Vastu Tips : बाथरुममध्ये ठेवलेल्या या 6 गोष्टी घरामध्ये दारिद्र्य आणतात, वास्तुदोष होतो, वास्तुशास्त्रात म्हटंलय..
Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये काही वस्तू ठेवणे दारिद्र्यतेला आमंत्रण देण्यासारखे आहे. वास्तूनुसार कोणत्या गोष्टी बाथरूममध्ये ठेवल्याने गरिबी येते? वास्तु टिप्स जाणून घ्या.
Vastu Tips : वास्तुशास्त्रात ऊर्जेला विशेष महत्त्व मानले गेले आहे. यानुसार, घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये एक विशेष ऊर्जा असते, जी व्यक्तीच्या जीवनावर नक्कीच प्रभाव पाडते. वास्तूमध्ये घराच्या बाथरूमसाठी काही खास नियमही सांगण्यात आले आहेत. वास्तूशास्त्रानुसार बाथरूममध्ये ठेवलेल्या काही वस्तू घरात गरिबी आणतात. त्यांच्याबद्दल जाणून घ्या
वास्तुशास्त्राचा आपल्या जीवनावर प्रभाव
वास्तुशास्त्राचा आपल्या जीवनावर खूप प्रभाव पडतो. या अंतर्गत तुम्ही तुमच्या घरात कोणती वस्तू ठेवता आणि कोणत्या दिशेला याचा प्रभाव पडतो. आपल्या घराच्या बाथरूमशी संबंधित वास्तुशास्त्रात काही खास नियम आहेत. त्यानुसार बाथरूममध्ये ठेवलेल्या काही वस्तू घरात गरिबी आणतात. कोणत्या आहेत त्या वस्तु?
'या' गोष्टी बाथरूममध्ये ठेवू नका
वास्तुशास्त्रानुसार, आपल्या बाथरूममध्ये चुकूनही तुटलेला आरसा लावू नये. घरामध्ये तुटलेला आरसा ठेवल्याने वास्तू दोष निर्माण होतात. त्यामुळे घरात गरिबी येते आणि आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते.
तुटलेली चप्पल बाथरूममध्ये अजिबात ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार तुटलेली चप्पल घरात नकारात्मक ऊर्जा आणते. तुमची चप्पल तुटली असेल तर लगेच घराबाहेर फेकून द्या.
वास्तुशास्त्रात बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवणे अशुभ मानले जाते. घरात ठेवलेली रिकामी बादली अशुभ घडवते. त्यामुळे बाथरूममध्ये बादली नेहमी भरलेली ठेवावी.
तुमचा बाथरूमचा नळ खराब असेल तर लवकरात लवकर दुरुस्त करा. वास्तूनुसार नळातून टपकणारे पाणी घरात नकारात्मक ऊर्जा आणते. त्यामुळे घरखर्चही वाढू लागतो.
ओले कपडे बाथरूममध्ये ठेवू नयेत. वास्तूनुसार, ओले कपडे असल्यास ते धुवा आणि लगेच घराबाहेर सुकविण्यासाठी ठेवा. स्नानगृहात ओले कपडे सोडल्याने सूर्यदोष होतो.
वास्तूनुसार बाथरूममध्ये झाडे कधीही ठेवू नयेत. असे मानले जाते की बाथरूममध्ये ठेवलेली झाडे लवकर खराब होतात आणि घरातील वास्तु दोष वाढवतात.
वास्तू दोष बनतात आर्थिक संकटाचे कारण
अनेकवेळा असे घडते की, काही घरांमध्ये पैशाची सतत कमतरता असते. पती-पत्नी दोघांनी मिळून कमावल्यानंतरही घरातील आर्थिक संकट संपताना दिसत नाही. अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च होतात आणि तुम्हाला हवं असलं तरी थोडे पैसेही वाचवता येत नाहीत. वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार, तुमच्या घरात असलेले वास्तू दोष आर्थिक संकटाचे कारण असू शकतात. वास्तुशास्त्रनुसार असे काही उपाय जाणून घ्या, जेणेकरुन तुम्ही अशा प्रकारच्या चूकांपासून दूर राहू शकता.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :