Vat Purnima 2024 : पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात वटपौर्णिमेची पूजा; जाणून घ्या पूजा विधी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व
Vat Purnima 2024 : वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे.
Vat Purnima 2024 : ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमेचा (Vat Purnima) सण साजरा केला जातो. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचा दिवस हा वटपौर्णिमेचा दिवस म्हणून साजरा करतात. वटपौर्णिमेला काही भागांत 'वटसावित्री' या नावाने देखील हा सण साजरा करतात.
आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी तसेच निरोगी जीवनासाठी तसेच उत्तम आरोग्यासाठी महिला वटपौर्णिमेचा उपवास करतात आणि वडाच्या झाडाची पूजा करतात. वटपौर्णिमेचा दिवस कधी आणि या दिवशीचा शुभ मुहूर्त नेमका कधी आहे ते जाणून घेऊयात.
वटपौर्णिमा 2024 पूजेचा तिथी (Vat Purnima 2024 Puja Tithi)
यंदा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी शुक्रवारी 21 जून रोजी आहे. त्यामुळे या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करतील. पौर्णिमा तिथी 21 जूनला सकाळी 7 वाजून 31 मिनिटांनी सुरु होईल आणि 22 जूनला संध्याकाळी 5 वाजून 37 मिनिटांनी संपेल.
वटपौर्णिमा पूजेचा शुभ मुहूर्त (Vat Purnima 2024 Shubh Muhurta)
वडाच्या झाडाला पूजण्यासाठी 21 जून रोजी सकाळी 5 वाजून 24 मिनिटांनी ते 10 वाजून 30 मिनिटांपर्यंत असणार आहे.
पतीच्या दिर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेचं व्रत
या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचं व्रत करतात. तसेच झाडाभोवती कच्चा धागा गुंडाळून तीन परिक्रमा करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.
वडाच्या झाडाचे धार्मिक महत्त्व (Vat Purnima 2024 Importance)
धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाचे मोठे महत्व सांगितले आहे. हे झाड त्रिमूर्तीचे, सालात विष्णूचे, मुळात ब्रह्मा आणि फांद्यामध्ये शिवाचे प्रतीक आहे. हे झाड दीर्घकाळ अक्षय राहते, म्हणून त्याला 'अक्षयवत' असेही म्हणतात. सौभाग्यवतीचे वरदान मिळण्याबरोबरच आरोग्यासाठीही या वटवृक्षाची पूजा केली जाते. भगवान शिवही वटवृक्षाखाली ध्यानधारणा करत असत. वटवृक्ष अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. देवतेसमान मानले जाणारे वटवृक्ष सर्व मनोकामना पूर्ण करण्याचे केंद्र मानले जाते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: