Vastu Tips : तुळशीच्या बाजूला लावा फक्त 'ही' छोटी रोपं; काही दिवसांत दिसेल जादू, धनात होईल डबल वाढ
Vastu Tips : तुमच्या घरातही तुळशीचं रोप असेल तर त्यासोबत तुम्ही काही रोपं नक्की लावली पाहिजे, यामुळे घराची भरभराट होते आणि घरात धन-संपत्ती टिकून राहते.
Tulsi Vastu Tips : हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. आपल्याकडे तुळशीला देवाचा दर्जा दिला जातो. तुळशी ही विष्णू देवाची लाडकी आहे, तुळशीला (Tulsi) लक्ष्मी प्रमाणे पाहिलं जातं. तुळशीच्या रोपात लक्ष्मी आणि विष्णू दोघांचं स्थान असतं, त्यामुळे तुळशीची दररोज पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते. वास्तुशास्त्रात तुळशीबाबत विविध नियम आहेत.
घरात तुळशीचं रोप (Tulsi Plant) लावल्याने नकारात्मकता दूर होते. याशिवाय तुळशीमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्मही आढळतात, जे आरोग्यासाठी खूप फलदायी मानले जातात. घरात तुळशीचं रोप असल्याने घरात धन-धान्याची कमतरता भासत नाही. वास्तू शास्त्रानुसार, तुळशीच्या रोपासोबत बाजूलाच काही खास झाडं लावल्याने घरात सुख-समृद्धी नांदते आणि पैशांची आवक दुप्पट होते. तुळशीसोबत नक्की कोणती झाडं लावावी? जाणून घेऊया.
शमीचं रोप
वास्तूशास्त्रात शमीच्या वनस्पतीला फार महत्त्व आहे. शमीचं रोप हे फार शुभ मानलं जातं. शमीच्या वनस्पतीचा शनिदेवाशी संबंध आहे आणि या रोपाची पानं शंकराला देखील अर्पण केली जातात. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, तुळशीच्या रोपासोबत शमीचं रोप घरात लावल्यास कुटुंबाची भरभराट होते आणि अनेक पटींनी लाभ होतो. त्यामुळे घरात जिथे तुळशीचं रोप लावलं जातं, तेथे शमीचं रोपही लावलं पाहिजे.
काळा धोतरा
शंकर देवाला काळा धतुरा अर्पण केला जातो. शंकराला काळा धोतरा फार प्रिय आहे. काळ्या धोतर्याच्या रोपामध्ये भगवान शिव वास करतात, अशी मान्यता आहे. घरामध्ये हे रोप लावल्याने भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो. यासोबतच धोतऱ्याची घरात नित्य पूजा केल्याने व्यक्तीचे सर्व कष्ट दूर होतात आणि पितृदोषापासून देखील मुक्ती मिळते. तुळशीसोबत काळ्या धोतर्याचं रोप लावल्याने शंकराची कृपा प्राप्त होते, यामुळे तुम्हाला व्यवसायात देखील प्रगती जाणवेल.
केळी
घराबाहेरच केळीचं झाड लावणं खूप शुभ मानलं जातं आणि त्यातही जर तुळशीच्या जवळ केळीचं रोप लावलं तर त्याचे अनेक फायदे होतात, यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. घरात सुख-समृद्धी नांदते. मात्र तुळस आणि केळी अगदी बाजूबाजूला न लावता ही रोपं थोडी अंतर राखून लावावी. मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला केळीचं रोप आणि उजव्या बाजूला तुळशीचं रोप लावावं. या दोन्ही रोपांमुळे घरातील धन-ऐश्वर्यात वाढ होते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Rahu 2024 : राहू 'या' राशींवर पडणार भारी; येता काळ संघर्षाचा, वर्षभर अडचणी संपता संपणार नाही