Weekly Horoscope 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 04 To 10 November 2024 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.
Weekly Horoscope 04 To 10 November 2024 : नवीन आठवडा सुरु व्हायला अवघे काही दिवसच शिल्लक आहे. नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा फार खास असणार आहे. अनेक राशींसाठी हा आठवडा महत्त्वाचा असणार आहे. नोव्हेंबर महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबरचा पहिला आठवडा शुभ राहील. तुम्हाला तुमच्या कामात सकारात्मक परिणाम मिळतील. तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला चांगला बोनस मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. कुटुंबातील महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. प्रेम जीवनात अनुकूलता राहील. वैवाहिक जीवनात आनंद राहील. व्यवसायात नफा आणि वाढ होईल.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा उत्तम राहील. तुमची स्वप्नं साकार करण्यासाठी तुम्ही कठोर परिश्रम कराल. घरामध्ये आनंदाचं वातावरण राहील. जोडीदार तुमच्या हौशेची, आनंदाची पूर्ण काळजी घेईल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा उत्तम राहील. या आठवड्यात सणासुदीमुळे तुमचं काम चांगलं होईल. तुम्ही अचानक पिकनिकला जाऊ शकता. महिलांना धार्मिक कार्यात रस राहील. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून तुमच्या सुख-संपत्तीत वाढ होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा संमिश्र जाईल. तुमचा बॉस तुमच्यावर दया दाखवेल. कामाच्या ठिकाणी शत्रूंपासून सावध राहा. तुमचं नुकसान होऊ शकतं. लव्ह लाईफमध्ये तुम्ही मोठं पाऊल उचलू शकता. तुमचा प्रियदार तुम्हाला प्रत्येक निर्णयात पूर्ण साथ देईल. व्यावसायिकाला व्यवसायात काही मंदीचा सामना करावा लागू शकतो.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांना या आठवड्यात शुभ योगाची साथ मिळेल. तुमचं नशीब तुमची साथ देईल. करिअर आणि व्यवसायासाठी तुम्ही प्रवास करू शकता. सत्ता आणि सरकारमधील लोकांशी जवळीक वाढेल. तुम्हाला तुमच्या प्रियकरासोबत रोमान्सची संधी मिळेल. तुमच्या मुलांनी केलेली कोणतीही विशेष कामगिरी समाजात तुमचा सन्मान वाढवेल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा थोडा कठीण जाईल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. मालमत्तेशी संबंधित व्यवहार करण्याचा विचार करत असाल तर सल्लागाराचा सल्ला घ्या. या आठवड्यात तुमचे पैसे जास्त खर्च होऊ शकतात. तुमच्या जोडादीरासोबत उत्तम समन्वय ठेवा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :