Venus-Saturn Yuti 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर शुक्र-शनीची युती; 28 डिसेंबरपासून 'या' 4 राशी ठरतील भाग्यवान, सुख-समृद्धीत होणार वाढ
Venus-Saturn Yuti 2024 : 28 डिसेंबर रोजी शुक्र ग्रह रात्री 11 वाजून 48 मिनिटांनी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत आधीपासूनच शनी विराजमान आहे.
Venus-Saturn Yuti 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र ग्रहाला धन-संपत्ती आणि ऐश्वर्याचा कारक ग्रह मानला जातो. शुक्र ग्रह (Venus) प्रत्येक 26 दिवसांनी राशी परिवर्तन करतो त्यामुळे सर्व 12 राशींवर याचा प्रभाव पाहायला मिळतो. 2024 वर्षाच्या शेवटी देखील म्हणजेच 28 डिसेंबर रोजी शुक्र ग्रह रात्री 11 वाजून 48 मिनिटांनी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत आधीपासूनच शनी (Shani Dev) विराजमान आहे. या राशीत जवळपास 30 वर्षांनंतर शुक्र आणि शनीची युती पाहायला मिळणार आहे. यामुळे 4 राशींच्या (Zodiac Signs) लोकांना चांगला लाभ मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी शुक्र आणि शनीचा हा संयोग फार लाभदायक ठरणार आहे. या दरम्यान तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ झालेली असेल. तसेच, उत्पन्नाचे नवीन मार्ग तुमच्यासमोर खुले होतील. नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन देखील मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचं मनोबल वाढेल. यात्रेचा शुभ योग जुळून येणार आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या भाग्यस्थानी हा योग जुळून आला आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, करिअरमध्ये प्रगतीचे अनेक शुभ योग जुळून आले आहेत. तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ झालेली दिसेल. तुम्ही धार्मिक यात्रेला जाण्याचा योग लवकरच जुळून येणार आहे.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या आठव्या चरणात शुक्र आणि शनीची युती होणार आहे. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, अनेक दिवसांपासून तुमची रखडलेली कामे या काळात पूर्ण होतील. जे नोकरीच्या शोधातच आहेत त्यांना लवकरच मनासारखी नोकरी मिळेल. पदोन्नतीचे योग जुळून आले आहेत.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी शुक्र आणि शनीचा संयोग फार लाभदायक ठरणार आहे. कुंभ राशीतच ही युती होणार असल्याने तुम्हाला चांगला फायदा होईल. या काळात तुमच्या व्यवसायाचा अधिक विस्तार होईल. तसेच, नवीन व्यवसायिक संबंध प्रस्थापित होतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: