June 2024 Festivals : वटपौर्णिमा, अंगारकीसह जून महिन्यात येतायत 'हे' मोठे सण; जाणून घ्या सण-उत्सवांच्या तारखा
June Month 2024 Festivals : जून महिन्यासोबत ज्येष्ठ महिना देखील सुरू होत आहे. या महिन्यात अनेक मोठे सण-उत्सव येणार आहेत. जून महिन्यात येणारे सण आणि त्यांच्या तारखा जाणून घ्या.
June 2024 Month Festival : सण-उत्सव आणि उपवासांच्या दृष्टीने जून महिना खूप महत्त्वाचा मानला जातो. त्यात जून महिन्यात ज्येष्ठ महिन्याला देखील सुरुवात होत आहे. या महिन्यात अनेक व्रत-उत्सव केले जातात. जून महिन्यात नारायणाच्या लाडक्या निर्जला एकादशीपासून दसऱ्यापर्यंत अनेक मोठे सण होणार आहेत.
जून महिना (June Month 2024) उपवास आणि सणांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा मानला जातो. इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे, हा वर्षातील सहावा महिना आहे. या महिन्यात गंगा दशहरा, विनायक चतुर्थी, निर्जला एकादशी, कबीर जयंती, (Kabir Jayanti 2024) वट पौर्णिमा (Vat Pournima 2024) असे विविध सण (Festivals) आहेत. या महिन्याच्या अखेरीस अंगारक संकष्ट चतुर्थी देखील आहे. जूनमध्ये येणार्या प्रमुख उपवास आणि सणांची यादी जाणून घेऊया.
जून 2024 मधील महत्त्वाचे सण-उत्सव आणि व्रत (List of June 2024 Festivals)
2 जून - अपरा स्मार्त एकादशी
3 जून - भागवत एकादशी
4 जून- मासिक शिवरात्री, भौमा प्रदोष व्रत
5 जून - अमावस्या
6 जून- शनि जयंती, वैशाख अमावस्या
7 जून- चंद्रदर्शन, करिदिन, गंगादशहरा प्रारंभ
9 जून - महाराणा प्रताप जयंती
10 जून- विनायक चतुर्थी व्रत
12 जून - अरण्यषष्ठी
14 जून- मासिक दुर्गाष्टमी व्रत
16 जून - गंगादशहरा समाप्ती
17 जून- इद उल जुहा (बकरीद)
18 जून - निर्जला एकादशी
19 जून- प्रदोष व्रत
21 जून- वटपौर्णिमा,
25 जून - अंगारक संकष्टी चतुर्थी
28 जून- कालाष्टमी
वटपौर्णिमा (21 जून)
ज्येष्ठ महिन्यातील सुवासिनींसाठी महत्त्वाचा असलेला सण म्हणजे वटपौर्णिमेचा सण होय. या दिवशी सुवासिनी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि वडाला 7 फेऱ्या घालतात. पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुवासिनी देवाकडे प्रार्थना करतात. 21 जूनला ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला हा सण यंदा साजरा केला जाईल.
अंगारक संकष्ट चतुर्थी (25 जून)
अंगारक संकष्ट चतुर्थी हा दिवस हिंदूंसाठी अतिशय महत्वाचा दिवस असतो. ज्येष्ठ महिन्यातील मंगळवारी 25 जूनला ही चतुर्थी साजरी केली जाईल. हा दिवस गणपती बाप्पांना समर्पित असून अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणून ही हा दिवस ओळखला जातो. या दिवशी अनेक जण व्रत करतात आणि उपवास धरतात.
निर्जला एकादशी (18 जून)
निर्जला एकादशीचं व्रत 18 जून रोजी ठेवण्यात येत आहे. ही एकादशी महाएकादशी मानली जाते. असं मानलं जातं की, हे व्रत केल्याने सर्व 24 एकादशींचं पुण्य प्राप्त होतं. या उपवासात पाणी पिण्यास देखील मनाई आहे. ही एकादशी भगवान विष्णूला अतिशय प्रिय आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: