एक्स्प्लोर

Valmiki Jayanti 2022: कसा झाला 'वाल्या' चा 'वाल्मिकी'? आज महर्षि वाल्मिकी जयंती, जाणून घ्या खास गोष्टी

Valmiki Jayanti 2022 : हिंदू धर्मातील महत्त्वाचे महाकाव्य रामायण महर्षी वाल्मिकी यांनी रचले होते. 

Valmiki Jayanti 2022 : महर्षी वाल्मिकी (Maharshi Valmiki) यांची जयंती दरवर्षी अश्विन महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. महर्षी वाल्मिकी यांची जयंती संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. आज 09 ऑक्टोबर 2022 रोजी वाल्मिकी जयंती आहे. हिंदू धर्मातील महत्त्वाचे महाकाव्य रामायण (Ramayan) महर्षी वाल्मिकी यांनी रचले होते. 
 
रामायण हे संस्कृत भाषेतील सर्वप्रथम महाकाव्य
वाल्मिकींनी संस्कृत भाषेत लिहिलेले रामायण सर्वात जुने मानले जाते. संस्कृत भाषेतील पहिल्या महाकाव्याच्या रचनेमुळे महर्षी वाल्मिकी यांना आदिकवी असेही म्हणतात. महर्षी वाल्मिकींच्या जयंतीनिमित्त देशभरात अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात, मंदिरांमध्ये वाल्मिकीची पूजा केली जाते. महर्षी वाल्मिकीजींचे नाव आणि ते महर्षी बनण्याची कथा खूप मनोरंजक आहे. चला जाणून घेऊया वाल्मिकीजींशी संबंधित काही महत्त्वाची माहिती...

वाल्मिकी जयंती
यावर्षी पौर्णिमा तिथी 09 ऑक्टोबर रोजी पहाटे 3:40 वाजता सुरू होत आहे, जी दुसऱ्या दिवशी 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:24 वाजता समाप्त होईल.

आधी लुटारू...नंतर महर्षी वाल्मिकी
महर्षी वाल्मिकींच्या जन्माबाबत कोणताही ठोस पुरावा नाही. काही मान्यतेनुसार, महर्षि कश्यप आणि अदिती यांचा नववा मुलगा वरुण आणि त्याची पत्नी चारशनीच्या पोटी त्यांचा जन्म झाला. असे म्हणतात की, जन्मानंतर त्यांना भिल्ल समाजातील लोकांनी बालपणीच पळवून नेले, त्यानंतर ते भिल्ल समाजात वाढले आणि नंतर त्यांचे नाव ‘वाल्या’ पडले व सर्व लोक त्यांना ‘वाल्या कोळी’ म्हणू लागले. कुटुंबाचे पोट भरण्यासाठी तो लोकांना लुटायचा.

या घटनेनंतर रत्नाकर महर्षी वाल्मिकी झाले
असे म्हणतात की, एकदा वाल्या डाकूने नारद मुनींना जंगलात कैद केले होते, तेव्हा नारदजींनी विचारले की या चुकीच्या कृतीतून तुम्हाला काय मिळणार आहे? रत्नाकर म्हणाले, मी हे कुटुंबासाठी करतो. नारदजींनी त्यांना सांगितले की, तू ज्याच्यासाठी चुकीच्या मार्गावर चालला आहेस, तुझ्या पापकर्माचे फळ मिळेल. नारदजींचे म्हणणे ऐकून रत्नाकरांनी आपल्या घरच्यांना विचारले, परंतु कुटुंबातील सर्वांनी तसे करण्यास नकार दिला. या घटनेने रत्नाकर अत्यंत दु:खी झाला आणि त्याने चुकीचा मार्ग सोडून रामाच्या भक्तीत मग्न झाला. यानंतरच त्यांना रामायण रचण्याची प्रेरणा मिळाली.

वाल्मिकी हे नाव कसे पडले?
मान्यतेनुसार, एकदा वाल्मीकीजी तपश्चर्येला बसले होते. बराच वेळ चाललेल्या या तपस्यामध्ये तो इतका तल्लीन झाले होते की त्याच्या संपूर्ण शरीराला वाळवी लागली. पण त्यांनी तपश्चर्येत भंग न आणू घेता अध्यात्मिक साधना सुरू ठेवली. तेव्हाच त्यांनी डोळे उघडले. असे म्हटले जाते की ज्या ठिकाणी वाळवी आपले घर बनवते त्याला वाल्मिकी म्हणतात, म्हणून ते वाल्मिकी म्हणून ओळखले जाऊ लागले.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Job Majha : नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडमध्ये नोकरीची संधी, अटी काय?Maratha Samaj on Walmik Karad | वाल्मीक कराडची नार्को टेस्ट करा, नांदेड मधील मराठा समाजाची मागणीSantosh Deshmukh Muder Case | संतोष देशमुखांची हत्या नेमकी कशी केली? आरोपींनी सांगितली माहितीManoj Jarange Speech Dharashiv| धनंजय मुंडे टोळी थांबेव, माझ्या नादी लागू नको, जरांगेंचा कडक इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget