Vivah Muhurta 2025: कुंभमेळ्याच्या महायोगात लग्न करणे म्हणजे भाग्योदयच! विवाहासाठी शुभ मुहूर्त आणि शुभ काळ दोन्हीही जाणून घ्या..
Vivah Muhurta 2025: लग्नासारखे शुभ कार्य एखाद्या शुभ मुहूर्तावर जितके होईल, तितकेच त्याचे सकारात्मक परिणाम भावी आयुष्यात दिसून येतील.
Vivah Muhurta 2025: तब्बल 12 वर्षातून एकदा आयोजित होणारा महाकुंभ यावेळी यंदा 13 जानेवारीपासून सुरू होणार आहे. हा महाकुंभ मेळा प्रयागराज येथे होणार आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर होणाऱ्या या महाकुंभमेळ्यात जगभरातून लाखो भाविक पोहोचणार आहेत. 12 वर्षातून एकदा धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व असलेला हा मेळा आयोजित केला जातो. या महाकुंभच्या महायोगात तुम्हीही लग्नाचा करण्याचा विचार करत असाल तर उत्तम ठरणार आहे. कारण लग्नासारखे शुभ कार्य एखाद्या शुभ मुहूर्तावर जितके होईल, तितकेच त्याचे सकारात्मक परिणाम भावी आयुष्यात दिसून येतील. जर तुम्हाला तुमचा लग्नाचा क्षण संस्मरणीय बनवायचा असेल, तर यावेळी तुम्ही महाकुंभाच्या महायोगात विवाह करू शकता, त्यासाठ महाकुंभ 2025 मध्ये लग्नासाठी किती शुभ मुहूर्त आहेत ते जाणून घेऊया.
महाकुंभ कधी सुरू होणार?
हिंदू दिनदर्शिकेनुसार, महाकुंभ 2025 हा 13 जानेवारीपासून सुरू होईल आणि 26 फेब्रुवारीला महाशिवरात्रीपर्यंत चालेल. या दरम्यान अनेक शुभ काळ आणि मुहूर्त येतील. यादरम्यान शाहीस्नानही होणार आहे. जगातील सर्वात महत्त्वाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांपैकी एक असलेला महाकुंभ पौष पौर्णिमेच्या दिवशी सुरू होईल. प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक येथे दर 12 वर्षांनी महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. मात्र, प्रयागराजमध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर होणारा महाकुंभ सर्वात भव्य मानला जातो. महाकुंभमेळ्यात स्नानाला खूप महत्त्व आहे.
विवाहासाठी शुभ काळ
16 जानेवारी 2025, गुरुवार
17 जानेवारी 2025, शुक्रवार
18 जानेवारी 2025, शनिवार
19 जानेवारी 2025, रविवार
20 जानेवारी 2025, सोमवार
21 जानेवारी 2025, मंगळवार
23 जानेवारी 2025, गुरुवार
24 जानेवारी 2025, शुक्रवार
26 जानेवारी 2025, रविवार
27 जानेवारी 2025, सोमवार
2 फेब्रुवारी 2025, रविवार
3 फेब्रुवारी 2025, सोमवार
6 फेब्रुवारी 2025, गुरुवार
7 फेब्रुवारी 2025, शुक्रवार
18 फेब्रुवारी 2025, मंगळवार
19 फेब्रुवारी 2025, बुधवार
21 फेब्रुवारी 2025, शुक्रवार
23 फेब्रुवारी 2025, रविवार
25 फेब्रुवारी 2025, मंगळवार
महाकुंभातील पहिले शाही स्नान कधी?
महाकुंभाचे पहिले शाही स्नान सोमवार, 13 जानेवारी, म्हणजेच पौष पौर्णिमेला, जत्रेच्या सुरुवातीच्या पहिल्या दिवशी होईल. पौष पौर्णिमेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. गंगेसह देशातील पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची परंपरा आहे. पौष पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यावर तप, जप, तपश्चर्या आणि दान केल्याने अनेक जन्मांच्या पापांपासून मुक्ती मिळते, अशी श्रद्धा आहे. या दिवशी स्नान, ध्यान, तपस्या आणि दान केल्याने भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो.
हेही वाचा>>>
Premanand Maharaj: कामवासनेवर नियंत्रण कसे ठेवाल? प्रेमानंद महाराजांनी दिला 'असा' सल्ला, सर्वच आश्चर्यचकित झाले..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )