Sun Transit 2022 : वृश्चिक राशीत सूर्याचे संक्रमण, 'या' राशींचं होणार नुकसान
Sun Transit 2022 : पंचांगानुसार बुधवारी संध्याकाळी 6.58 वाजता सूर्य आपली राशी बदलेल. हा दिवस वृश्चिक संक्रांती आहे.
Sun Transit 2022 : 16 नोव्हेंबर 2022 म्हणजे बुधवारचा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा दिवस मानला जात आहे. पंचांगानुसार बुधवारी संध्याकाळी 6.58 वाजता सूर्य आपली राशी बदलेल. हा दिवस वृश्चिक संक्रांती आहे. म्हणजेच या दिवशी ग्रहांचा राजा सूर्य तूळ राशीत आपली यात्रा पूर्ण केल्यानंतर जमीन, युद्ध, रक्त आणि धैर्य इत्यादी कारक मंगळाच्या वृश्चिक राशीत संक्रमण करेस. सूर्याचे संक्रमण काही राशींना त्रास देऊ शकते.
मेष : सूर्याचे संक्रमण तुमच्यासाठी विशेष आहे. सूर्य तुमच्या आठव्या घरात प्रवेश करेल. कुंडलीचे 8 वे घर देखील अचानक घडणाऱ्या घटना आणि अपघातांचे कारण मानले जाते. त्यामुळे या काळात वाहन वापरताना विशेष काळजी घ्या. यासोबतच तुम्हाला नवीन कोर्स करायचा असेल तर त्यासाठी हा काळ चांगला आहे. रवि संक्रमणादरम्यान वादांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते. आरोग्याची काळजी घ्या. काही आव्हाने येऊ शकतात. जेवणाकडे योग्य लक्ष द्या.
मिथुन : सूर्याचे राशी बदल तुमच्यासाठी जास्तीत जास्त आव्हाने घेऊन येत आहे. त्यामुळे विशेष दक्षता घेण्याची गरज आहे. तुमच्या सहाव्या घरात सूर्याचे संक्रमण होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीचे सहावे घर रोग, शत्रू इत्यादींचे मानले जाते. सूर्य भ्रमणात शत्रू सक्रिय होऊ शकतात. तुम्हाला ऑफिसमध्येही काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आईसोबत संबंध गोड ठेवण्याचा प्रयत्न करा. अनावश्यक वादांपासून दूर राहा. कोणाची निंदा करू नका. संयम राखा.
धनु : तुमच्या राशीचा स्वामी गुरु म्हणजेच बृहस्पति आहे. तुमच्या राशीत सूर्याचे भ्रमण काही बाबतीत शुभ परिणाम देणारे आहे. पण यासोबतच प्रेमसंबंधांमध्येही काही अडथळे निर्माण होऊ शकतात. जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल नात्याचे रूपांतर लग्नापर्यंत न्यायचे असेल तर विचार करून एक पाऊल पुढे टाका. आरोग्याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचे निष्काळजीपणा जड जाऊ शकतो.
मीन : सूर्याच्या राशी बदलामुळे तुम्हाला नवीन ठिकाणी प्रवास घडू शकतो. कुटुंबासोबत धार्मिक सहलीलाही जाऊ शकता. सूर्याचे भ्रमण तुमच्या खर्चातही वाढ करेल. मोबाईल स्क्रीनवर जास्त वेळ घालवल्यास डोळ्यांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. डॉक्टरांचा सल्लाही घ्यावा लागेल. प्रेमप्रकरणात नवीन समस्यांना सामोरे जावे लागू शकते. विद्यार्थ्यांनी शिस्तीचे पालन करून आपले ध्येय साध्य करावे. तब्येत ठीक राहील. परंतु ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्वाच्या बातम्या