळे अनेक राशींसाठी हा आठवडा महत्त्वाचा असणार आहे. जानेवारी महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मेष रास (Aries Weekly Horoscope)
नवीन आठवड्यात आरोग्याकडे लक्ष द्यावं लागेल. जोडीदार आणि मुलं सुखात असतील. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून तुम्ही चांगलं काम कराल. आठवड्याच्या सुरुवातीला उत्पन्नात चढ-उतार होतील. प्रवासात अडचण संभवते. आठवड्याच्या मध्यात अतिरिक्त खर्चामुळे डोक्यावर ताण येईल. अज्ञात भीती तुम्हाला सतावेल. आठवड्याचा शेवट तुमच्यासाठी खूप चांगला असेल. नशीब सोन्यासारखं उजळेल. हव्या असलेल्या गोष्टी गरजेनुसार उपलब्ध होतील.
वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)
वृषभ राशीसाठी नवीन आठवडा फलदायी ठरेल. तुमची आर्थिक स्थिती या काळात चांगली असेल. आरोग्यात चढ-उतार जाणवतील. जोडीदाराला खुश ठेवाल. आठवड्याच्या सुरुवातीला एक-दोन दिवस व्यवसायात चढ-उतार जाणवतील. वडिलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. कोर्ट-कचेरीपासून लांब राहा. आठवड्याच्या मध्यात प्रवासात अडचण संभवते. उत्पन्नात चढ-उतार दिसतील. आठवड्याच्या शेवटी मानसिक स्थिती थोडी बिघडेल. अतिरिक्त खर्चामुळे मन अस्वस्थ होईल. एकंदरीत आठवडा तुमच्यासाठी चांगला नाही.
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)
नवीन आठवड्यात तुमचं आरोग्य उत्तम राहील. कौटुंबिक स्थिती चांगली असून व्यवसायही चांगला होईल.आठवड्याच्या सुरुवातीला लांबचा प्रवास टाळा. मध्येच नवीन व्यवसाय सुरू करू नका, सध्याचा व्यवसाय चालू द्या. कोर्टाची पायरी चढू नका. आठवड्याच्या शेवटी आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुम्हाला चांगली बातमी मिळेल. प्रलंबित पैसे परत मिळतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
कर्क राशीसाठी पुढचे 7 दिवस परिस्थिती फारशी चांगली नाही. या काळात तुमचं आरोग्य खालावेल, जोडीदाराचा हवा तसा पाठिंबा मिळणार नाही. आठवड्याच्या सुरुवातीला दुखापत होऊ शकते. तुम्ही काही अडचणीत येऊ शकता. तुमची एकंदरीत परिस्थिती प्रतिकूल असेल. एखादा व्यक्ती तुमचा अपमान करू शकतो. नोकरीत सहकाऱ्यांचं सहकार्य मिळेल. तुम्हाला व्यवसायात यश मिळेल. तब्येत सुधारेल.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा प्रगतीचा असणार आहे. तुमचं आरोग्य ठणठणीत राहील. नोकरीत स्थिती चांगली आहे, परंतु नोकरीत कोणतीही रिस्क घेऊ नका. आठवड्याच्या मध्येच दुखापत होण्याची भीती राहील. परिस्थिती प्रतिकूल असेल. शेवटच्या दिवसांत तुम्ही चांगल्या दिवसांच्या वाटेवर असाल. आर्थिक स्थिती मजबूत असेल, परंतु खर्चावर नियंत्रण ठेवा.
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येणार आहे. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने संबंध दृढ होतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ यशाचा असेल. वैयक्तिक जीवनातही आनंदाचं वातावरण राहील. एखादी मोठी व्यावसायिक डील मिळू शकते. आठवड्याच्या शेवटी प्रवासाचे योग आहेत.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :