Navratri 2023 : यंदाची 'नवरात्र' खूप खास! 9 दिवस दुर्मिळ योगांचा संयोग, देवीच्या आशीर्वादाचा वर्षाव होणार
Navratri 2023 : यंदाची शारदीय नवरात्र खूप खास आहे. 9 दिवस अनेक शुभ योगांचा संयोग असून त्यामुळे भाविकांवर देवी दुर्गेच्या आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे. जाणून घ्या
Navratri 2023 : अश्विन महिन्यातील नवरात्रीला (Navratri 2023) शारदीय नवरात्र म्हणतात. शारदीय नवरात्रीची सुरुवात 15 ऑक्टोबर रोजी घटस्थापनेने होईल आणि नवरात्रीची समाप्ती 23 ऑक्टोबर 2023 रोजी महानवमीला होईल. दुसऱ्या दिवशी विजयादशमीला देवी दुर्गाला निरोप देऊन मूर्तीचे विसर्जन केले जाईल. यंदाचे शारदीय नवरात्र खूप खास मानले जाते. 9 दिवस अनेक शुभ योगांचा संयोग असून त्यामुळे भाविकांवर देवी दुर्गेच्या आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे. जाणून घ्या नवरात्रीचे शुभ योग आणि महत्त्व
नवरात्रीचे 9 दिवस दुर्गा देवीच्या उपासनेसाठी सर्वोत्तम
शारदीय नवरात्रीला छोटी नवरात्र असेही म्हणतात. हे 9 दिवस दुर्गा देवीच्या उपासनेसाठी सर्वोत्तम मानले जातात. या वर्षी नवरात्र 9 दिवसांचे असून या नऊ दिवसांमध्ये एक अत्यंत दुर्मिळ योगायोग घडत आहे ज्यामध्ये उपवास करणार्यांना देवीची पूजा करण्याचा विशेष लाभ मिळणार आहे. जाणून घ्या शारदीय नवरात्रीच्या 9 दिवसांचे शुभ योग.
नवरात्र 2023 नऊ दिवसांचा शुभ योग
15 ऑक्टोबर 2023 प्रतिपदा
शश राजयोग, भद्र योग, बुधादित्य योग, सनफा, वेशी योग, लक्ष्मी योग
देवी शैलपुत्री
16 ऑक्टोबर 2023 द्वितीया
बुधादित्य योग
देवी ब्रह्मचारिणी
17 ऑक्टोबर 2023 तृतीया -
प्रीती - 16 ऑक्टोबर, 10.4 सकाळी - 17 ऑक्टोबर, 9.22 सकाळी,
रवि योग - 08.31 रात्री - 18 ऑक्टोबर, 6.23 सकाळी -
देवी चंद्रघंटा
18 ऑक्टोबर 2023 चतुर्थी
आयुष्मान योग - 18 ऑक्टोबर, 9.22 सकाळी - 19 ऑक्टोबर, 8.19 सकाळी,
सर्वार्थ सिद्धी - सकाळी 6.23 - रात्री 9.01,
रवि योग- सकाळी 6.23 - रात्री 9.01
अमृत सिद्धी योग - सकाळी 6.23 - रात्री 9.01
देवी कुष्मांडा
19 ऑक्टोबर 2023 - पंचमी
रवि योग - 19 ऑक्टोबर, 9.04 संध्याकाळी- 20 ऑक्टोबर, 6.25 सकाळी,
शोभन - 19 ऑक्टोबर, 6.54 सकाळी - 20 ऑक्टोबर, 5.09 सकाळी,
सौभाग्य - 18 ऑक्टोबर, 8.19 सकाळी - 19 ऑक्टोबर, 6.54 सकाळी -
देवी स्कंदमाता
20 ऑक्टोबर 2023 षष्ठी
रवि योग - सकाळी 6.25 - रात्री 8.41
देवी कात्यायनी
21 ऑक्टोबर 2023 सप्तमी
सुकर्मा - 21 ऑक्टोबर, 3.03 पहाटे - 22 ऑक्टोबर, 12.37 मध्यरात्री
त्रिपुष्कर योग - संध्याकाळी 7.54 - रात्री 9.53
देवी कालरात्री
22 ऑक्टोबर 2023 महाष्टमी
धृती - 21 ऑक्टोबर, 12.37 मध्यरात्री - 22 ऑक्टोबर, 9.53 रात्री
रवि योग - 22 ऑक्टोबर, 06.44 - 23 ऑक्टोबर, 6.27
सर्वार्थ सिद्धी - 6.26 पहाटे - 6.44 सायंकाळी
देवी महागौरी
23 ऑक्टोबर 2023 महानवमी
शौर्य, बुधादित्य
शूल योग - 22 ऑक्टोबर, 9.53 रात्री - 23 ऑक्टोबर, 6.53 सायंकाळी
सर्वार्थ सिद्धी - 6.27 सकाळी- 5.14 सायंकाळी
रवि योग - दिवसभर
देवी सिद्धिदात्री
नऊ दिवस देवीचा उत्सव
शारदीय नवरात्रीचा उत्सव अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून सुरू होतो, जो नवमी तिथीला संपतो. त्यानंतर दसरा साजरा केला जाईल. घटस्थापना प्रतिपदा तिथीच्या दिवशी केली जाते. या दिवसापासून 9 दिवस अखंड ज्योती प्रज्वलित केली जाते. यावर्षी नवरात्र रविवार 15 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होत आहे. मंगळवार 23 ऑक्टोबर 2023 रोजी नवरात्रीची समाप्ती होईल. 24 ऑक्टोबर रोजी विजयादशमी किंवा दसरा हा सण साजरा केला जाणार आहे. आश्विन महिन्याची प्रतिपदा तिथी 14 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 11:24 पासून सुरू होईल. हे 15 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:32 पर्यंत चालेल. उदय तिथीनुसार 15 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :
Navratri 2023 : नवरात्रीचे नऊ दिवस 9 रंगाचे कपडे परिधान करा, देवी दुर्गा होईल प्रसन्न! जाणून घ्या महत्त्व