Weekly Lucky Zodiac Signs : डिसेंबरचा शेवटच्या आठवड्यात 'या' 5 राशींचं नशीब फळफळणार; शुभ योगांसह संपत्तीत होणार भरभराट, वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Lucky Zodiac Signs : पौष महिना सुरु झाला असून या कालावधीत अनेक मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. या आठवड्यात कोणत्या राशी भाग्यवान असतील या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Weekly Lucky Zodiac Signs : ज्योतिष शास्त्रानुसार, डिसेंबरचा (December 2025) शेवटचा आठवडा उद्यापासून सुरु होणार आहे. पौष महिन्याची सुरुवात असल्या कारणाने हा महिना फार खास आहे. तसेच, या आठवड्यात नाताळसह विनायक चतुर्थी देखील साजरी केली जाणार आहे. तसेच, या कालावधीत अनेक छोट्या मोठ्या ग्रहांचं संक्रमण देखील होणार आहे. त्याचबरोबर, अनेक शुभ राजयोग देखील पाहायला मिळतील. त्यामुळे पाच राशींना चांगला लाभ मिळेल. तसेच, त्यांची प्रगती होईल. या आठवड्यात कोणत्या राशी भाग्यवान (Weekly Lucky Zodiac Signs) असतील या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Weekly Horoscope)
मेष राशीसाठी उद्यापासून सुरु होणारा आठवडा भाग्यशाली ठरणार आहे. या काळात तुम्हाला संतानसुख मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुम्ही नियोजित केलेली कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. तसेच, तुम्हाला पैशांची गुंतवणूक करायची असेल तर हा काळ तुमच्यासाठी फार उत्तम असणार आहे. महत्त्वाच्या कामासाठी उशीर करु नका. तसेच, पैशांच्या बाबतीत सावध राहा. कोणालाही उधारीचे पैसे देऊ नका. धनलाभाचे योग जुळून येणार आहेत.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात फार उत्तम असणार आहे. या कालावधीत तुमच्या करिअरला चांगली गती मिळेल. तसेच, जो लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झालेल्या दिसतील. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. मात्र, हा प्रवास तुमच्यासाठी फार सुखकर असणार आहे. या काळात तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून दुप्पट लाभ मिळेल.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमच्या आरोग्यात चांगली सुधारणा झालेली दिसेल. तसेच, तुमचा मानसिक तणाव हळुहळू कमी झालेला दिसेल. पार्टनरची तुम्हाला चांगली साथ मिळेल. तुम्ही चांगला वेळ घालवू शकाल. तसेच, या आठवड्यात तुमचे छोटे-मोठे प्रवासाचे योग जुळून येतील. भगवान विष्णूची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. कुटुंबियांबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवाल.
धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभकारक असणार आहे. या काळात तुमची अनेक रखडलेली कामे पूर्ण करता येतील. महत्त्वाच्या कामांना अधिक प्रोत्साहन द्याल. तसेच, तुम्हाला अचानक धनलाभही होऊ शकतो. या काळात घरात एखादी शुभवार्ता तुम्हाला ऐकायला मिळेल. तुमच्या करिअरमध्ये चांगली सुधारणा झालेली तुम्हाला दिसेल. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी लवकरच मिळेल. नशिबाची साथ तुमच्याबरोबर असेल.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
मीन राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीलाच धनलाभ होण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्यावर देवी लक्ष्मीची विशेष कृपा असणार आहे. त्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झालेली दिसेल. लहान मुलांच्या कलात्मकतेला चांगला वाव मिळेल. तसेच, धार्मिक यात्रेत तुम्ही सहभागी व्हाल. वडिलोत्पार्जित संपत्तीतून तुम्हाला विशेष लाभ मिळणार आहे. या काळात तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात देखील करु शकता.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















