Surya Gochar 2025 : पैसा, प्रसिद्धी आणि भरघोस यश...सूर्याच्या संक्रमणाने 'या' राशींच्या पदरात पडणार पुण्य, वर्षाच्या शेवटी लागणार लॉटरी
Surya Gochar 2025 : सूर्याच्या स्थितीबाबत बोलायचं झाल्यास, सूर्य सध्या आपल्या नीच राशीत विराजमान आहे. नीच राशीत असल्यामुळे सूर्य ग्रहाचा सकारात्मक परिणाम होणार आहे.

Surya Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्यदेवाला मान-सन्मान, आत्म्याचा कारक ग्रह मानतात. सूर्य ग्रह (Surya Gochar) एका ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करतात. ज्याचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम पाहायला मिळतो.
सूर्याच्या स्थितीबाबत बोलायचं झाल्यास, सूर्य सध्या आपल्या नीच राशीत विराजमान आहे. नीच राशीत असल्यामुळे सूर्य ग्रहाचा सकारात्मक परिणाम होणार आहे.
येत्या 16 नोव्हेंबर 2025 रोजी सूर्य ग्रह आपल्या नीच राशीतून मुक्त होऊन वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत आधीपासूनच मंगळ आणि बुध ग्रह विराजमान आहे. त्यामुळे सूर्य ग्रह या राशीत ट्रिपल योग निर्माण करणार आहे. या तीन ग्रहांच्या युतीमुळे त्रिग्रही योग, बुधादित्य आणि मंगळ आदित्य योग निर्माण होणार आहे. हा योग अनेक राशींसाठी लकी ठरणार आहे. सध्या मंगळ ग्रहाच्या अस्तामुळे राशींवर चांगला प्रभाव पडत नाहीये. मात्र, सूर्य ग्रहाबरोबर संयोजन करुन काही राशींचं भाग्य उजळण्याची शक्यता आहे.
मेष रास (Aries Horoscope)
या राशीच्या आठव्या चरणात सूर्य ग्रह प्रवेश करणार आहे. त्यामुळे तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तुम्ही पूर्ण करु शकता. तुमचं घर किंवा वाहन खरेदी करण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकतं. तसेच, त्रिग्रही योगामुळे तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. रिसर्चच्या क्षेत्राशी संबंधित गोष्टींमध्ये तुम्हाला लाभ मिळू शकतो. मात्र, आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला थोडी सावधानता बाळगण्याची शक्यता आहे.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी सूर्याचं वृश्चिक राशीत होणारं परिवर्तन अनेक राशींसाठी शुभकारक ठरण्याची शक्यता आहे. या काळात तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. या राशीच्या सहाव्या चरणात सूर्य ग्रह प्रवेश करणार आहेत. त्याचबरोबर तूळ राशीत शुक्र ग्रह विराजमान आहे. त्यामुळे घर, वाहन, दागिने खरेदी करण्याचं स्वप्न तुमचं पूर्ण होईल. जे विद्यार्थी परीक्षेच्या तयारीत व्यस्त आहेत त्यांना चांगलं यश मिळेल.
सिंह रास (Leo Horoscope)
या काळात सिंह राशीच्या लोकांना देखील चांगला लाभ मिळेल. या राशीत शनीची ढैय्या चाल सुरु आहे. मात्र, गुरु ग्रहामुळे तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. भौतिक सुख-समृद्धीचा तुम्ही लाभ घ्याल. या राशीच्या लोकांना व्यवसायात दुप्पट लाभ मिळेल. या राशीच्या दहाव्या चरणात सूर्याची दृष्टी पडतेय. त्यामुळे तुमचं वैवाहिक जीवनही सुखकर राहील. कुटुंबात लवकरच आनंदाची बातमी मिळेल.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















