एक्स्प्लोर

Ayushman Rajyog 2023 : वर्षाच्या शेवटच्या दिवशी बनतोय आयुष्मान राजयोग; मेषसह 'या' 5 राशींना होणार विशेष लाभ

Ayushman Rajyog : वर्षाच्या शेवटच्या दिवशी आयुष्मान योगासह प्रीति योग, लक्ष्मी नारायण योग आणि मघा नक्षत्र यांचा शुभ संयोग असल्याने या दिवसाचं महत्त्व वाढलं आहे.

Ayushman Rajyog : आज रविवार, 31 डिसेंबर हा 2023 चा शेवटचा दिवस आहे आणि या दिवशी आयुष्मान राजयोगाचा शुभ संयोग होत आहे आणि चंद्र देखील सूर्याच्या राशीत, म्हणजेच सिंह राशीत प्रवेश करणार आहे. तसेच 31 डिसेंबरला पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी असून या दिवशी आयुष्मान योगासह प्रीति योग, लक्ष्मी नारायण योग आणि मघा नक्षत्र यांचा शुभ संयोग असल्याने या दिवसाचे महत्त्व वाढले आहे.

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, वर्षाच्या शेवटच्या दिवशी शुभ योग तयार झाल्याने 5 राशींना (Zodiac Signs) फायदा होणार आहे. या राशीचे लोक नवीन वर्षाबद्दल उत्साही असतील आणि त्यांचं नशीब उजळेल. 31 डिसेंबरचा हा दिवस कोणत्या राशींसाठी भाग्यशाली असेल? जाणून घेऊया.

मेष रास (Aries)

प्रीति योगामुळे 31 डिसेंबरचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. मेष राशीच्या लोकांना सूर्यदेवाच्या कृपेने त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल आणि ते नवीन वर्षाची चांगली तयारी देखील करतील. नवीन वर्षासंबंधित विक्रीसंदर्भात व्यावसायिक काही योजना करू शकतात, ज्यातून चांगला नफा मिळेल. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी आज तुम्ही तुमच्या भावाची मदत घेऊ शकता आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. धार्मिक आणि सामाजिक कार्य केल्याने तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत नवीन वर्ष बाहेर साजरे कराल, ज्यामुळे तुमचे नाते आणखी मजबूत होईल आणि आनंद टिकून राहील. सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम ठरेल. आजचा संपूर्ण दिवस तुम्ही मित्रांसोबत मजेत घालवाल आणि नवीन वर्षासाठी तुमच्या मेहनतीला फळ मिळेल.

मिथुन रास (Gemini)

आयुष्मान योगामुळे 31 डिसेंबरचा दिवस मिथुन राशीच्या लोकांसाठी आनंददायी असेल. मिथुन राशीचे लोक नवीन वर्षाबद्दल उत्साही असतील आणि मित्रांसोबत मजा करताना दिसतील. आज तुमची एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी भेट होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला भविष्यात चांगला फायदा होईल. नवीन वर्षात कुटुंबीयांसह धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना कराल. कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे तर, आज वर्षाच्या शेवटच्या दिवशी चांगले पदार्थ तयार केले जातील आणि घरात आनंद आणि शांती नांदेल. तुम्हाला तुमच्या वडिलांचे सहकार्य मिळेल, ज्यांच्याद्वारे तुम्ही नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकता. तुमचा कल अध्यात्माकडे असेल आणि इतरांना मदत करण्यास तयार असाल. तुम्हाला तुमच्या बंधू-भगिनींचे सहकार्य मिळेल आणि त्यांच्यासोबत नवीन वर्ष साजरे करण्याची योजना बनवाल. जर तुम्ही आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येने त्रस्त असाल तर आज तुम्हाला आराम मिळेल.

कर्क रास (Cancer)

मघा नक्षत्रामुळे कर्क राशीच्या लोकांसाठी 31 डिसेंबरचा दिवस लाभदायक राहील. कर्क राशीचे लोक आज पैसे वाचवू शकतील आणि वर्षाच्या शेवटच्या दिवशी त्यांना कुठेतरी अडकलेला पैसा मिळेल, ज्यामुळे तुमचा आनंद देखील द्विगुणित होईल. नवीन वर्षामुळे तुमचा आजचा संपूर्ण दिवस आनंदात जाईल आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. तुमचे विरोधक पराभूत होतील आणि तुम्ही यशस्वीही व्हाल. कौटुंबिक जीवनात आनंद आणि समाधान असेल आणि कोणतीही मालमत्ता खरेदी करण्यात यश मिळेल. कर्क राशीचे लोक वर्षाच्या शेवटच्या दिवसांत सर्व चिंतेपासून मुक्त होतील आणि उपजीविकेच्या क्षेत्रातही लाभ मिळतील. कौटुंबिक जीवनाबद्दल बोलल्यास, कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी राहतील आणि तुमच्यामध्ये कौटुंबिक ऐक्य वाढेल. तुमच्या जोडीदारासोबत काही वाद चालू असेल तर ते आज संपुष्टात येईल.

