Astrology : तब्बल 57 वर्षांनंतर मीन राशीत 6 ग्रहांची युती; 3 राशींचं नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Shatgrahi Yog 2025 : मार्च महिन्यात मीन राशीत 6 ग्रह एकत्र येणार आहेत. तब्बल 57 वर्षांनी राहू, बुध, सूर्य, शनि, शुक्र आणि चंद्र मीन राशीत एकत्र येतील. याचा 3 राशींना भरपूर लाभ मिळणार आहे.
Shatgrahi Yog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर आपली रास बदलतात, ज्याचा परिणाम 12 राशींच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे पडतो. मार्च 2025 मध्ये मीन राशीत ग्रहांची झुंबड उडणार आहे. मार्च महिन्यात शनि, शुक्र, बुध, सूर्य, राहु आणि चंद्र हे मीन राशीत एकत्र येणार आहेत. 6 ग्रह एकाच राशीत आल्याने शतगृही योग तयार होत आहे.
मीन राशीत राहु आधीच स्थित आहे. यासोबतच फेब्रुवारीमध्ये शुक्र आणि बुध ग्रहांचा मीन राशीत प्रवेश होईल. यानंतर 14 मार्चला सूर्य, 29 मार्चला शनि आणि 28 मार्चला चंद्र प्रवेश करेल. अशा प्रकारे 29 मार्चला मीन राशीत 6 ग्रहांचा मिलाफ होत आहे. या राशींमध्ये शनिदेव हा सर्वात महत्त्वाचा ग्रह मानला जातो, जो सुमारे 30 वर्षांनी मीन राशीत प्रवेश करेल. 6 ग्रहांच्या युतीचा 3 राशींना सर्वाधिक लाभ होणार आहे, या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मिथुन रास (Gemini)
शतग्रही योग मिथुन राशीच्या लोकांसाठी भाग्याचा ठरेल. या राशीच्या लोकांना प्रत्येक कामात अचानक यश मिळू शकतं. ज्या कामाची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होते ते काम आता यशस्वी होऊ शकते. सूर्य आणि गुरूच्या आशीर्वादाने तुम्ही भरपूर पैसा मिळवण्यात यशस्वी होऊ शकता. शनिदेवाच्या कृपेने तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळू शकतं. जीवनात आनंदी आनंद येऊ शकतो. यासोबतच वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांचं चांगलं सहकार्य मिळेल. व्यवसायात चांगला नफा मिळेल.
मकर रास (Capricorn)
मकर राशीच्या लोकांसाठी हा योग फलदायी ठरेल, तुमचं जीवन आनंदाने बहरुन जाईल. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये उत्तम संधी मिळू शकतात. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या आयुष्याबाबत मोठा निर्णय घेऊ शकता. मुलांच्या भेडसावणाऱ्या समस्या या काळात दूर होतील. नोकरी-व्यवसायात विशेष प्रगती दिसेल.
मीन रास (Pisces)
या राशीच्या लोकांसाठी शतग्रही योग खूप फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या लोकांची बौद्धिक क्षमता या काळात वाढू शकते. तुमचा आत्मविश्वास झपाट्याने वाढू शकतो. समाजात मान-सन्मान वाढेल. यासोबतच अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्ही तुमच्या पालकांसोबत चांगला वेळ घालवू शकता. नोकरदारांसाठीही हा आठवडा चांगला जाणार आहे. व्यवसायाच्या क्षेत्रातही तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. आरोग्यही चांगलं राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: