Vastu Tips : महिलांनी झोपण्यापूर्वी 'या' 5 गोष्टी अवश्य कराव्यात, सुख-समृद्धी वाढेल, वास्तुशास्त्रात म्हटंलय...
Vastu Tips: घरातील महिलांनी केलेल्या कामामुळे सुख-समृद्धी येते कारण हिंदू धर्मात स्त्रीला लक्ष्मीचे रूप मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार स्त्रीने केलेले हे उपाय घरातील समस्या दूर करतात.
![Vastu Tips : महिलांनी झोपण्यापूर्वी 'या' 5 गोष्टी अवश्य कराव्यात, सुख-समृद्धी वाढेल, वास्तुशास्त्रात म्हटंलय... Vastu Tips marathi news according to vastu shashtra Women Do This Work Before Sleeping Vastu Tips : महिलांनी झोपण्यापूर्वी 'या' 5 गोष्टी अवश्य कराव्यात, सुख-समृद्धी वाढेल, वास्तुशास्त्रात म्हटंलय...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/01/34ce6f4744d18e8c03ae3375fb9773b71696145717806381_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Vastu Tips For Women : हिंदू धर्मात घरातील स्त्रीला देवी लक्ष्मीचा (Goddess Lakshmi) अवतार मानले जाते. म्हणून असे मानले जाते की, ज्या घरात स्त्री प्रसन्न असते, तिथे देवी लक्ष्मी निवास करते आणि तिच्या कुटुंबावर कृपावर्षाव होतो. त्याचबरोबर ज्या घरात स्त्रिया दु:खी राहतात त्या घरात दु:ख आणि नकारात्मक उर्जेचे वातावरण असते.
ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात उपाय
वास्तुशास्त्रानुसार स्त्रीने केलेल्या कामाचा परिणाम कुटुंबावरही होतो. ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत, ज्याने घरातील सर्व समस्या दूर होतात, गरिबी नष्ट होते, नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. पण स्त्रियांनी झोपण्यापूर्वी हे उपाय करावेत, तरच फायदा होईल. या उपायांबद्दल जाणून घ्या.
वास्तू दोष बनतात आर्थिक संकटाचे कारण
अनेकवेळा असे घडते की, काही घरांमध्ये पैशाची सतत कमतरता असते. पती-पत्नी दोघांनी मिळून कमावल्यानंतरही घरातील आर्थिक संकट संपताना दिसत नाही. अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च होतात आणि तुम्हाला हवं असलं तरी थोडे पैसेही वाचवता येत नाहीत. वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार, तुमच्या घरात असलेले वास्तू दोष आर्थिक संकटाचे कारण असू शकतात. वास्तुशास्त्रनुसार असे काही उपाय जाणून घ्या, जेणेकरुन तुम्ही अशा प्रकारच्या चूकांपासून दूर राहू शकता.
महिलांनी हे काम झोपण्यापूर्वी करावे
वास्तुशास्त्रानुसार रात्री झोपण्यापूर्वी स्त्रीने कापूर जाळून संपूर्ण घराला दाखवावा. हा उपाय केल्याने घरातून नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढू लागतो.
यासोबतच कौटुंबिक मतभेदही संपतात. बेडरूममध्ये कापूर जाळल्याने पती-पत्नीच्या वैवाहिक नात्यात गोडवा येतो.
रात्री झोपण्यापूर्वी स्त्रीने घराच्या प्रवेशद्वारावर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. हा उपाय केल्याने घरातील सुख-समृद्धी वाढते आणि देवी लक्ष्मीही प्रसन्न राहते.
घरातील स्त्रीने झोपण्यापूर्वी देवघरात अगरबत्ती लावावी. यानंतर देवघरात पडदा लावून झोपावे.
झोपण्यापूर्वी आपले हात पाय चांगले धुवा आणि कमीतकमी 5 मिनिटे आपल्या आवडत्या देवतेचे ध्यान करा आणि नंतर झोपा.
सहसा लोक झोपण्यापूर्वी घरातील सर्व दिवे बंद करतात. पण लक्षात ठेवा की घराचा नैऋत्य कोपरा अंधार नसावा. त्यामुळे झोपण्यापूर्वी येथे दिवा लावावा.
दिवा लावणे शक्य नसेल तर या दिशेला छोटा बल्ब लावा. या दिशेला प्रकाश असल्यास पूर्वज प्रसन्न होतात आणि घरामध्ये सुख-समृद्धी टिकून राहते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :
Monthly Horoscope October 2023 : ऑक्टोबर महिन्यात 'या' राशींना अनेक लाभ, इतर राशींचे मासिक राशीभविष्य जाणून घ्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)