(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Surya Gochar 2024 : सूर्य ग्रहाचं महासंक्रमण बदलणार 'या' 3 राशींचं भाग्य; एक महिन्यापर्यंत मिळत राहणार 'गुड न्यूज'
Surya Gochar 2024 : सूर्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे सूर्याच्या राशी संक्रमणाचा कोणत्या राशींवर सकारात्मक परिणाम होणार आहे.
Surya Gochar 2024 : वैदिक शास्त्रानुसार, सूर्याला ग्रहांचा (Surya Gochar 2024) राजा म्हटलं जातं. ग्रहांच्या चालीमध्ये सूर्याच्या चालीला विशेष महत्त्व आहे. सूर्याची चाल फार कमी असल्यामुळे त्याला संपूर्ण राशी संक्रमण पूर्ण करण्यासाठी एक वर्षांचा कालावधी लागतो. सूर्याची शुभ दृष्टी फार लाभकारी असते. यामुळेच ज्या राशीच्या लोकांवर सूर्याची कृपा असते त्या राशींना पदोपदी नशिबाची साथ मिळते. सूर्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे सूर्याच्या राशी संक्रमणाचा कोणत्या राशींवर (Zodiac Signs) सकारात्मक परिणाम होणार आहे. याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीत सूर्याचं संक्रमण फार लाभदायक मानलं जातं. या दरम्यान संपूर्ण महिनाभर तुम्ही खूप कॉन्फिडेन्ट फिल कराल. तुमचं पूर्ण लक्ष तुमच्या कामावर असेल. तसेच, तुमच्या कामाच्या संदर्भात तुमचं फार कौतुक होईल. तसेच, कोर्ट-कचेरीची तुमची कामे जी रखडली होती ती पूर्ण होतील. तसेच, मित्रांच्या सहकार्याने तुमची अनेक कामे पूर्ण होतील. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही फार उत्साही असाल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
सूर्याचं संक्रमण मिथुन राशीच्या लोकांसाठी फार शुभकारक मानलं जाणार आहे. या दरम्यान तुमच्या आरोग्यात चांगली सुधारणा दिसून येईल. तुमच्या व्यवसायात येणाऱ्या अडचणी हळूहळू दूर होतील. तुम्ही तुमच्या प्रतिभेने सर्व संकटांवर मात करु शकता. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला जाणार आहे. तुम्हाला या दरम्यान एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी सूर्याचं संक्रमण फार फायदेशीर ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या अडचणी संपुष्टात येतील. तुमचा समाजात मान-सन्मान वाढेल. तुम्ही जे काही काम कराल त्यात तुम्हाला तुमच्या कुटुंबीयांचा तसेच गुरुचा पाठिंबा मिळेल. धार्मिक कार्यात मन रमेल. कुटुंबात सुख-शांती नांदेल. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी हा काळ चांगला आहे. तुम्ही वाहन, प्रॉपर्टी देखील या काळात खरेदी करु शकता.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: