Virgo Weekly Horoscope 29 April to 5 May : कन्या राशीने पैशांचा व्यवहार जपून; आठवड्याच्या सुरुवातीलाच होणार धनहानी, वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Virgo Weekly Horoscope 29 April to 5 May : नवीन आठवड्यात कन्या राशीच्या लोकांना जास्त दगदग करावी लागणार आहे. कामावर देखील तुम्ही खूप व्यस्त असाल, तुमच्यावर कामाचा ताण जास्त असेल.
Virgo Weekly Horoscope 29 April to 5 May : नुकताच सुरू झालेल नवीन आठवडा कन्या राशीच्या लोकांसाठी सावधानीचा असेल. या काळात तुम्हाला प्रेमसंबंधांत देखील अनेक आव्हानांचा सामना करावा लागेल. कामात तुम्ही जास्त व्यस्त असाल. काही जणांना नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या असंख्य संधी मिळतील. आर्थिक बाबतीत छोट्या-मोठ्या समस्या उद्भवतील. तुमचं आरोग्या मात्र या आठवड्यात सामान्य राहील. एकूणच कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? कन्या राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
कन्या राशीची लव्ह लाईफ (Virgo Love Horoscope)
या आठवड्यात लव्ह लाईफमध्ये नवीन रोमांचक वळणं येतील. तुमच्या जोडीदाराशी अशा विषयांवर चर्चा करू नका, ज्यामुळे नात्यात गैरसमज निर्माण होतील. नात्याशी संबंधित निर्णय अतिशय हुशारीने घ्या आणि तुमच्या जोडीदाराच्या मतांचाही आदर करा. नात्यातील कम्युनिकेशन गॅपमुळे काही लोकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं, त्यामुळे कोणतीही गोष्ट मनात धरुन जास्त वेळ रागवू नका आणि संभाषणातून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. कन्या राशीचे काही लोक या आठवडयात त्यांच्या आधीच्या प्रियकराला भेटू शकतात, ज्यामुळे जुन्या प्रेमाच्या आठवणी ताज्या होऊ शकतात. मात्र, विवाहित व्यक्तींनी असं अजिबात करू नये.
कन्या राशीचे करिअर (Virgo Career Horoscope)
जे लोक त्यांच्या नोकरीवर खूश नाहीत, त्यांना या आठवड्यात नोकरी बदलण्याच्या अनेक संधी मिळू शकतात. ऑफिसमधील सहकाऱ्यांसोबत मिळून काम करा. नवीन कामाची जबाबदारी घेण्यास संकोच करू नका. ऑफिसच्या मीटिंगमध्ये सर्वांसमोर आपल्या कल्पना मांडण्यास अजिबात घाबरू नका. या आठवड्यात मार्केटिंग आणि सेल्सच्या व्यक्तींना कामासाठी जास्त प्रवास करावा लागेल. आरोग्यसेवेतील व्यावसायिकांना परदेशात काम करण्याच्या ऑफर मिळू शकतात.
कन्या राशीची आर्थिक स्थिती (Virgo Wealth Horoscope)
या आठवड्यात आर्थिक बाबींमध्ये अत्यंत हुशारीने निर्णय घ्या. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला पैशांशी संबंधित किरकोळ समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. काही लोकांना भाऊ, बहिणी किंवा मित्रांना आर्थिक मदत करावी लागेल. व्यावसायिकांना व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन ठिकाणांहून निधी मिळेल. कर्जातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
कन्या राशीचे आरोग्य (Virgo Health Horoscope)
या आठवड्यात आरोग्याबाबत फारशी समस्या उद्भवणार नाही. परंतु महिलांना स्त्रीरोगविषयक आजारांशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. या आठवड्यात जास्त वेगाने गाडी चालवू नका. गर्भवती महिलांनी बाईक चालवणं टाळावं. जंक फूडचे सेवन टाळा. रोज योगा आणि व्यायाम करा. यामुळे तुमचं एकूणच आरोग्य सुधारेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: