Shukra Gochar 2025 : वर्षाच्या शेवटी 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; शुक्र ग्रहाच्या संक्रमणाने उघडणार नशिबाचे दार, धन-संपत्तीत होणार भरभराट
Shukra Gochar 2025 : द्रिक पंचांगानुसार, सुख आणि वैभवाचा कारक शुक्र ग्रह 27 डिसेंबर रोजी शनिवारी सकाळी 07 वाजून 50 मिनिटांनी वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश करणार आहे.

Shukra Gochar 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र ग्रहाला (Shukra Gochar) प्रेम, सौंदर्य, सुख-सुविधा, भौतिक आनंद, आकर्षण आणि धनसंपत्तीचा कारक ग्रह मानतात. जेव्हा शुक्र ग्रह आपली रास बदलतात तेव्हा त्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर तसेच, आर्थिक स्थितीवर पाहायला मिळतो. शुक्र ग्रहाचं संक्रमण फार शुभकारक मानलं जातं. विशेषत: शुक्र ग्रह ज्या राशीत प्रवेश करतो त्या राशीसाठी (Zodiac Signs) तो काळ फार शुभकारक असतो.
द्रिक पंचांगानुसार, सुख आणि वैभवाचा कारक शुक्र ग्रह 27 डिसेंबर रोजी शनिवारी सकाळी 07 वाजून 50 मिनिटांनी वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश करणार आहे. धनु राशीत आधीपासूनच सूर्य ग्रह विराजमान आहे. शुक्र ग्रह पोहोचताच या ठिकाणी सूर्य-शुक्र ग्रहाची युती होणार आहे. यामुळे शुक्रादित्य योग निर्माण होणार आहे. हा योग फारच शुभकारक मानला जातो.
धनु राशीत जुळून आलेला शुक्रादित्य योग गुंतवणूक, व्यवसाय आणि आर्थिक निर्णयांसाठी फार लाभदायी मानला जातो. या दरम्यान पैशांशी संबंधित घेतलेले निर्णय फायदेशीर असतात. मात्र, शुक्र ग्रहाचं संक्रमणाचा सर्व 12 राशींवर परिणाम होतो. मात्र, तीन राशींसाठी हा योग विशेष फलदायी आहे.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ प्रगतीचा असणार आहे. या काळात शुक्रादित्य योगामुळे तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती दिसून येईल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती अधिक चांगली होईल. या काळात धनसंपत्तीशी संबंधित घेतलेले निर्णय तुमच्यासाठी लाभदायी ठरतील. तुमच्या वैवाहिक जीवनात गोडवा टिकून राहूल. तसेच, समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. कुटुंबियांबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवाल. तसेच, रचनात्मक गोष्टी करण्यासाठी हा काळ अनुकूल असणार आहे.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमच्यासाठी नशिबाचे दार खुले होतील. पैशांशी संबंधित तुम्ही चांगले आणि योग्य निर्णय तुम्ही घेऊ शकता. तुमच्या वैवाहिक जीवनात तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील. तसेच, या काळात अनेक नवीन योजनांचा तुम्ही लाभ घ्याल. तुमची अनेक रखडलेली कामे तुम्हाला या काळात पूर्ण करता येतील.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रहाचं संक्रमण शुभकारक ठरणार आहे. या काळात संक्रमणाचा परिणाम तुमच्या आर्थिक आणि मानसिक स्तरावर पडलेला दिसून येईल. नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला चांगले परिणाम दिसतील. तसेच, उत्पन्नाचे स्त्रोत वाढलेले दिसतील. मित्रांबरोबर तुम्हाला चांगला वेळ घालवता येईल. आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुमचं आरोग्य सामान्य असणार आहे. मानसिक तणाव हळुहळू कमी करण्याचा प्रयत्न करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :




