वृश्चिक रास (Scorpio)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी 21 डिसेंबर हा दिवस शुभ योगांमुळे चांगला असणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांना आज उत्पन्न वाढीचे स्रोत मिळतील आणि ऊर्जा आणि प्रतिकारशक्तीमध्ये सुधारणा दिसून येईल. तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडून चांगले सहकार्य मिळेल आणि ते तुम्हाला मदत करताना दिसतील. तुम्ही कोणतीही मालमत्ता खरेदी करण्याची तयारी करत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी फलदायी असेल. तुमच्या आई-वडिलांच्या आशीर्वादाने तुम्ही आज कोणतेही काम कराल, त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. वर्षाच्या शेवटच्या दिवशी व्यवसायात आर्थिक लाभामुळे तुमचे मन प्रसन्न राहील आणि तुम्ही सर्व कामे सहजतेने करू शकाल. परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळेल आणि कौटुंबिक जीवन चांगले राहील. भावांमध्‍ये काही मतभेद असले तर ते आज संपतील.

कुंभ रास (Aquarius)

लक्ष्मी नारायण योगामुळे कुंभ राशीच्या लोकांसाठी 31 डिसेंबरचा दिवस आनंदाचा राहील. आज सूर्यदेवाच्या कृपेने कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात चांगल्या घटना घडू लागतील, ज्यामुळे तुम्हाला आनंद वाटेल. अचानक आर्थिक लाभ तुम्हाला मोठा आनंद देईल. आज तुम्हाला काही क्षेत्रांतून पैसे मिळण्याची शक्यता आहे, ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनबाबत मनात आनंद राहील आणि मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. वर्षाच्या शेवटच्या दिवशी तुम्ही सामाजिक परिस्थितीत सुधारणा पहाल आणि तुमचे मित्रमंडळही वाढेल. कौटुंबिक जीवनाबद्दल सांगायचे तर, वर्षाच्या शेवटच्या दिवशी सर्व सदस्य एकत्र राहतील आणि नवीन पदार्थांचा आनंद घेतील. जर तुम्ही कोणत्याही समस्येत अडकला असाल किंवा काही काम प्रलंबित असेल तर आज तुम्हाला या सगळ्यापासून मुक्ती मिळेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Weekly Horoscope : नवीन आठवड्यात 'या' 5 राशींच्या लोकांचं नशीब उजळणार; बुध आणि गुरू करणार मालामाल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : पहिल्या दिवशी किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले? नवीन नोंदणीबाबत अदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
पहिल्या दिवशी किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले? नवीन नोंदणीबाबत अदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
लक्झरी बस आणि ट्रकची धडक, एक ठार, 15-20 जखमी; पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात
लक्झरी बस आणि ट्रकची धडक, एक ठार, 15-20 जखमी; पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात
तुळजाभवानीचं दर्शन आता 22 तास राहणार खुले, प्रक्षाळ पुजेनंतर मंदिर होणार भाविकांसाठी बंद, प्रशासनाचे आदेश
तुळजाभवानीचं दर्शन आता 22 तास राहणार खुले, प्रक्षाळ पुजेनंतर मंदिर होणार भाविकांसाठी बंद, प्रशासनाचे आदेश
Astrology : आज नाताळच्या मुहूर्तावर बनले मोठे शुभ योग; 5 राशींच्या नशिबाला लागणार चार चाँद, विविध मार्गांनी होणार बक्कळ धनलाभ
आज नाताळच्या मुहूर्तावर बनले मोठे शुभ योग; 5 राशींच्या नशिबाला लागणार चार चाँद, विविध मार्गांनी होणार बक्कळ धनलाभ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Christmas Special Superfast News : आज जगभरात नाताळचा जल्लोष,राज्यातही उत्साह #abpमाझाABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 9 AM 25 December 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्सTop 80 at 8AM Superfast 25 December 2024 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्याTuljapur News : तुळजानगरी भाविकांंनी गजबजली, सुट्ट्यांमुळे दर्शनासाठी भाविक तुळजापुरात #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : पहिल्या दिवशी किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले? नवीन नोंदणीबाबत अदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
पहिल्या दिवशी किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले? नवीन नोंदणीबाबत अदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
लक्झरी बस आणि ट्रकची धडक, एक ठार, 15-20 जखमी; पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात
लक्झरी बस आणि ट्रकची धडक, एक ठार, 15-20 जखमी; पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात
तुळजाभवानीचं दर्शन आता 22 तास राहणार खुले, प्रक्षाळ पुजेनंतर मंदिर होणार भाविकांसाठी बंद, प्रशासनाचे आदेश
तुळजाभवानीचं दर्शन आता 22 तास राहणार खुले, प्रक्षाळ पुजेनंतर मंदिर होणार भाविकांसाठी बंद, प्रशासनाचे आदेश
Astrology : आज नाताळच्या मुहूर्तावर बनले मोठे शुभ योग; 5 राशींच्या नशिबाला लागणार चार चाँद, विविध मार्गांनी होणार बक्कळ धनलाभ
आज नाताळच्या मुहूर्तावर बनले मोठे शुभ योग; 5 राशींच्या नशिबाला लागणार चार चाँद, विविध मार्गांनी होणार बक्कळ धनलाभ
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वी करणारे हात वंचित, अंगणवाडी सेविका मानधनाच्या प्रतिक्षेत
आम्ही पण तुमच्या लाडकी बहिणी.. कष्टाचे पैसे द्या, योजना यशस्वी करणाऱ्या अंगणवाडी सेविकांची सरकारकडे मागणी
IPO Update : टाटांच्या आणखी एका कंपनीचा 17000 कोटींचा आयपीओ येणार, बातमी समोर येताच टाटांच्या शेअरमध्ये तेजी 
Tata Capital : टाटा कॅपिटलचा आयपीओ येणार, भांडवली बाजारातून 17000 कोटी रुपयांची उभारणी?
Ramtek Bungalow : रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
Horoscope Today 25 December 2024 : आज नाताळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज नाताळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget