Shukra Shani Yuti: 28 जानेवारीपूर्वी 'या' 3 राशींचे भाग्य उजळणार! शुक्र-शनिच्या युतीमुळे सोन्याचे दिवस येणार? ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..
Shukra Shani Yuti 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र आणि शनीचा संयोग तयार होत आहे, जो 28 जानेवारीपूर्वी होणार आहे. कोणत्या 3 राशींवर दोन्ही ग्रहांचा संयोग लाभदायक ठरेल?
Shukra Shani Yuti 2025: नवीन वर्ष 2025 च्या आगमनासोबतच ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह-ताऱ्यांच्या हालचालीतही मोठे बदल होताना दिसत आहे. आणि हे बदल अनेकांच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणत आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, 28 जानेवारीपूर्वी एक असा संयाग होत आहे. जो काही राशींचं नशीब पालटवणारा ठरणार आहे. ज्यामुळे त्या राशींच्या लोकांना सोन्याचे दिवस येण्याची शक्यता आहे. जाणून घ्या सविस्तर...
दोन्ही ग्रहांच्या संयोगाने धनधान्य योग?
ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र हा संपत्तीचा कारक आहे. तो कोणत्याही एका राशीत सुमारे 30 दिवस वास्तव्य करतो. सध्या शुक्र आणि शनि हे दोन्ही ग्रह कुंभ राशीत आहेत. दोन्ही ग्रहांच्या संयोगाने धनधान्य योग तयार होत आहे, जो 12 राशींवर वेगवेगळ्या प्रकारे प्रभाव टाकू शकतो. या विशेष योगाच्या निर्मितीचा 3 राशींवर शुभ प्रभाव पडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे 3 राशींना करिअर, व्यवसाय, प्रेम आणि नातेसंबंधात यश मिळू शकते. जाणून घेऊया कोणत्या आहेत 3 भाग्यशाली राशी?
कर्क - नोकरीत प्रगती होईल.
ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र आणि शनिच्या युतीमुळे कर्क राशीच्या लोकांना प्रेम आणि नातेसंबंधात यश मिळू शकते. तुमच्या जोडीदारासोबत अनेक दिवसांपासून सुरू असलेला वाद लवकरच मिटणार आहे. 28 जानेवारीपूर्वी तुम्हाला काहीतरी चांगले ऐकू येईल. शनि आणि शुक्र तुमच्यावर विशेष कृपा करू शकतात. नोकरीच्या क्षेत्रात प्रगती होईल. व्यावसायिकांना फायदा होऊ शकतो. नातेवाईकांना भेटू शकता. करिअरमध्ये यश मिळेल.
वृश्चिक - आर्थिक स्थिती मजबूत होईल
ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र आणि शनिच्या युतीमुळे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शुक्र आणि शनीचा योग लाभदायक ठरेल. समाजात मान-सन्मान वाढेल. मन प्रसन्न राहील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. समाजात मान-सन्मान वाढेल. जोडीदाराशी संबंध सुधारतील. नातेसंबंध सुधारतील. प्रेम प्रकरणात प्रगती होऊ शकते. 28 जानेवारीपूर्वी काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते.
कुंभ - संपत्तीत वाढ होण्याची शक्यता
ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ राशीसाठी शुक्र आणि शनीचा संयोग लाभदायक ठरेल. दोन्ही ग्रह या राशीमध्ये स्थित आहेत, ज्यामुळे त्यांचे भाग्य लाभेल. या राशीच्या लोकांसाठी काळ चांगला राहील. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. प्रेम प्रकरणात यश मिळू शकते. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. भगवान शुक्राच्या कृपेने आपण लोकांच्या मनात स्थान निर्माण करू शकू. आत्मविश्वास वाढेल आणि लोकांना तुमच्याकडे आकर्षित करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.
हेही वाचा>>>
Shani Dev: 2025 मध्ये शनिदेवांचा न्याय होणार! 'या' 2 राशींना सावध राहण्याची गरज? साडेसाती टाळण्यासाठी 'हा' मंत्र प्रभावी
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )