(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shani Uday 2024 :आज झालेल्या शनि उदयामुळे 'या' 5 राशींना बसणार फटका; होणार आर्थिक नुकसान, सर्व कामं बिघडणार
Shani Uday Negative Effects : शनि उदयामुळे कुंभ राशीसह 5 राशींचे वाईट दिवस सुरू होणार आहेत. 18 मार्चनंतर तुमच्या प्रत्येक कामात अडथळे येण्यास सुरुवात होईल, नोकरी-व्यवसायाशी संबंधित निर्णय जपून घ्यावे लागतील.
Shani Uday : ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला (Shani Dev) विशेष महत्त्व आहे. शनीचा आज, म्हणजेच 18 मार्चला कुंभ राशीत उदय झाला आहे. जूनपर्यंत शनि उदय स्थितीतच राहील. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा एखाद्या ग्रहाचा उदय किंवा अस्त होतो तेव्हा त्याचा प्रभाव सर्व राशींवर होतो. त्याच प्रमाणे, शनीच्या उदयामुळे (Shani Uday) काही राशीच्या लोकांना शुभ, तर काहींना अशुभ परिणाम पाहायला मिळतील. कन्या आणि मकरसह 5 राशींच्या लोकांना शनि उदयामुळे नोकरी-व्यवसायात अडचणींचा सामना करावा लागणार आहे. या 5 राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
शनि उदयामुळे 'या' 5 राशींना बसणार फटका
मिथुन रास (Gemini)
शनीच्या उदयामुळे मिथुन राशीच्या लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. तुम्ही यावेळी चुकूनही प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करू नका, अन्यथा अचानक काही समस्या येतील. तुमचे खर्च अचानक वाढू शकतात आणि तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. तुमच्या कुटुंबात मतभेद वाढू शकतात आणि वाद वाढल्याने तुमचं आरोग्य बिघडू शकतं. या काळात नोकरी बदलण्याचा निर्णय अजिबात घेऊ नका, हे तुम्हाला महागात पडू शकतं.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीवर शनि उदयाचा अशुभ प्रभाव पडेल, या काळात कर्क राशीच्या लोकांना करिअरमध्ये अचानक अडचणींचा सामना करावा लागेल. तुमच्या नोकरीत वातावरण अस्थिर असेल. व्यवसायात तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं, फायद्याच्या डील्स तुमच्या हातातून निसटू शकतात. वैवाहिक जीवनात परस्पर संबंधांवरही परिणाम होऊ शकतो. कुटुंबात भांडणं आणि वाद वाढू शकतात. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये तुम्हाला नुकसान सहन करावं लागू शकतं.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांना शनीच्या उदयाचा फटका बसेल, आर्थिक बाबतीत तुमचं नुकसान होऊ शकतं. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. या काळात कोणतीही नवीन सुरुवात करणं टाळा. कुटुंबातील सदस्यांशी वाद घालू नका. वैवाहिक संबंधांमध्ये अडचणी येऊ शकतात आणि तुमचं आरोग्य बिघडू शकतं. मित्रांसोबतच्या नात्यात काही कारणाने तणाव निर्माण होऊ शकतो. यावेळी तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा आणि करिअरमध्ये कोणताही नवीन निर्णय घेऊ नका.
मकर रास (Capricorn)
मकर राशीचा स्वामी शनि हा समजला जातो. त्यामुळे एकीकडे शनीच्या उदयामुळे तुम्हाला फायदाही होईल, पण त्याचा अशुभ प्रभाव वाढल्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांचा सामना देखील करावा लागू शकतो. या काळात तुमच्या घरखर्चात प्रचंड वाढ होऊ शकते. पैशाच्या बाबतीत तुम्हाला अडचणी येऊ शकतात. मानसिक अस्वस्थता वाढेल आणि नोकरीच्या बाबतीत मनात एक प्रकारची भीती राहील. या काळात कुणाशीही पैशाचा व्यवहार करू नका.
कुंभ रास (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांना शनीच्या उदयाचा खूप अशुभ परिणाम जाणवेल. या काळात तुमच्या खर्चात प्रचंड वाढ होऊ शकते, तुम्ही फालतू अनावश्यक खर्च टाळा आणि पैसे वाचवण्याचा विचार करा. नोकरी आणि व्यवसायात लोक तुमच्या विरोधात कट रचू शकतात. गाडी चालवताना काळजी घ्या. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. कुटुंबात कोणत्याही प्रकारच्या वादात पडणं टाळा आणि नातेवाईकांशी पैशाचे व्यवहार करू नका. या काळात तुम्ही कोणत्याही मालमत्तेत पैसे गुंतवू नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :