Vastu Tips : तुमच्या घरात अटॅच बाथरूम आहे का? होतील हे परिणाम
Vastu Tips : वास्तूनुसार जर तुम्ही तुमच्या घरात अटॅच बाथरूम बनवत असाल तर काही गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा. नाही तर मोठे नुकसान होऊ शकते.

Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार घराच्या प्रत्येक दिशेला होणती ना कोणती ऊर्जा नक्कीच असते. घरात ठेवलेल्या वस्तूंचीही स्वतःची ऊर्जा असते. ज्याचा परिणाम घरातील सदस्यांवर देखील होतो. वास्तूमध्ये घराच्या प्रत्येक खोलीसाठी एक निश्चित दिशा निश्चित केली आहे. कारण तिथून बाहेर पडणारी ऊर्जा संपूर्ण घरावर प्रभाव टाकते.
आजच्या घरांमध्ये अटॅच बाथरूम बनवले जातात. वास्तूनुसार जर तुम्ही तुमच्या घरात अटॅच बाथरूम बनवत असाल तर काही गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा. नाही तर मोठे नुकसान होऊ शकते. जाणून घेऊया त्याबद्दल.
अटॅच बाथरूम बनवताना या गोष्टी लक्षात ठेवा
साधारणपणे घराच्या बेडरूममध्ये अटॅच बाथरूम बनवले जातात. अशा स्थितीत बेडरूममध्ये व्यस्त राहिल्याने पती-पत्नीच्या नात्यावरही त्याचा परिणाम होतो. झोपताना लक्षात ठेवा की तुमचे पाय बाथरूमच्या दिशेने जाऊ नयेत. वास्तुशास्त्रानुसार, यामुळे पती-पत्नीमध्ये भांडणे वाढू लागतात.
बाथरूमकडे पाड करून झोपल्यानंतर प्रत्येक विषयावर वादविवाद होण्याची शक्यता असते. कधी कधी हे वाद इतके वाढतात की ते घटस्फोटापर्यंत देखील जाऊ शकतात. शिवाय त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती देखील ढासळू लागते. झोपताना बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद ठेवा.
करा हे उपाय
अटॅच बाथरूममुळे घरामध्ये अनेकदा वास्तुदोष निर्माण होतात. हा वास्तुदोष दूर करण्यासाठी बाथरूममध्ये काचेची वाटी ठेवा आणि त्यात मीठाचे खडे भरा. त्यानंतर ते आठवडाभर बाथरूममध्ये असेच राहू द्या. यानंतर ते मीठ सिंकमध्ये फ्लश करा आणि नंतर भांड्यात दुसरे मीठ टाका.
या उपायाने बाथरूमशी संबंधित वास्तुदोष दूर होतात. याशिवाय कोणतेही स्नानगृह, त्याचे टॉयलेट सीट नेहमी बंद ठेवावे कारण ते नकारात्मक ऊर्जा उत्सर्जित करते. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे टॉयलेट सीट नेहमी झाकून ठेवावी.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर बातम्या
Valentine Day 2023 Vastu Tips : व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी चुकूनही पार्टनरला देऊ नका 'हे' गिफ्ट, नात्यात दुरावा येऊ शकतो, वास्तुशास्त्रात म्हटलंय...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
