Vastu Tips : तुम्हीही 'या' दिशेने देवाची आरती करताय? जाणून घ्या पूजा करण्याचे योग्य नियम, वास्तूशास्त्रात म्हटलंय...
Vastu Tips : हिंदू धर्मशास्त्रानुसार, प्रत्येक रुढी-परंपरेला एक अनन्य साधारण महत्त्व आहे. त्याचप्रमाणे, आरती करण्याची देखील एक विशेष परंपरा आहे.

Vastu Tips : हिंदू धर्मशास्त्रानुसार, प्रत्येक रुढी-परंपरेला एक अनन्य साधारण महत्त्व आहे. त्याचप्रमाणे, आरती करण्याची देखील एक विशेष परंपरा आहे. यामध्ये जराशी जरी चूक झाली तरी त्याचा प्रभाव फार त्रासदायक असतो. अशा वेळी अनेकांना आरतीचं ताट नेमकं कोणत्या दिशेने फिरवावं या संदर्भात अनेकांना माहीत नाहीये. अनेकदा लोकांच्या हातून नकळतपणे या चुका होतात. पण, यामध्ये धार्मिक आणि वैज्ञानिक कारण नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात. तसेच, आरती करण्याची योग्य दिशा, नियम आणि अचूक उपायांविषयी देखील जाणून घेऊयात.
आरतीची दिशा आणि महत्त्व
आरतीला पूजेची समाप्ती देखील म्हणतात. यामध्ये भक्त देवाच्या चरणी प्रेम आणि भावना व्यक्त करतात.
ब्रह्मांडाची लय :
ब्रह्मांडात ऊर्जेचा प्रवाह मुख्य रुपाने दक्षिण दिशेला होतो. पृथ्वीचं ग्रहांशी होणारं संक्रमण, ग्रहांची युती याच दिशेचं अनुकरण करतात.
सकारात्मक ऊर्जा
जेव्हा आपण आरतीचं ताट दक्षिण दिशेला फिरतो तेव्हा आपण स्वत:ला ब्रह्मांडाच्या लयीशी जोडतो. या क्रियेमुळे वातावरणात एक प्रकारे सकारात्मक ऊर्जा निर्ंम
आध्यात्मिक ऊर्जेत वृद्धी
या गतीने आरती केल्यास ऊर्जा प्राप्त होते. तसेच, यामुळे आध्यात्मिक ऊर्जा शुद्ध होते. मनाची शांती वा
धार्मिक आणि प्रतीकात्मक महत्त्व
प्रदक्षिणा
हिंदू धर्मात मंदिर किंवा देवाची परिक्रमा (प्रदक्षिणा) नेहमी दक्षिणावर्ती दिशेने केली जाते. आरतीसुद्धा याचंच एक रुप आहे. देवासमोर आरती करताना नेहमी उभं राहूनच करावी.
सृष्टीचं चक्र
दक्षिणावर्ती गती जीवनात चक्र, जन्मापासून ते मोक्षपर्यंत, जन्मापासून ते मोक्षापर्यंत दर्शवते. यामुळे आपण देवाशी किती कनेक्टेड आहोत हे कळतं.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















