एक्स्प्लोर

Vastu Tips : सतत पैशांची कडकी भासत असेल तर घरी आणा 'या'पैकी कोणतीही एक वस्तू; कधीही भासणार नाही पैशांची कमी

Vastu Tips For Money : वास्तुनुसार काही वस्तू घरात आणणं खूप शुभ मानलं जातं. या वस्तू घरात ठेवल्याने घराची आर्थिक स्थिती सुधारते आणि घरात आनंद टिकून राहतो.

Vastu Tips For Money : आपलं जीवन नेहमी सुख-समृद्धीने भरलेलं असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. धनाची देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लोक विविध उपाय करतात. घरातील तिजोरी नेहमी भरलेली राहावी यासाठी वास्तुशास्त्र (Vastu Shastra) आणि फेंगशुईमध्ये अनेक वस्तूंचं महत्त्व सांगण्यात आलं आहे. घरातील आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी विविध वस्तूंचा वापर केला जातो, या वस्तूंमध्ये एक विशिष्ट सकारात्मक ऊर्जी असते, ज्यामुळे घराची भरभराट होते. अशा नेमक्या कोणत्या गोष्टी (Vastu Tips) आहेत ज्या घरात आणल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते? जाणून घेऊया.

विंड चाईम (Wind Chime)

विंड चाईम हे लहान झुंबरासारखं असतं, याच्या एकमेकांना आदळणाऱ्या छोट्या दांड्यांच्या आवाजातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते, यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते. वास्तुशास्त्रात विंड चाईम अतिशय शुभ मानलं जातं. यातून निघणारा गोड आवाज घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा आणतो. घरात नेहमी कलहाचं वातावरण असेल आणि घरातील सदस्यांमध्ये भांडणं होत असतील, तर याचं एक कारण घरात असलेली नकारात्मक ऊर्जा असू शकतं. म्हणून तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी तुम्ही विंड चाईम आणू शकता. वास्तूनुसार घरात विंड चाईम लावल्याने घरातील गरिबी दूर होते आणि घरात पैसा येतो. विंड चाईम लावल्याने घरावरील वाईट नजर देखील दूर होते.

लाफिंग बुद्धा (Laughing Buddha)

चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी लाफिंग बुद्धावर टाकलेली एक नजर पुरेशी असते. आनंदी दिसणारा हा फेंगशुई आयटम जीवनात सकारात्मकता वाढवतो. खरं तर, लाफिंग बुद्धाला आनंद आणि समृद्धीचा खजिना मानला जातो. लाफिंग बुद्धा घरात आनंद आणतो. लाफिंग बुद्ध घरात ठेवल्याने कधीही पैशाची कमतरता भासत नाही, घरातील आर्थिक स्थिती सुधारते. हे लाफिंग बुद्धा ऑनलाईन आणि ऑफलाईन मिळतात. गिफ्ट स्वरुपात मिळालेला लाफिंग बुद्धा फार लकी समजला जातो.

बांबूचं रोप (Lucky Bamboo Plant)

बांबूचं छोटं झाड घरासाठी शुभ मानलं जातं. काचेच्या ग्लासात ठेवलेले छोटे लकी बांबू हे आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपयोगी मानले जातात. घराच्या पूर्व कोपऱ्यात बांबूचं झाड ठेवल्याने घरात सुख-समृद्धी टिकून राहते आणि घरात सकारात्मक ऊर्जा पसरते. बांबूचं रोप घरात ठेवल्याने घरातील सर्व सदस्य निरोगी राहतात. घरात पैशाची आवक होत राहते.

अ‍ॅक्वॅरियम (Aquarium)

वास्तुशास्त्रात मासे हे सौभाग्याचे सूचक मानले जातात. घरात अ‍ॅक्वॅरियम, म्हणजेच फिश टँक असणं ही समृद्धीची निशाणी आहे. ज्या घरात फिश टँक आहे, त्या घरात सुख-समृद्धी टिकून राहते, असं म्हणतात. फिश टँक नेहमी घराच्या उत्तर दिशेला ठेवावं. उत्तर ही संपत्तीची दिशा आणि कुबेर देवाची दिशी मानली जाते. उत्तर दिशेला फिश टँक ठेवल्याने घरात समृद्धी येते, असं म्हटलं जातं.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Vastu Tips : पोळपाट लाटण्यामुळे येऊ शकते गरिबी; विश्वास बसत नसेल तर वाचा

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप
Shani Dev: 2027 वर्ष शनिचं वर्चस्व..कोणाचे कष्ट संपणार? कोणासाठी आव्हानात्मक? पैसा, नोकरी, प्रेमात लाभ कि नुकसान? आयुष्यात 'असे' बदल, ज्योतिषशास्त्र..
2027 वर्ष शनिचं वर्चस्व..कोणाचे कष्ट संपणार? कोणासाठी आव्हानात्मक? पैसा, नोकरी, प्रेमात लाभ कि नुकसान? आयुष्यात 'असे' बदल, ज्योतिषशास्त्र..
Horoscope Today 7 August 2026 : आज शुक्रवारच्या दिवशी 8 राशींवर प्रसन्न होणार देवी लक्ष्मी; संध्याकाळच्या वेळी मिळणार शुभवार्ता, वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारच्या दिवशी 8 राशींवर प्रसन्न होणार देवी लक्ष्मी; संध्याकाळच्या वेळी मिळणार शुभवार्ता, वाचा आजचे राशीभविष्य
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 5 राशींची पाचही बोटं तुपात! ऑगस्टचा दुसरा आठवडा नशीब पालटणार, पैसा, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 5 राशींची पाचही बोटं तुपात! ऑगस्टचा दुसरा आठवडा नशीब पालटणार, पैसा, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
Maharashtra Live blog updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार; सूत्रांची माहिती
Maharashtra Live blog updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार; सूत्रांची माहिती
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Nikita Rawal Angry On Ranbir Kapoor: 'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Manoj Jarange Patil and Pravin darekar: फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Embed widget