(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vastu Tips : शोधूनही नोकरी मिळत नाही? घरात काही समस्या असेल तर करा 'हे' उपाय
Vastu Tips : खूप मेहनत घेऊनही तुम्हाला नोकरी मिळण्यात अडचण येत असेल तर पिवळा रंग जास्त वापरा. पिवळा रंग तुमच्या कुंडलीतील गुरु ग्रह मजबूत करेल.
Vastu Tips : अनेक वेळा रात्रंदिवस मेहनत करून देखील आपल्याला हवी असलेली नोकरी मिळत नाही. खूप मेहनती असूनही अनेकांना त्यांचे स्वप्न पूर्ण करता येत नाही. पण काही लोकांना अगदी सहज नोकऱ्या मिळतात, त्यांना जास्त कष्ट देखील करावे लागत नाहीत. अशा वेळी तुम्ही स्वत:लाच दोष देता, पण तुम्हाला माहीत आहे का की यात सगळा खेळ ग्रहांचा आहे. कमकुवत ग्रह लोकांच्या प्रगतीत अडथळा आणतात. ज्या राशीच्या लोकांना नोकरी मिळणे कठीण आहे. वास्तुशास्त्रात त्यांच्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत. ज्याचे अनुसरण केल्यास तरुणांची स्वप्ने पूर्ण होऊ शकतात. ज्यांना सहज इच्छित नोकरी मिळेल.
ड्रीम जॉबसाठी वास्तु टिप्स फॉलो करा
खूप मेहनत घेऊनही तुम्हाला नोकरी मिळण्यात अडचण येत असेल तर पिवळा रंग जास्त वापरा. पिवळा रंग तुमच्या कुंडलीतील गुरु ग्रह मजबूत करेल. यासह तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये लवकरच सकारात्मक परिणाम दिसेल.
खूप प्रयत्न करूनही नोकरी मिळत नसेल तर घराच्या उत्तर दिशेला आरसा लावा. आरसा इतका मोठा असावा, ज्यामध्ये संपूर्ण प्रतिमा दिसत असेल, असे केल्याने काम लवकर मिळू शकते.
अनेकवेळा तरुण अनेक मुलाखती देतात. पण नोकरी मिळतच नाही. यासाठी तुम्हाला फक्त एक गोष्ट करावी लागेल. जेव्हा तुम्ही मुलाखतीला जाल तेव्हा लाल किंवा हिरवे कपडे घाला. त्याऐवजी या रंगाचा रुमालही सोबत ठेवू शकता. असे केल्याने यश मिळण्याची शक्यता वाढते.
कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात श्रीगणेशाचे नाव घेऊन केली जाते. त्यामुळे घरातून बाहेर पडण्यापूर्वी गणेशाची पूजा करावी. गणेशाला लाडू अर्पण करा. हा उपाय तुमच्यासाठी खूप प्रभावी ठरेल.
ज्या लोकांच्या जन्मपत्रिकेतील ग्रह दोषांमुळे त्यांच्या करिअरमध्ये अडचणी येतात. त्यांनी एक मुखी, दहा मुखी किंवा अकरा मुखी रुद्राक्ष धारण करावा. असे केल्याने करिअरमधील सर्व अडथळे दूर होतील.
नोकरी मिळण्यात अडथळे येत असतील तर शनिवारी शनिदेवाची पूजा करावी. यामुळे तुमच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील.
जेव्हाही इंटरव्ह्यूसाठी बाहेर जाल तेव्हा बाहेर पडताना दही आणि साखर खाऊन बाहेर जा. यामुळे तुमचा दिवस चांगला जाईल.
दररोज पक्ष्यांना खायला द्या. यामुळे तुमच्या करिअरशी संबंधित समस्याही दूर होतील.
महादेवाची पूजा केल्याने तुम्हाला तुमची स्वप्नवत नोकरी मिळू शकते. दररोज एक मूठ तांदूळ शिवलिंगाला अर्पण करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्वाच्या बातम्या