एक्स्प्लोर

Bacchu Kadu : विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी किंगमेकर ठरणार, किती जागा निवडून येणार? बच्चू कडूंनी आकडा सांगितला

Vidhan Sabha Elections 2024 : तिसऱ्या आघाडीच्या 25 ते 30 जागा टफ फाईटमध्ये असून मोठ्या पक्षांना आम्हाला पाठिंबा द्यावा लागेल असा दावा बच्चू कडूंनी केला आहे.

Vidhan Sabha Elections 2024 : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत 65 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झालं. यानंतर अर्ध्या नेत्यांची धाकधूक वाढली, तर अर्धे नेते रिलॅक्स मोडमध्ये आहेत. यापैकीच एक म्हणजे, बच्चू कडू. मतदानानंतर बच्चू कडू (Bacchu Kadu) रिलॅक्स झाले आहेत, ते सध्या त्यांच्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत.  यावेळी तिसऱ्या आघाडीचे 25 ते 30 जागा टफ फाईटमध्ये आहे, पण आमच्या प्रहारच्या 10 जागा निवडून येतील, असा विश्वास प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.

मतदानानंतर बच्चू कडूंचा रिलॅक्स मोड ऑन

अचलपूर मतदार संघाचे विद्यमान आमदार बच्चू कडू सध्या त्यांच्या कुरळ पूर्णा गावी आहेत. त्या ठिकाणी बच्चू कडू आणि त्यांच्या पत्नी डॉ. नयना कडू हे दोघे बऱ्याच दिवसांनी गप्पा मारताना दिसले. बच्चू कडू हे महिनाभर सतत सकाळपासून रात्री उशिरापर्यंत मतदारसंघात प्रचार करताना दिसले. इतकंच नाही, तर बाहेर जिल्ह्यात सुद्धा त्यांना जावं लागलं. यावेळी बच्चू कडू यांनी परिवर्तन महाशक्ती म्हणून तिसरी आघाडी उभी केली आहे.

आमच्याशिवाय सरकार बसणार नाही - बच्चू कडू 

कोणत्याही पक्षाजवळ बहुमत राहणार नाही, मात्र अमच्याशिवाय सरकार बसणार नाही, असा दावाही त्यांनी यावेळी केला आहे. आर्वी येथे जयकुमार बेलखडे या प्रहारच्या उमेदवारासाठी आर्वी येथे सभा घेण्यात आली होती. यावेळी बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी आक्रमक झाले असून त्यांनी सरकारवर निशाणा साधला. संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही 122 जागा उभ्या केल्या, त्यात 40 जागा प्रहारच्या आहे. त्यातल्या त्यात प्रहार 10-15 जागावर दणका ठेवणार आहे. त्यात आर्वीचा समावेश असल्याचंही ते म्हणाले.

आता प्रजेचं राज्य निर्माण करावं लागेल - बच्चू कडू

पक्ष मोठा नाही, तर कार्यकर्ता हा पक्षाला मोठा करतो, अनेक गोष्टी धर्म आणि जातीच्या नावावर पेटवल्या जातात. मात्र मित्रहो हे नामर्दांची औलाद आहे, हे धर्म आणि जातीशिवाय निवडून येत नाही. पन्नास वर्षे काँग्रेस, तर पंधरा वर्षे भाजप सत्तेत राहिली, महाराष्ट्रात काय बदल झाला. आजही तलाठी छाती ठोक आमच्यासमोर उभा असतो. प्रजेचं राज्य नाही तर  कर्मचारी, अधिकारी आणि नेत्यांचं राज्य आहे. आमचं राज्य संपलं आता प्रजेचं राज्य निर्माण करावं लागतंय, असंही बच्चू कडू यावेळी म्हणाले. 

हेही वाचा:

Maharashtra Vidhan Sabha 2024 : महाराष्ट्रात ठाकरेंचं सरकार की भाजपचं? कोण होणार पुढचा मुख्यमंत्री? प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rajesaheb Deshmukh: धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Rajesh Kshirsagar : हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
तब्बल 30 वर्षांनी मतदानाचा टक्का वाढला; तेव्हा पवारांची सत्ता युतीने खेचली अन् आता युतीविरोधात तेच पवार उभा ठाकले! निकराच्या झुंजीत कोण बाजी मारणार?
तब्बल 30 वर्षांनी मतदानाचा टक्का वाढला; तेव्हा पवारांची सत्ता युतीने खेचली अन् आता युतीविरोधात तेच पवार उभा ठाकले! निकराच्या झुंजीत कोण बाजी मारणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sambit Patra on Gautam Adani : छत्तीगडमध्ये काँग्रेसच्या काळात अदानींची गुंतवणूक कशीKolhapur School Prayer : ए मत कहो खुदासे या प्रार्थनेवर पालकांचा आक्षेपRahul gandhi PC On Adani : “अदानींवर अमेरिकेचेही गंभीर आरोप, पण अटक होणार नाही, कारण…”- गांधीHemant Rasne Kasaba Pune : हेमंत रासनेंचा मिसळीवर ताव; विजयावर विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajesaheb Deshmukh: धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Rajesh Kshirsagar : हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
तब्बल 30 वर्षांनी मतदानाचा टक्का वाढला; तेव्हा पवारांची सत्ता युतीने खेचली अन् आता युतीविरोधात तेच पवार उभा ठाकले! निकराच्या झुंजीत कोण बाजी मारणार?
तब्बल 30 वर्षांनी मतदानाचा टक्का वाढला; तेव्हा पवारांची सत्ता युतीने खेचली अन् आता युतीविरोधात तेच पवार उभा ठाकले! निकराच्या झुंजीत कोण बाजी मारणार?
प्रणिती ताईंची गाडी फोडण्याआधी तुझी गाडी फोडतो; काँग्रेसच्या युवक नेत्याचा इशारा; मविआत मोठी बिघाडी
प्रणिती ताईंची गाडी फोडण्याआधी तुझी गाडी फोडतो; काँग्रेसच्या युवक नेत्याचा इशारा; मविआत मोठी बिघाडी
Maharashtra Vidhan Sabha Election Result: एक्झिट पोलचे निकाल समोर येताच मविआच्या हालचाली सुरु, जयंत पाटील-बाळासाहेब थोरातांकडून अपक्ष, बंडखोर आमदारांशी संपर्क
एक्झिट पोलच्या निकालानंतर मविआचे वाऱ्याची दिशा ओळखणारे जाणते नेते कामाला लागले
Ajit Pawar vs Yugendra Pawar: बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, जानकरांचा दावा, प्रफुल पटेल म्हणाले, हा दादा नव्हे, दुसरा दादा पडणार!
बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, उत्तम जानकरांचा धक्कादायक दावा
Hasan Mushrif : हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
Embed widget